Saturday, August 3, 2019

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.97 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात रविवार 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 479.53 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 389.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40.47 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 28.88 (351.30), मुदखेड- 20.67 (411.02), अर्धापूर- 31.33 (354.64), भोकर- 20.00 (397.45), उमरी- 14.33 (363.77), कंधार- 21.33 (328.16), लोहा- 21.00 (296.90), किनवट- 58.57 (578.53), माहूर- 72.75 (562.09), हदगाव- 55.14 (416.14), हिमायतनगर- 49.33 (485.02), देगलूर- 10.33 (238.32), बिलोली- 16.40 (417.40), धर्माबाद- 21.33 (352.32), नायगाव- 19.00 (370.80), मुखेड- 19.14 (306.69). आज अखेर पावसाची सरासरी 389.41 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6230.55) मिलीमीटर आहे.
00000


नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्हा
विभागीय स्‍तरावरील प्रशिक्षण वर्ग व चर्चा सत्र
 डिजीटल इंडीया भुमिअभिलेख
आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 3 :- जमाबंदी आयुक्‍त पुणे व औरंगाबाद विभागीय आयुक्‍त यांच्‍या निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्‍हा नियोजन भवन येथे डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे एक दिवसीय विभागीय स्‍तरावरील प्रशिक्षणसत्राचे आयोजन शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी करण्‍यात आले होते.   
या कार्याक्रामाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांचे हस्‍ते करण्‍यात आले असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशोक काकडे, मनपा आयुक्‍त लहुराज माळी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक संजय जाधव, हे उपस्थित राहुन प्रशिक्षणार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपस्थित होते. 
जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा शासनाचा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अचूक, संगणकीकृत व डिजीटल स्‍वाक्षरियुक्‍त ना.नं.न. 7/12 व 8 अ उपलब्‍ध होणार असल्‍याने आणि सर्व फेरफार ऑनलाईन पध्‍दतीने होत असल्‍याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम कमी होणार आहे.  संगणकीकरणामुळे 7/12 अभिलेखात येणारी सुरक्षितता व पारदर्शकतेबाबत आपले विचार व्‍यक्‍त केले.

या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्‍हयासह लातुर, परभणी व हिंगोली या जिल्‍हयाचे निवासी उपजिल्‍हाधिकारी, सर्व जिल्‍ह्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी,  तहसिलदार, नायब तहसिलदार तथा डीबीए तसेच प्रत्‍येक तालुक्‍यातील  दोन मंडळ अधिकारी व दोन तलाठी असे सुमारे 500 अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाचे डिजीटल इंडीया भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम प्रकल्‍पाचे राज्‍य समन्‍वयक तथा उपजिल्‍हाधिकारी रामदास जगताप यांनी दोन सत्रामध्‍ये ई-फेरफार प्रणाली अंतर्गत विकसीत करण्‍यात आलेल्‍या विविध संगणकीय अज्ञावली वापराची कार्यपध्‍दती / सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देवून संगणक प्रणालीमध्‍ये प्रत्‍यक्ष अंमलबजाणीत येणाऱ्या अडचणीबाबतचे  चर्चासत्राद्वारे शंकानीरसन केले.  
या कार्यशाळेची प्रस्‍तावना निवसी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केली तर कार्यक्रामाचे सुत्रसंचलन संगायो तहसिलदारश्रीमती वैशाली पाटील, यांनी केले. कार्यक्रमांचे संपुर्ण नियोजन जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्‍ल कर्णेवार यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडले. 
00000

