Saturday, March 3, 2018


मराठा समाज आरक्षणासंदर्भात
नांदेडला 5 मार्च रोजी सुनावणी ;
संबंधितांना निवेदने सादर करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा उच्च  न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात सुनावणी सोमवार 5 मार्च 2018 रोजी नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहा सकाळी  10 ते सायं 5 यावेळेत घेणार आहे. या विषयाशी संबंधीत ज्ज्ञ, समाजसेवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह आयोगासमोर सादर करावे,  असे आवाहन संपर्क अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेले प्रमाण याविषयी शासनास अहवाल सादर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा मा. उच्च  न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड येणार आहेत. त्यांचे समवेत डॅा. सर्जेराव निमसे- तज्ञ सदस्य, . राजाभाऊ करपे- सदस्य, रोहीदास जाधव, सदस्य या मान्यवरांचा समावेश आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000

 पीक कर्जमाफीचे अर्ज करण्यास 31 मार्च मुदत
वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 3 :-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 1 ते 31 मार्च 2018 यादरम्यान उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे  दि. 28 फेब्रुवारी, 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला  असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी 31 मार्च, 2018 पर्यंत  आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
पीक कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी व पीक कर्ज प्रोत्साहनपर लाभ योजना 28 जून 2017 चे शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 1 एप्रील 2009  ते 31 मार्च 2016  या कालावधीत पीक कर्ज  घेतलेल्या  व अशा कर्जापैकी   30 जून 2016  रोजी थकबाकीदार आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. याव्यतिरिक्त 2015-16 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल करुन मुदतीत परतफेड केली आहे. तसेच 2016-17 पुन्हा कर्जाची उचल करुन 31 जुलै 2017 अखेर परतफेड केली आहे अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारांच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र काही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानूसार आता 1 मार्च, 2018 ते 31 मार्च, 2018 दरम्यान   आपले सरकार  पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. यासाठी अर्ज करणारा शेतकरी व त्यांच्या कुटुबांचे प्रमाणिकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रिक पध्दतीने  किंवा मोबाईल ओटीपीद्वार केल्यानंतर संबंधत अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत.
कर्जमाफी योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या अधारे ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
000000


रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन
नांदेड, दि. 3 :-  बेरोजगार उमेदवारांसठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेवतीने बुधवार 7 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय फुल मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यास दोन नामाकिंत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, ॲडव्हायझर या पदाची संख्या जवळपास 180 असून किमान शैक्षणिक पात्रता एसएससी पास वेतन 8 ते 12 हजार रुपये, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.
इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन इन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...