Thursday, March 14, 2019


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण
नांदेड दि. 14 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत नांदेड तालुक्यातील एकूण 39 शाळांमध्ये निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 559 विद्यार्थी बक्षिसास पात्र ठरले. त्यापैकी प्रथम आलेल्या 113 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उर्वरित 446 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्राचे वाटप दि. १४ मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सर्जिकल हॉल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी श्री दिग्रसकर, उद्घाटक म्हणून जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. बी. पी. कदम, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, मनपाचे शिक्षणाधिकारी श्री बनसोडे, नोडल अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर, गटशिक्षणाधिकारी, संबंधीत शाळांचे मुख्याधापक व प्रथम पुरस्कार विजेते विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी तंबाखू मुक्त शाळा, विद्यार्थांचा सहभाग तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कोटपा कायदा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रकारच्या स्पर्धा व कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू दुष्परिणामाबाबत माहिती होऊन, मुले तंबाखू व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते असे मत उपस्थित मुख्याध्यापक प्रतिनिधींनी व्यक्त केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांचे कार्य उत्कृष्ट असून जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे असे प्रतिपादन कार्यक्रम अध्यक्ष यांनी भाषणामध्ये केले.
सूत्रसंचालन डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. डी. एन. हजारी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्रयोग शाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, दत्तात्रय सवादे आदींनी परिश्रम घेतले.  
000000



लोकसभा निवडणूक
विविध बाबींवर निर्बंध आदेश
नांदेड दि. 14 :- भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूकीचे कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  विविध निर्बंधाबाबत आज आदेश निर्गमीत केले आहेत.
कार्यालय / विश्रामगृह  परिसरात
मिरवणूका, घोषणा, सभा घेण्यास निर्बंध                                  
            जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आदी प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
ध्‍वनीक्षेपकाचा वापर  
            जिल्ह्यात कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा लाऊडस्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजे पुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
वाहनाचा वापर, पक्ष कार्यालये,
सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध
            जिल्ह्यात कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्‍यास, जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. तसेच संबंधीत पक्षांचे चित्रे / चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे, शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास निर्बंध घालण्‍यात आला आहे, हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
मतदानाच्या दिवशी 
मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू   
जिल्‍ह्यात ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्‍याठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हेंचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्‍यात आले आहे. हा आदेश 18 एप्रिल 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान होईपर्यंत अंमलात राहील.
उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास तसेच वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये 3 पेक्षा जास्‍त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्‍या 100 मिटरचे परिसरात आणण्यास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी पाच व्‍यक्‍ती पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास प्रतिबंध घालण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी 11 मार्च ते 29 मार्च 2019 पर्यंत अंमलात राहील.
0000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात 22 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 ते 22 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 14 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 फेब्रुवारी 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 मार्च 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
संबंधीत पक्षांचे चित्रे/चिन्हांचे कापडी फलके,
सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर निर्बंध
नांदेड दि. 14 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी संबंधीत पक्षांचे चित्रे / चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात आली आहेत. हा आदेश जिल्ह्यासाठी 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहिल असे आदेशात नमूद केले आहे. 
000000


दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात
प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 14 :-  जिल्ह्यात दहावी परिक्षा केंद्रावर 22 मार्चपर्यंत तसेच बारावी परिक्षा केंद्रावर 20 मार्चपर्यंत परिक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये काढले आहेत.
000000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी
नांदेड दि. 14 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी / कर्मचारी, बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेतील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे  20 सप्टेंबर 2014 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारकाव्यतीरीक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी घातली आहे. हा आदेश जिल्ह्यासाठी 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहिल असे आदेशात नमूद केले आहे.  
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...