Monday, May 20, 2024

 वृत्त क्र. 437

21 मे रोजी एक दिवसाचा दुखवटा 

नांदेड दि. 20 मे : इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

 

या शोक दिनी राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यात यावा आणि सदर दिवशी कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेतअसे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 436 

अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्क स्टेशनचे उद्घाटन

 

नांदेड दि. 20 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास 8 नविन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे. या मशिनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक अनेस्थेशिया वर्क स्टेशन मशिनमुळे रुग्णांचे लॅप्रोस्कोपीक ऑपरेशन करणे सोईचे होईल.

 

या मशिनमध्ये Multipara Monitor, Ventilator, Boyle’s Machine (भुल देण्याकरीता लागणारे यंत्र) या सर्व सुविधा एकत्रितरित्या सामाविष्ट असल्यामुळे ते रुग्णांना येणाऱ्या अडचणी दुर होण्याकरीता व रुग्णसेवा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरीता उपयोगी पडणार आहे.  तसेच या मशिनमध्ये रक्तदाब, प्राण वायू, रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोजने, मेंदूचे सुक्ष्म निरीक्षण या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांच्या उपचाराकरीता तसेच पदविपूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याचा उपयोग होणार आहे. रुग्णांच्या उपचारादरम्यान अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी या मशिनचा उपयोग होईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांनी सांगितले. 

 

विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सादर केले आणि या मशिनचे महत्व सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सचिन तोटावार, सहयोगी प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र यांनी या मशिनमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल असे सांगितले.

 

या कार्यक्रमास उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. चंडालिया, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, तसेच अध्यापक वर्ग निवासी डॉक्टर व परिचारीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ. राजकुमार गीते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0000




वृत्त क्र. 435

बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या मंगळवार 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

mahresult.nic.in,http://hscresult.mkcl.org,www.mahahsscboard.in,https://results.digilocker.gov.in, www.tv9marathi.com, http://results.targetpublications.org परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहितीचे प्रिंट आऊट घेता येईल. त्याचप्रमाणे डीजीलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालाबाबत अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत: च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्तकोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://verification.mh-hsc.ac.in स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रत साठी बुधवार 22 मे 2024 ते बुधवार 5 जून 2024 पर्यत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग याद्वारे भरता येतील.

फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी- मार्च 2025 श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनपरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी सोमवार 27 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 434

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 20 :-नांदेड जिल्ह्यात 22 मे 2024 चे 6 सकाळी वाजेपासून ते 5 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 22 मे 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 जून 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 433

कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

नांदेड दि. 20 :-  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारीकर्मचारी यांचे प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ही खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेकृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुखकृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कीडरोग शास्त्रज्ञ प्रा. कृष्णा अंभोरेशास्त्रज्ञ व्यंकट शिंदेनांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईतकिनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीरदेगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.गायकवाडकृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खरीप हंगाम जनजागृती मोहीम-2024 कृषी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी सहायक यांनी खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषी विषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय आराखड्याचे माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमात गावनिहाय कृषी नियोजन आराखडे तयार करणेप्रत्येक गावात सोयाबीन बियाण्याचे पेरणीपूर्व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेणेबीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रावर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी होईल याची दक्षता घेणेशंखी गोगलगाय आणि पैसा/वाणू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन इत्यादी कृषी विषयक कामांचा तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीने व टोकण यंत्राद्वारे बेडवर खरीप पिकांची प्रति कृषी सहाय्यक किमान 100 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे आयोजन करणेविहित कालावधीत माती नमुने गोळा करणे या कामांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व गावातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर कृषी माहितीपर संदेश आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे युट्युब व्हिडिओ पाठविणेविषयी त्यांनी सुचित केले. तसेच कृषी विषयक खरीप हंगाम पूर्व प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक उपविभागात प्रचार रथ आणि घडी पत्रिका वाटपाच्या माध्यमातून शेतकरी जागृती करण्याविषयी त्यांनी सूचित केले. तसेच ज्वारीबाजरीनाचणीभगरराळा आदी भरडधान्य पिकांचे पेरणी क्षेत्र वाढवावे अशा सूचना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी पीक संरक्षण औषधीवरील खर्च कमी करण्यासाठी पहिल्या तीन फवारणी या 5 टक्के निंबोळी अर्काच्या करणेग्राम कृषी विकास समितीमध्ये गाव आराखड्यांना मान्यता घेणेऊस पिकाचे पाचट व्यवस्थापनात संबंधित साखर कारखान्यांचा सहभाग घेणेआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतकृषी आराखड्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीचा समावेश करणे इत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले. तसेच येत्या खरीप हंगामामध्ये मुबलक बियाणेखते यांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणांचा आग्रह टाळण्याविषयी प्रचार प्रसिद्धी करणेबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचित केले. तसेच त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये गोगलगाय व्यवस्थापनसोयाबीनवरील पिवळा मोझॅकतूर पिकावरील मर रोग येवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीनकापूसज्वारीतूरमूगउडीद व हळद पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ कृष्णा अंभोरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकावरील कीडरोग व्यवस्थापन सोयाबीन पिकातील शंखी गोगलगायपिवळा मोझाक तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाविषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये मागील वर्षात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उपविभागनिहाय निवडक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रामगीता पुस्तक देवून गौरव करण्यात आला. यामध्ये गित्ते व्ही.बीगुट्टे एम.एसदिक्कतवार श्रीमती कदमगजेवाड बी.बीजाधव डी.व्हीमिसाळ रामहरी बाळूवानखेडे निलेश रामरावश्रीमती सोनकांबळे सी.जीगित्ते जे.एसतिडके एस.एनवरपडे एस.डीकावटवाड एस. टीचटलावार एम.जी. आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केलेतर आभार उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी मानले.

0000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...