जिल्हयातील स्कुलबससाठी थांबे निश्चित



नांदेड दि. 3 :- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात स्कुलबसची थांबे निश्चित करण्यात आली आहेत.  
जनहित याचिका क्र.2 / 2012, द कोर्ट ऑन ईटस ओन मोशन विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर नांदेड जिल्हयातील स्कुलबससाठी थांबे निश्चित करण्याबाबत नांदेड प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा प्राधिकरणाचा निर्णय ठराव क्र. 2 / 2019 दि. 29 जुलै 2019 अन्वये अधिसुचना 31 जुलै रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव शैलश कामत यांनी प्रसिद्ध केली आहे.
या अधिसूचनेत नमूद केले आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 117 नुसार शासनाने जारी केलेल्या अधिसूचना क्र. MVA.0589/ CR-1061-TRA-2 दिनांक 19 मे 1990 नुसार थांबे निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक परिवहन प्राधिकरणाचे मत नोंदविणे वरील कलमान्वये तरतूद आहे.
शालेय मुला / मुलींना ने-आण करणा-या स्कुल बसेसचे थांबे निश्चित करण्याबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी जनहित याचिका क्र.02/2012 मध्ये दिनांक 7 मार्च 2018 रोजी आदेश जारी केले आहेत.
त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन विभाग, पोलीस विभाग महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांचे प्रतिनिधीना स्कुल बस थांबे निश्चित करण्याचे निर्देश 23 जुलै 2019 देण्यात आले होते. सर्व संबंधितांनी नांदेड जिल्हयातील 16 तालुक्यांमध्ये सर्व्हे करुन स्कुलबस थांबे निश्चित केले असून त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास सादर केला आहे.
हे स्कुल बस थांब्याच्या अहवालास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर परिचलन पध्दतीने ठेऊन प्राधिकरणाचा ठराव क्र. 2 / 2019 दिनांक 29 जुलै 2019 अन्वये मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे अटी शर्ती ठरविण्यात आल्या आहेत.
या थांब्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही. जिल्हयात विकासाच्या दृष्टीने महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका विभाग यांच्याकडून स्कुलबस थांबे वाहतुकीच्या सुविधेनुसार बदलविण्यासाठी किमान 3 दिवसांची पूर्व सुचना देण्यात येईल. या थांब्यावर कोणत्याही वाहनास एका वेळेस 5 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीसाठी उभे राहता येणार नाही. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिकाकडून अशा ठिकाणी थांब्याचे निर्देशक म्हणून फलक उभारण्यात येतील. वाहन चालकास थांब्याच्या ठिकाणी वारंवार हॉर्न वाजवता येणार नाही. सदर स्कुलबस थांब्यासाठी शासनाच्या स्थानिक प्राधिकरणाच्या अटी शर्ती लागू राहतील.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे नियम 110 खाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या थांब्याना सर्वसामान्य नागरिकांना माहितीसाठी व शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वरील अटी शर्तीच्या अधीन राहून अधिसूचीत केले आहे.
नांदेड मधील 16 तालुक्यामध्ये निश्चित केलेले स्कुलबस थांबे खालील प्रमाणे आहेत -
स्कूल बस थांबे बाबतची माहिती
नांदेड शहर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
हडको स्टॉप
साई मंगल कार्यालय जवळ
2
ज्ञानेश्वर नगर
ढगे हॉस्पीटल जवळ
3
सिडको स्टॉप
शिवाजी पुतळा जवळ
4
क्रांती चौक
राज कॉर्नर क्रांती चौक
5
एलआयसी कार्यालय सिडको
एलआयसी कार्यालयासमोर
6
संभाजी चौक, सिडको
कुसुमताई शाळे जवळ
7
वसंतराव नाईक कॉलेज, सिडको
वसंतराव नाईक कॉलेज समोर
8
लातुर फाटा नविन मोढा
लायन्स क्लब आय- हॉस्पीटल जवळ
9
ढवळे कॉर्नर, सिडको
अलाम्मा ईकबाल उर्दू शाळेजवळ
10
रमामाता आंबेडकर चौक,सिडको
उस्माननगर रोड, ढवळे कॉर्नर जवळ, सिडको
11
दूध डेअरी, सिडको
दूध डेअरी समोर
12
वसरणी
वसंतराव नाईक कॉलेज समोर
13
कौठा नाका
पोलीस चौकी जवळ
14
डॉ.आंबेडकर चौक (लातूर फाटा)
लातूर फाटा जवळ
15
नांदेड स्केअर मॉल
नांदेड स्केअर मॉलच्या बाजूला
16
माहेश्वरी भवन
माहेश्वरी मंगल कार्यालयाजवळ
17
जुना मोंढा
पोलीस चौकी जवळ
18
विष्णूपूरी
असर्जन कमान जवळ (काळेश्वर कमान)
19
सरकारी दवाखाना
सरकारी दवाखाना गेटसमोर
20
लूटे मामा चौक
मामा चौक जवळ
21
नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा
नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कंपाऊंड मध्ये
22
सप्तगिरी प्लाझा, कौठा
सप्तगिरी प्लाझा समोर
23
रविनगर, कौठा
रविनगर चौक मेडीकल जवळ
24
कौठा, जुना मोंढा
पुलाजवळ (दोन्ही बाजूस)
25
तिरंगा चौक
पोलीस अधीक्षक मुख्यालयासमोर
26
पोलीस अधीक्षक कार्यालय
पोलीस अधीक्षक कार्यालय चौक
27
आयुर्वेदीक दवाखाना
आयुर्वेदीक दवाखाना समोर
28
शिवाजीनगर
अलीभाई टावर समोर
29
डॉक्टर लेन
कदम हॉस्पीटल जवळ
30
गणेशनगर
अग्नीशमन कार्यालय जवळ
31
कँब्रीज स्कूल
कँब्रीज स्कूलच्या गेट समोर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
32
आयटीआय चौक
हॉटेल गोदावरी समोर
33
शासकीय विश्रामगृह (सा.बां.वि)
शासकीय विश्रामगृह (सा.बां.वि) समोर
34
पोलीस कॅलनी
स्नेहनगर, पोलीस कॅलनीमध्ये
35
श्रीनगर
पंचशील ड्रेसच्या दुकानासमोर
36
एसटी वर्कशॉप
वर्कशॉप गेट समोर
37
राज कॉर्नर
राज हॉटेलच्या बाजूला
38
शेतकरी चौक
वट्टमवार मेडीकलच्या समोर
39
फरांदे होंडा शोरुम
फरांदे होंडा शोरूम समोर
40
छत्रपती चौक
बजाज फंक्शन हॉलच्या बाजूला
41
मोर चौक
मोर चौकच्या बाजूला
42
फरांदे पार्क
फरांदे पार्कच्या बाजूला
43
वाडी
शर्मा गॅस एजन्सीच्या समोर
44
गणेश नगर पॉईंट
गणेश नगर पॉईंट जवळ
45
जलसंपदा विश्रामगृह वर्कशॉप
जलसंपदा विश्रामगृहाच्या बाजुला
46
ग्यानमाता स्कूल
ग्यानमाता शाळेच्या कंपाऊंडमध्ये
47
नमस्कार चौक
एसबीआय बँकेसमोर
48
एमजीएम कॉलेज
एमजीएम कॉलेज जवळ
49
जानकीनगर, हनुमानगड
साईबाबा शाळाडी.पी.जवळ
50
महाराणा प्रताप चौक
एलआयसी ऑफीसच्या समोर
51
नागार्जुना हॉटेल
गुंडेगांवकर पेट्रोल पंपाच्या बाजूला
52
दूर्गा कॉलनी (वसंतनगर)
एम.एफ.होंडा शोरुमच्या बाजूला
53
मगनपूरा
स्वामी समर्थ केंद्राजवळ
54
आनंदनगर
देना बँकेच्या बाजूला
55
आनंदनगर
राज मॉलच्या समोर
56
विद्युतनगर
राठोड हॉटेलच्या बाजूला
57
भाग्यनगर
भाग्यनगर कमानीसमोर
58
अशोक नगर
दत्ता मंदिरच्या बाजूला
59
यशवंतराव चव्हाण कॉलेज
महात्मा फुले शाळेजवळ
60
मस्तानपूरा
महादेव दालमिल समोर
61
साठे चौक
साठे चौकाच्या बाजूला
62
चिखलवाडी कॉर्नर
भालेराव हॉस्पीटलच्या समोर
63
गुरुद्वारा
हनुमान मंदिराजवळ
64
सराफा चौक
पोलीस चौकीच्या बाजूला
65
होळी
हनुमान मंदिर जवळ वाचनालय जवळ
66
चौफाळा
पोलीस चौकीच्या जवळ
67
सिध्दनाथ पूरी
मंसूर खान/कंदाज हवेली जवळ
68
बर्की चौक
महाराष्ट्र स्वीट मार्ट जवळ
69
खोजा कॉलनी
मेमन फंक्शन जवळ
70
वाजेगांव रोड
पोलीस चौकी जवळ
71
देगलूर नाका
आमेर फंक्शन हॉल जवळ
72
देगलूर नाका
डी.के. फंक्शन हॉल समोर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
73
हैदरबाग, देगलूर नाका
डिलक्स फंक्शन हॉल समोर
74
बाफना टी पॉईंट
आयकर भवन समोर
75
हिंगोली गेट
अनुराधा पॅलेस हॉटेल जवळ
76
नंदीग्राम सोसायटी
खुराणा पार्कींग समोर महाजन अर्थ मुव्हर्स जवळ
77
अबचलनगर
फतेहसिंग मंगल कार्यालय जवळ
78
आसना
हरिओम हॉटेल जवळ
79
गोपालनगर/सांगवी बस स्टॉप
व्यंकटेश किराणाजवळ
80
भवानी चौक
भुजबळ फायनान्स जवळ
81
डी.आर.एम.ऑफीस गेट नं.2
डी.आर.एम.ऑफीस समोर
82
महादेव मंदिर, चैतन्यनगर
महादेव मंदिरा समोर
83
चैतन्यनगर आंब्याचे झाड
चैतन्यनगर आंब्याचे झाडासमोर
84
संदिपानी स्कूल
श्रीकृष्ण मंगल कार्यालयसमोर
85
यु.पी.पी.विश्रामगृह
तरोडेकर चेंबर्स जवळ
86
तरोडा नाका
भाग्यनगर पोलीस स्टेशन जवळ
87
भावसार चौक
भावसार चौकाच्या बाजूला
88
गजानन मंदिर कमान
गजानन मंदिर कमानसमोर
89
पासदगाव
जिल्हा परिषद शाळे जवळ
90
किड्स किंगडम
किड्स किंगडम शाळे जवळ
91
डी.मार्ट
डी.मार्ट समोर
92
गुरुजी चौक
सम्राट चौकच्या बाजूला
93
कामठा
आरोग्य केंद्राजवळ
94
गाडेगांव
संदिपानी शाळेच्या जवळ
95
ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम शाळा
ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम शाळेच्या कंपाऊंडमध्ये
96
पोद्दार इंटरनेशनल स्कूल
पोद्दार इंग्लिश मिडीयम शाळेच्या कंपाऊंडमध्ये

