Friday, December 18, 2020

 

23 कोरोना बाधितांची भर तर

25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  शुक्रवार 18 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 23 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 177 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 966 एवढी झाली असून यातील 19 हजार 935 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 272 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 562 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, अर्धापूर तालुक्यात 1, हिंगोली 2 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हदगाव तालुक्यात 2, देगलूर 2, यवतमाळ 1 असे एकुण 11 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 272 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 26, मुखेड कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 9, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 102, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 34, हैदरबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 21 आहेत.   

शुक्रवार 17 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 68 हजार 537

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 43 हजार 535

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 966

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 935

एकुण मृत्यू संख्या-562

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-452

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-272

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

000000

 

निर्यातक्षम फळे भाजीपाला वाणांची शक्य / अशक्यता

तपासणीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यामध्ये फळे भाजीपाला क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. केळी, आंबा, पेरु, मोसंबी या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. तसेच फळपिके भाजीपाला निर्यातीसाठी मोठा वाव नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. निर्यातक्षम दर्जाची फळे भाजीपाला उत्पादन करुन निर्यात करणेसाठी शेतीमाल असणे आवश्यक आहे. आशा मागणीची पुर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे भाजीपाला पिकांची शेतकऱ्यांनी शक्य / अशक्यता नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

किडनाशक उर्वरित अंश किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी आंबा फळपिकासाठी मँगोनेट, डाळिंब पिकासाठी अनारनेट, मिर्ची, भेंडी, टोमॅटो इतर पिकासाठी व्हेजनेट लिंबु, मोसंबी, संत्रा फळपिकासाठी सिट्रसनेट ही प्रणाली विकसीत केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने नोंदणी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावा. ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी फलोत्पादन विभाग अपेडा मार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल ॲ डाऊनलोड करुन त्यामध्ये स्वत:ची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक भरुन ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी यांचेकडे अर्ज दाखल करण्याची सुविधा ऑनलाईन पध्दतीने करता येईल. यासंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...