Tuesday, March 17, 2026

वृत्त क्रमांक 338 

नांदेड ग्रंथोत्सव-2025

आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री 

नांदेड दि. 18 मार्च :- नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 1415 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. वाचकांना नियोजीत कार्यक्रमाच्या साहित्यिक मेजवानी सोबतच, आयोजकांनी मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचकांना व ग्रंथालय चालकांना पाहिजे असलेली पुस्तके मिळावीत या हेतुने, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशनाचे स्टॉल, शांती पब्लीकेशन पुणे तसेच जिल्हाधिकारी कार्याल नांदेड येथील ग्रंथ प्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन नांदेड, संदेश बुक डेपो परभणी प्रगती बुक डेपो हिंगोली, मांडणी कर बुक डेपो नांदेड मराठवाडा बुक सेलर नांदेड ओमकार ओमकार प्रकाशन नांदेड ओमकार प्रकाशन नांदेड हिंगोली व इतर  पुस्तकाचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले होते. 

या ग्रंथप्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक सुरेश सावंत यांनी केले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, डॉ. मा. मा. जाधव, प्रा.संजय जगताप, साहित्यिक डॉ.विलास वैद्य, साहित्यिक नारायण शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी आदी मान्यवरांनी हजेरी लावली. 

प्रकाशकांनी मोठ्या प्रमाणावर वाचकांना दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून दीले होते. त्याला वाचक ग्रंथालय चालकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथखरेदी करूण चांगला प्रतिसाद दिला आहे.  दोन  दिवसात जवळपास दहा लाख रुपयांचे ग्रंथ विक्री झाल्याचे समजते.

00000











 वृत्त क्रमांक  337

माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी 13 मार्च रोजी समुपदेशन

नांदेड, दि. 9 मार्च :- नांदेड जिल्हा व अधिपत्याखालील क्षेत्रात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या 1 हजार 834 इतकी आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास व पुनर्वसनाची संधी मिळावी यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समुपदेशन कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

या समुपदेशन कार्यक्रमाद्वारे माजी सैनिकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत त्यांच्या कौशल्यानुसार योग्य तांत्रिक अथवा शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधींबाबत माहिती, आवश्यक प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधींबाबत सल्ला तसेच पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या शैक्षणिक व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

000000

 वृत्त क्. 336

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीचा ई-लिलाव; तारखा जाहिर

नांदेड, दि. 17 मार्च :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, यांच्यावतीने वायुवेग पथकामार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व इतर ठिकाणी अटकावून असलेल्या व वाहनधारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनाची ई-लिलाव प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने https://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. त्याचा सांकेतांक क्रमांक 2026_ MH_33493 असा आहे. 

ई-लिलाव प्रक्रीयासंबंधी सविस्तर तपशील प्रक्रीया, दिनांक व वेळ पुढीलप्रमाणे आहे.

ई-लिलाव ऑनलाईन/ऑफलाईन कागदपत्रे नोंदणीची सुरवात 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. होईल तर 27 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वा. समाप्त होईल.

ई-लिलाव ऑनलाईन/ऑफलाईन प्राप्त कागदपत्रे पडताळणी व मंजूरीबाबत सुरवात 20 मार्च सकाळी 11 वा.तर  27 मार्च 2026 रोजी दुपारी 5 वा. समाप्त होईल.

बोलीदारांना वाहने पाहणीसाठी सुरवात 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. तर 27 मार्च 2026 रोजी दुपारी 5 वा. समाप्त .

ई-लिलाव ऑनलाईन लिलाव 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. ते सायंकाळी 4 वाजेपर्यत राहील. यांची नोंद सर्व संबंधीतानी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रंशात कंकरेज यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 335

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 17 मार्च :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार 19 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. जि. यवतमाळ मोवाडा येथून हेलिकॉप्टरने धनोडा हेलिपॅड ता. माहूर जि. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. धनोडा हेलिपॅड येथे आगमन व शासकीय वाहनाने धनोडा उच्च पातळी बंधारा साईट, ता. माहूर जि. नांदेड कडे प्रयाण. सकाळी 11 वा. धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- धनोडा उच्च पातळी बंधारा साईट, ता. माहूर जि. नांदेड . सकाळी 11.55 वा. धनोडा उच्च पातळी बंधारा येथून शासकीय वाहनाने धनोडा हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12 वा. धनोडा हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने शंकर लोदी हेलिपॅड ता. जिवती जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील. 

