Friday, May 2, 2025

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील दिव्यांगांशी संवाद

दिव्यांग बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि.02 (विमाका) : मराठवाडा विभागातील गरजू दिव्यांग यांच्या आज पर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी शासन निर्णयाच्या  अधिन राहून व दिव्यांग व्यक्ती  अधिकार अधिनियम 2016 बाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे विभागातील दिव्यांगाशी 7 मे 2025 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधणार आहे. तरी विभागातील दिव्यांगांनी संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

दिव्यांग व्यक्तीच्या प्रलंबित मागण्याचे निराकरण करण्याबाबत

Wednesday May 7, 16:00 - 18:00

https://us06web.zoom.us/j/81648347485?pwd=WjeVo2SFzOdWv8jkZLjyyNvAWBYDn0.1

Meeting ID: 816 4834 7485

Passcode: 173110




   वृत्त क्रमांक 464

एमएच सीईटी पीसीएम ग्रुपची फेरपरीक्षा 5 मे रोजी होणार

नांदेड दि. 2 मे :-राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची परीक्षा 27 एप्रिल 2025 रोजी सकाळ सत्रात घेण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता ही परीक्षा 5 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. संबंधीत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 463

100 दिवसांचा कृती आराखडा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी; राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल क्रमांक
परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक
नांदेड, दि. 2 :- 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्याचा निकाल काल जाहिर झाला. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने 66.86 गुण मिळवून राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
तर राज्यात परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 61.14 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कार्यालयाला 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते.

या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा भारतीय गुणवत्ता परिषद कॉलीटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत या मोहिमेचे मुल्यमापन करण्यात आले आहे. यामध्ये संकेतस्थळ अद्ययावत, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्याचा निकाल काल १ मे रोजी जाहिर झाला. 0000

  वृत्त क्रमांक 462

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 2 मे :-पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ, मोबाईल ॲप AH-MAHABMS व टोल फ्रि क्रमांक 1962 देण्यात आला आहे. तरी पशुपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी 2 जून 2025 पर्यत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

  वृत्त क्रमांक   506   शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत  विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक   द्वितीय क्...