Thursday, March 14, 2019


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण
नांदेड दि. 14 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत नांदेड तालुक्यातील एकूण 39 शाळांमध्ये निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 559 विद्यार्थी बक्षिसास पात्र ठरले. त्यापैकी प्रथम आलेल्या 113 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उर्वरित 446 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्राचे वाटप दि. १४ मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सर्जिकल हॉल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी श्री दिग्रसकर, उद्घाटक म्हणून जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. बी. पी. कदम, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, मनपाचे शिक्षणाधिकारी श्री बनसोडे, नोडल अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर, गटशिक्षणाधिकारी, संबंधीत शाळांचे मुख्याधापक व प्रथम पुरस्कार विजेते विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी तंबाखू मुक्त शाळा, विद्यार्थांचा सहभाग तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कोटपा कायदा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रकारच्या स्पर्धा व कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू दुष्परिणामाबाबत माहिती होऊन, मुले तंबाखू व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते असे मत उपस्थित मुख्याध्यापक प्रतिनिधींनी व्यक्त केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांचे कार्य उत्कृष्ट असून जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे असे प्रतिपादन कार्यक्रम अध्यक्ष यांनी भाषणामध्ये केले.
सूत्रसंचालन डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. डी. एन. हजारी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्रयोग शाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, दत्तात्रय सवादे आदींनी परिश्रम घेतले.  
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...