Wednesday, November 2, 2016

हवामानावर आधारित फळपिकांसाठी
 विमा भरण्यास गुरुवारपर्यंत मूदत
नांदेड, दि. 2 :- प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामनावर आधारित द्राक्ष, मोसंबी, केळी आणि आंबा या फळपिकांसाठी अस शेतकऱ्यांनी बँकेत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारिख गुरुवार 10 नोव्हेंबर 2016 आहे. या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कृषि पदुम विभागाचा शासन निर्णय दि. 29 ऑक्टोबर 2016 अन्वये नांदेड जिल्ह्यातील सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहाराकरीता लाग करण्यात आली आहे. योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा, कंपनी ही बजाज अलायझ इन्शुरन्स कंपनी  येरवाडा पुणे 411006 आहे. ही योजना अधिसुचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची राहील आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  च्छिक राहिल.
विमा हप्ता दर
फळपिक
विमा संरक्षित रक्कम
(नियमित) रुपये
गारपीट विमा
संरक्षित रक्कम
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता
रक्कम
नियमित
गारपीट
द्राक्ष
243000
93335
12150
4667
मोसंबी
70000
23300
3500
1165
केळी
115000
38300
5750
1915
आंबा
110000
36700
5500
1835

योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळे
            कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2016 आहे. सदरची योजना जिल्ह्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लाग राहिल.

अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगां,
विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड

000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...