00000

वृत्त क्रमांक 334

बुधवारी अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 17 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 18 मार्च 2026 रोजी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 18 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व सोनल मात्रे 8830807312 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 333

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी ;

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास

नांदेड दि. 17 मार्च : नांदेड जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प आज सादर करण्‍यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या सन 2025-26 च्या सुधारित व सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी हा अर्थसंकल्‍प सादर केला. यावेळी मंचावर अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, उपमुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी महेश देशमुख, लेखाधिकारी विशाल हिवरे यांची उपस्थिती होती.

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी 1 कोटी 16 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून खेळाचे मैदान विकसीत करणे व क्रिडा साहित्य पुरविण्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करिअर मार्गदर्शन व अकरावी-बारावीतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रज्ञा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी 32 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे.

माळेगावसह इतर यात्रेसाठी 75 लाख रुपयाची तरतूद आहे. ग्रामीण भागात होणारे श्वानदंश व साप चावून होणारे मृत्यु रोखण्यासाठी आवश्यक इंजेक्शनासाठी 20 लक्ष, प्राथमिक आरोय केंद्रातील अत्याधुनिक प्रसूती कक्षा साठी 20 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय आरोग्य केंद्र NQAS करणे, आरोग्य दूत योजना राबविणे, क्षयरोग मूक्त गाव अशा वैशिष्टपूर्ण योजना राबविणे करिता एकूण 45 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी 1 कोटी 56 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, चारचाकी वाहन खरेदीसाठी अनुदान, विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी मदत तसेच गर्भवती माता व बालकांच्या सुरक्षेसाठी अॅनोमली स्कॅनसाठी 40 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीही 1 कोटी 16 लक्ष रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

शेती क्षेत्रात ड्रोन खरेदीसाठी 12 लक्ष रुपये, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 12 लक्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16 लक्ष रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 18 लक्ष रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रिसीजन फार्मिंग योजनेसाठी 11 लक्ष रुपयांची तरतूद आहे. पशुधन विभागाकरिता 90 लक्ष रुपये तरतूद ठेवण्‍यात आली आहे. यामध्‍ये औषधी, ईमारत दुरुस्‍ती, लस वाहतुक याचा समावेश आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 45 लक्ष तरतूद करण्‍यात आली आहे.

महिला व बाल विकासासाठी 78 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, ड्युअल डेस्क व भांडी पुरविणे तसेच घटस्फोटित व विधवा महिलांच्या पाल्यांना सहाय्य देण्यात येणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्पांसाठी 57 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी तब्बल 4 कोटी 65 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती देण्यासाठी 78 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.

हा अर्थसंकल्‍प महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण व सक्षम आरोग्‍य सेवा यावर आधारित असून ग्रामीण भागाच्‍या सर्वागीण विकासाला गती देणारा ठरणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

चौकट  

अर्थसंकल्पातील ठळक बाबी

▪ एकूण अर्थसंकल्प- 23 कोटी 26 लक्ष रुपये

▪ पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक  4 कोटी 65 लक्ष रुपये

▪ सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याणासाठी मिळून  2 कोटी 72 लक्ष रुपये

चौकट  

प्राधान्याच्या योजना

▪ प्रज्ञा प्रकल्प- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

▪ आधुनिक शेती- ड्रोन, प्रिसीजन फार्मिंग

▪ आरोग्य सेवा- आरोग्‍यदूत उपक्रम, क्षयरोगमुक्त गाव अभियान

0000000









 वृत्त क्रमांक 332

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

नांदेड दि. 17 मार्च :- आर्थिक वर्ष संपत येत असल्याने व नूतन वर्षानिमित्त लोकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने गुरुवार 26 मार्च, शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च व मंगळवार 31 मार्च 2026 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार आहेत. 

ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार सोडून अन्य दिवशी आहे ती कार्यालय त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्टयांपैकी एक दिवस चालू राहतील. 

या दिवसासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याकरीता तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसहीत) कार्यालय देखील कार्यरत ठेवावीत, असे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.

00000

वृत्त क्रमांक 338   नांदेड ग्रंथोत्सव -2025 आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री   नांदेड दि. 18 मार्च :-...