Friday, May 2, 2025

   वृत्त क्रमांक 464

एमएच सीईटी पीसीएम ग्रुपची फेरपरीक्षा 5 मे रोजी होणार

नांदेड दि. 2 मे :-राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची परीक्षा 27 एप्रिल 2025 रोजी सकाळ सत्रात घेण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता ही परीक्षा 5 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. संबंधीत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित  नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व य...