तालुका - किनवट
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
अयप्पा नगर
पेट्रोल पंपासमोर, किनवट-माहूर रोड
2
साने गुरुजी हॉस्पीटल समोर
भगतसिंगनगर, आठवडी बाजार, किनवट-माहूर रोड
3
अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर
कै.यशवंतराव चव्हाण पालिका बाजाराच्या दुकानासमोर
4
हेडगेवार नगर
किनवट-बेलोरी रोड, किनवट
5
छत्रपती संभाजी राजे चौक
स.विम (एस.व्ही.एम) परिसर किनवट-बेलोरी रोड
6
शिवाजी नगर
शिवाजीनगर परिसर किनवट-बेलोरी रोड
7
साईनगर
गणेश मंदिर जवळ, मुख्य रस्ता किनवट
8
जुना तहसिल दुकानांसमोर
पो.स्टे.किनवटच्या शेजारी
9
नविन नगरपालिका बिल्डींग
नविन नगरपालिका बिल्डींग समोर किनवट-नांदेड रोड
10
जुना चुंगी नाका
जुना चुंगी नाका परिसर बिरसा मंडा पुतळयाजवळ
11
क्रिडा संकुल
क्रिडा संकुल समोर किनवट-नांदेड रोड
12
महाराष्ट्र प्रताप चौक
महाराष्ट्र प्रताप चौक परिसर खरबी टी-पॉईंट

