Wednesday, April 26, 2017

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेचा आज
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
उडानचे व्हिडीओलिंकींगद्वारे उद्घाटन
नांदेड दि. 26 :- ‘उडान- उडे देश का आम नागरिक या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील नांदेड –हैद्राबाद विमान सेवेचा गुरूवार 27 एप्रिल 2017 रोजी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. व्हिडीओलिंकीगद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता विमान सेवेचे उद्घाटन करतील.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत आदी मान्यवरांचा विशेष निमंत्रितात समावेश राहील.  
उडानमध्ये समाविष्ट नांदेड-हैद्राबाद या विमान सेवेसह, शिमला ते दिल्ली तसेच शिमला ते कडपा या विमानसेवेचाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिमला येथून प्रारंभ करण्यात येईल. या कार्यक्रमाचे व्हिडीओलिंकींगद्वारे थेट प्रक्षेपण कार्यक्रमात होणार आहे.
000000


मी मुख्यमंत्री बोलतोय...
संवाद युवा पिढीशी
प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या कडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी सर्व-सामान्यांना देणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी विद्यार्थ्यांसाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा’ या विषयावर प्रश्नोत्तरे होणार आहेत. 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेतवैयक्तिक नसावेतअशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दिनांक 2 मे 2017 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत mmb.dgipr@gmail.com या ईमेलवर आणि 8291528952 या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरुपात किंवा ऑडिओ रेकॉर्ड करुन स्वत:च्या छायाचित्रासह पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००० 
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
            नांदेड दि. 26 :- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या गुरुवार 27 एप्रिल रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            गुरुवार 27 एप्रिल 2017 रोजी पुणे येथून हेलिकॉप्टरने सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळावर आगमन व केंद्र शासनाच्या "उडान" योजनेच्या उद्घाटनास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. शासकीय हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण करतील.

00000
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा
 नांदेड दि. 26 :-   राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप, पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे गुरुवार 27 एप्रिल रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 27 एप्रिल 2017 रोजी  पुणे येथून शासकीय हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे होणाऱ्या नांदेड ते हैद्राबाद विमानसेवेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- नांदेड विमानतळ नांदेड. सकाळी 11.45 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण करतील.

000000
महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 26 :- व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करीत असलेल्या संबंधीत स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र व इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांच्याकडे रविवार 30 एप्रिल 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यु. डी. तोटावाड यांनी केले आहे.

00000
शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे उपलब्ध
16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 25 :-  खरीप रब्बी हंगाम 2017 मध्ये "उन्नत शेती समृध्द शेतकरी" ही मोहिम राबवली जाणार आहे. यामोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. यासाठी शासन अनुदान पण देत आहे. या औजारांचे अनुदान दर शासनाने निश्चित केले आहेत. र्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छ शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आपला अर्ज मंगळवार 16 मे 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करावा, असे आवाहन असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर कम बाईंडर, रिपर, नांगर, कल्टीव्हेटर, सबसॉयलर, रोटावेटर, प्लांटर (खत बिपेरणी यंत्र), पॉवर विडर,  थ्रेसर, ट्रॅक्टर माऊंटेड / ऑपरेटेड स्प्रेअर, मिनी राईस मील मिनी दाल मिल आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पॉलिशर, क्लिनर कम ग्रेडर, ग्रॅडीयंट सेपरेटर, स्पेशिफिक ग्रॅव्हीटी सेपरेटर, भात लावणी यंत्र, भात मळणी यंत्र, पाचरट कुट्टी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र इ. औजारे अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी ांना किंमतीच्या 35 टक्के किंवा 1 लाख ते 1 लाख 25 हजार इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार ते 1 लाख अनुदान देय आहे. कृषि औजारांसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प, भुधारक शेतकरी महिला शेतकरी यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादा इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. औजारे, यंत्रनिहाय अनुदान मर्यादा तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
र्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आपला अर्ज मंगळवार 16 मे 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करावयाचा आहे. यातारखे नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच कृषि विभागाच्या वेबसाईटवर www.krishi.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. अर्जासोबत 7/12, 8-, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, फोटो असलेले ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र, औजारांचे अधिकृत विक्रेत्यांचे दरपत्रक, कोटेशन जोडावे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल निवड केलेल्या लाभार्थ्यांना औजारे, यंत्र खरेदीची पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्यामध्ये औजार खरेदी करणे बंधनकारक आहे. नसता पूर्वसंमती आपोआप रद्द समजली जाईल. खरेदी केलेल्या औजाराचे केंद्र किंवा राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने (बीआयएस किंवा अन्य सक्षम संस्था) तपासणी प्रमाणपत्र, तपासणी अहवाल सादर करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. औजारांच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थींची राहणार आहे. अर्ज करतांना यापुर्वी लाभार्थ्यांने कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
खुल्या बाजारातून औजारांची खरेदी करताना शेतकऱ्यांना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (आर.टी.जी.एस.), धनादेश, धनाकर्ष विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विक्रेत्याशी रोखीने व्यवहार करता येणार नाही.
प्रत्येक औजारांसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, ज्या औजारांस जास्तीतजास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, औजारास अनुदान दिले जाईल. जे शेतकरी केवळ ट्रॅक्टर चलित यंत्र, औजारांकरीता अर्ज करतील त्यांना अर्जासोबत त्यांचेकडे ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) जोडणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या औजारांची तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी पण अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, कृषि विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...