Friday, January 24, 2025

वृत्त क्र. 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक र्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 1.30 वा. नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10.25 वाजेपर्यंत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड. 

सकाळी 10.30 ते 10.50 वाजेपर्यंत आमदार श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा क्षेत्र यांच्या युवा उमेद नामक फेसबुकपेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंत कॉलेज नांदेड. 

सकाळी 11 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- एफ.एम.होंडा शोरुम समोर मामा मराठा हॉटेलच्यापाठिमागे हिंगोलीगेट रोड नांदेड. 

सकाळी 11.15 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून शासकीय वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

0000



 वृत्त क्र.  96

ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा 

नांदेड दि. 24 जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवशीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

 

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एकदिवसीय प्रबोधन पर कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र जाधव प्र. पोलीस अधीक्षक (नांहस ) परिक्षेत्र  नांदेड होते .तर उद्घाटक  अभिजीत राऊत (भा.प्र.से) जिल्हाधिकारी नांदेड हे होते .तर प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (डी वाय एस पी) नांदेड ,श्रीमती छाया कुलाल सदस्य सचिव तथा उपयुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड  श्रीमती शफकत आमना,सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

सर्वप्रथम महापुरुषाच्या प्रतिमेस मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. अभिजीत राऊत  जिल्हाधिकारी नांदेड यांचे शिवानंद मिनगीरे यांनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण  यांनी पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात केले .

   

 मंचावर उपस्थित सर्व मान्यावाराचे  पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. दादासाहेब गीते, माजी उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  प्रशिक्षण विभाग हे एक दिवसीय प्रबोधन पर कार्यशाळेचे प्रस्तावित केले.

 

तदनंतर बार्टी तज्ञ व्याख्याते ट्रेनर सुभाष केकान हे ॲट्रॉसिटी अंतर्गत  होणारे गुन्हाचे  प्रमाण कमी होण्यास करिता प्रेझेंटेशन मार्फत मार्गदर्शन व व्याख्यान दिले. तदनंतर माननीय श्रीमती मीनाकुमारी बतुला डांगे सहाय्यक शासकीय अभियुक्त  यांनी न्यायालयीन प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले . तदनंतर कार्यशाळेचे उद्घाटक अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांनी सदर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याकरिता तालुकास्तरीय समिती स्थापन करून  तालुकास्तरावर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याचे प्रचार व प्रसिद्धी होऊन सदर कायदा अंतर्गत गुन्हेच दाखल होऊ नये,या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

 

श्रीमती शफकत आमना  सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट बद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले तद्नंतर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे अध्यक्ष  जितेंद्र जाधव प्रभारी पोलीस अधीक्षक (ना .ह .स ) नांदेड  त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत मत व्यक्त करून ॲट्रॉसिटी ॲक्ट  अंतर्गत येणारे विविध समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक बार्टी 'पुणे यांनी अभार प्रदर्शन केले व शेवटी ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत एक दिवशीय प्रबोधन पर कार्यशाळेचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर एक दिवशीय कार्यशाळा माननीय श्री.शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज केल्यानंतर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

00000


 वृत्त क्र.  95

समाजकल्याण विभागामार्फत घर घर संविधान उपक्रम 

नांदेड दि.२४ जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने  भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 पासून संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 घर घर संविधान उपक्रम साजरा करण्‍या बाबत शासनाने कळविले आहे. 

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम वर्षभर साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय, दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ अन्वये निर्गमित करण्यात आल्या असून   २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिना निमित्त संविधान अमृत महोत्सव निमित्त घरघर संविधान कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.यास्तव महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालया कडून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया अधिनस्त शासकिय वसतिगृह शासकिय निवासी शाळा येथे २६ जानेवारीला भारतीय संविधानावद्दल माहिती देणारे कार्यक्रमही आयोजीत करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकेचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करून "घर घर संविधान" हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून.  मा. पालक मंत्री महोदयांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजास्ताक दिनाचे ध्वज रोहण होताच मा. पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे प्रति मान्यवरास देण्यात येणार आहे. 

सदर 26 जानेवारी प्रजासताक दिना निमीत्त भारतीय संविधानास 75 वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार असून नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000

 लक्षवेध

सादर निमंत्रण

भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारीला पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे संपन्न होत आहे. सर्व मान्यवर माध्यम प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी सादर निमंत्रित करण्यात येत आहे. कृपया सकाळी ९.१५ ला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाला आपण अर्धा तास आधी उपस्थित रहावे ही नम्र विनंती🙏🏻




वृत्त क्र.  94

राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक

नांदेड दि २४ :- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप झाला.

 आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन व नांदेड जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बुध्दीबळ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल,नांदेड येथे संपन्न झाले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे (आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड) हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड), श्री.अंकुश रक्ताडे (सहसचिव, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना), डॉ.दिनकर हंबर्डे (सचिव,नांदेड जिल्हा बुध्दीबळ संघटना), मा.श्री.निर्मल जांगडे (निरीक्षक, एस.जी.एफ.आय.), श्री. प्रवीण ठाकरे (पंच प्रमुख), श्री.रमेश चवरे (उप आयुक्त, ) प्रा.श्री.इम्तियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
 
समारोप कार्यक्रम प्रसंगी मा. डॉ.महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, शालेय जिवनात बुध्दीबळ हा खेळ अतिशय महत्वाचा असून शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करीयर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन डॉ.राहुल श्रीरामवार यांनी केले.
या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत संपुर्ण भारतातून 33 मुले , 30 मुली असे एकण 63 मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

14 वर्षे मुली मध्ये प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय- गुजरात,  तृतीय- तमीळनाडू.

14 वर्षे मुले-  प्रथम- प्रथम- सीबीएसई , द्वितीय- महाराष्ट्र ,  तृतीय- गुजरात या संघानी प्राविण्य प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्य प्रथम आलेल्या मुलीच्या संघामध्ये निहीरा कौल, सई पाटील, पलक सोनी, व्रितीका गमे, दिव्यांशी खंडेलवाल तर मुलांमध्ये द्वितीय आलेल्या संघात - विवान सरावगी, शौनक बडोले, विक्रमादित्य चव्हाण, निहान पोहाणे,  ध्रुवा पाटील या खेळाडूचा समावेश होता. या संघाचे प्रशिक्षक डॉ. निलकंठ श्रावण, श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर हे होते तर संघ व्यवस्थापक म्हणुन श्री. संजय बेतीवार व श्री. विपुल दापके यांनी काम पाहीले.

या राष्ट्रीय स्पर्धेतील मुले व मुली यांना वैयक्तिक कामगिरी नुसार बोर्ड पारितोषक गोल्ड सिल्वर व ब्रांझ ए बी सी डी व इ टेबल वरील खेळाडूंना देण्यात आले. सदरील खेळाडू अनुक्रमे  मुले A) 1) कवीन ई ( सी बी एस इ ) 2) सणुश (केरळा) 3) मोतीवाल (गुजरात) B) 1) वल पटेल (गुजरात) 2) मितांश दीक्षित (केंद्रीय विद्यालय ) 3) आहन माथुर (सी आय बी एस एस ) C) 1) बडोले शोनक (महाराष्ट्र ) 2)प्रभ मनसिंग मलहोत्रा ( चंदीगड ) 3) मनियार हरीडे (सीआयएसइ ) D1) निहान पोहाने ( महाराष्ट्र ) 2)साहिल (केरळा ) 3)श्री साई वेदांश (केरळा ) E 1) कथिर टी (तामिळनाडू ).

मुलीमध्ये  A1) थारुणिका (तामिळनाडू ) 2 )अपूर्वा भोळे (तेलंगाना ) 3) पलक सोनी (महाराष्ट्र) B 1) शोमे अधित्री (गुजरात) 2) अनविथा प्रवीण (केरळा) 3) रितिका गमे (महाराष्ट्र) C 1) अर्पिता पाटणकर( गुजरात) 2) दिव्यश्री कोलीपरा( कौन्सिल इंडियन) 3) निहिरा कौल (महाराष्ट्र) D 1)  दुसिका चंदीगड 2) दिना पटेल( गुजरात) 3 )अभिष्री दिपू (बिहार)  E 1) श्रुती बोला (आंध्र प्रदेश)  2 )अनुषा( केरळा) 3)हिया शर्मा (चंदीगड).

या स्पर्धेकरीता मुख्य पंच म्हणुन श्री. प्रवीण ठाकरे तर पंच म्हणुन श्री. अमरीश जोशी (छत्रपती संभाजीनगर), श्री. शार्दुल तापसे (सातारा), श्री. भुपेंद्र पटेल (अहमदाबाद, गुजरात), श्रीमती पल्लवी कदम (अंबेजोगाई, बीड), श्रीमती सुचिता हंबर्डे (नांदेड), श्री. गगनदिपसिंघ रंधावा (नांदेड), श्री. शिषीर इंदुरकर (नागपूर), श्री. नथ्‍थु सोमवंशी (जळगांव), श्री. चैतन्य गोरवे (परभणी) श्री. सिध्दार्थ हटकर (नांदेड), श्री. प्रशांत सुर्यवंशी (नांदेड), श्रीमती ऋतुजा कुलकर्णी (नांदेड) आदीनी काम पाहीले.

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, डॉ. निलकंठ श्रावण (क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली), डॉ. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी)  विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे. संजय चव्हाण,  आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे.सुशिल कुरुडे, कपील सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बुध्दिबळ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.
0000




वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...