Tuesday, June 16, 2020


वृत्त क्र. 552   
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 16.75 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात मंगळवार 16 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 267.98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 97.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10.95 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 31.25 (133.52), मुदखेड- 15.00 (76.01), अर्धापूर- 15.00 (68.66), भोकर- 16.75 (119.75), उमरी- 27.00 (85.67), कंधार- 11.67 (82.68), लोहा- 27.33 (95.83), किनवट- 17.57 (94.56), माहूर- 25.25 (105.50), हदगाव- 9.71 (95.57), हिमायतनगर- 8.00 (120.34), देगलूर- 5.67 (99.93), बिलोली- 10.20 (65.00), धर्माबाद- 18.67 (112.99), नायगाव- 11.20 (87.80), मुखेड- 17.71 (117.84). आज अखेर पावसाची सरासरी 97.60 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1561.65) मिलीमीटर आहे.
00000

सुधारीत वृत्त क्र. 551


24 व्यक्ती कोरोना बाधित
14 पुरुष व 10 महिलांचा समावेश
बरे झाल्याने तिघांना रुग्णालयातून सुट्टी  
नांदेड (जिमाका) दि. 16 :-जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 24 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने एकूण संख्या 286 वर पोहचली आहे. नवीन बाधितांमध्ये 14 पुरुष तर 10 महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 3 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
या 24 बाधितांपैकी नांदेड सोमेश कॉलनी येथील 3 पुरुष वय अनुक्रमे 22,41,53 23 वर्षाची एक महिला आहे. शिव विजय कॉलनी येथील 67 वर्षाचा एक पुरुष व तीन महिला वय वर्षे अनुक्रमे 3, 37 61 आहे. श्रीकृष्णनगर येथील 61 वर्षाचा एक पुरुष व 29 वर्षाची एक महिला आहे. फरांदेनगर येथील 55 वर्षाचा एक पुरुष असून एमजीएम परिसरातील 30 वर्षाचा एक पुरुष आहे. विशालनगर येथील 49 वर्षाचा एक पुरुष, बरकतपुरा येथील 36 वर्षाचा एक पुरुष, परिमलनगर येथील 55 वर्षाचा एक पुरुष आहे. चिखलवाडी येथील 52 वर्षाची एक महिला, दिपनगर येथील 19 वर्षाची एक महिला, मुखेड येथील 3 पुरुष वय वर्षे अनुक्रमे 11, 30, 55 व तीन महिला वय वर्षे अनुक्रमे 38, 50, 65 असे आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील 38 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या 278 अहवालांपैकी 230 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. 
आतापर्यंत 286 बाधितांपैकी 180 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 93 बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52  54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. मंगळवार 16 जून रोजी 167 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण-
 1 लाख 45 हजार 464,
घेतलेले स्वॅब
 5 हजार 397,
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 630,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 24,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 286,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या
 220,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-86,
मृत्यू संख्या-
 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 180,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 93,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 167 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
                                                                         00000  


*आज १६ जून सा. ६.३० वा*  *जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोंडेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे*
*फेसबुक लाईव्हवर*
सायंकाळी ६.३० वाजता क्लिक करा   
या लिंकवर. 
*सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत.*    

जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी दिली आहे. ग्रामीण भागात पेरणीचे नियोजन व शेतीविषयक कामाची लगबग सुरू आहे. अशा या वातावरणात दरवर्षी प्रमाणे दूषित पाण्यापासून होणाऱ्या साथ रोगांच्या प्रमाणात भर पडते. हिवताप, मलेरिया, अतिसार व इतर आजार डोके वर काढतात. 
स्वाभाविकच याचा ताण कोरोनाशी लढ्यात परिपूर्ण विजय मिळविण्यासाठी सज्ज असलेल्या शासकीय यंत्रणेवर, आरोग्य यंत्रणेवर पडणार आहे. हा असा एक लढा आहे ज्यात आपले सर्वच नागरिक आशा लावून बसले आहेत. आपला जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा लागेल. प्रत्येक नागरिकाने कोरोना होऊ नये यासाठी सुरक्षिततेचे काही बदल आपल्या आचरणात आणावे लागतील. न चुकता मास्क वापरणे, कोणत्याही नवीन वस्तूला हात लागल्यास साबणाने हात स्वछ करणे, मनस्वास्थ्य टिकविणे, आयुष मंत्रालयाने सुचविलेले उपाय अवलंबीने, प्राणायाम, योगाचा सराव या अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत.  
कोरोनाशी लढ्यात आपल्याला यशस्वी होण्यासाठी शासनाच्या प्रयत्नात स्वतःहून सहभागी व्हावे लागेल. 

आपण यात कसे योगदान देऊ शकतो, देशासमोर निर्माण झालेल्या  या आव्हानात नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य कसे बजावू शकतो याचा विचार करावा लागेल. 

आज फेसबुक लाईव्हवर आपले जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर आपल्याशी सायंकाळी ६.३० वाजता या महत्त्वपूर्ण विषयावर सुसंवाद साधतील. 
*आज १६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता क्लिक करा* https://www.facebook.com/dionanded/
या लिंकवर. 
*सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत*.

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...