Tuesday, March 17, 2026

 वृत्त क्रमांक 332

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

नांदेड दि. 17 मार्च :- आर्थिक वर्ष संपत येत असल्याने व नूतन वर्षानिमित्त लोकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने गुरुवार 26 मार्च, शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च व मंगळवार 31 मार्च 2026 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार आहेत. 

ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार सोडून अन्य दिवशी आहे ती कार्यालय त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्टयांपैकी एक दिवस चालू राहतील. 

या दिवसासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याकरीता तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसहीत) कार्यालय देखील कार्यरत ठेवावीत, असे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 338   नांदेड ग्रंथोत्सव -2025 आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री   नांदेड दि. 18 मार्च :-...