तालुका - माहुर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
बस स्टॅण्ड समोर
2
तहसिल रोड
सागर झेरॉक्स समोर
3
यज्ञेश आयुर्वेदिक मेडकल समोर
कपिलेश्वर धर्मशाळेसमोर
4
श्री छत्रपती संभाजी राजे चौक
बस स्टॅण्ड रोड
5
दत्ता चौक
दत्त शिखरकडे जाणार रस्ता
6
वसंतराव नाईक चौक
रेस्ट हाऊस जाणारा रस्ता
7
पुसद रोड
हॉटेल रुद्र समोर


तालुका - भोकर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
श्री.बी.कॉलेज जवळ
भोकर-तामसा रोड
2
भोकर नगर परिषद समोर
नांदेड रोड, पेट्रोल पंपा समोर
3
विश्रामगृहा समोर
टप्पे हॉस्पीटल, नांदेड रोड
4
मुहम्मद नगर चौरस्ता
मुदखेड रोड
5
विश्वकर्मानगर बि ऍ़न्ड सी क्वार्टर
बि ऍ़न्ड सी क्वार्टर म्हैसारोड
6
लहुजी चौक
लहुजी चौक, भोकर
7
शिवाजी चौक
मेन बस स्टॅण्ड रोड
8
माऊली कॉम्पलेक्स
किनवट रोड
9
अण्णा भाऊ साठे चौक
बोरगांव रोड
10
घिसेवाड हायस्कूल समोर
किनवट रोड


तालुका - हिमायतनगर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
बाजार चौक
बसवेश्वर ट्रेडिंग कंपनी शेजारी
2
गुरुकुल हायस्कूल समोर
एज्युकेशन कॅम्पस, बोरगडी रोड, हिमायतनगर
3
रेस्ट हाऊस चौक
किनवट-नांदेड रोड
4
हनुमान मंदिर परिसर
फुलेनगर
5
सिध्दार्थ नगर
रेल्वे स्टेशन जवळ, टेंभी रोड
6
श्री सेवालाल मंदिरासमोर
बाऱ्हली तांडा
7
उमर चौक
वासी रोड
8
परमेश्वर मंदिर चौक
परमेश्वर मंदिर चौक
9
रेल्वे स्टेशन टि पॉईंट
किनवट-नांदेड रोड


तालुका - धर्माबाद
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
महर्षि दयानंद चौक
पोलीस स्टेशन जवळ
2
रेल्वे स्टेशन मेन गेट
साई प्रसाद हॉटेल समोर ऑटो स्टॅण्ड जवळ
3
हजरत बुऱ्हाणशहा चौक
अब्दुल हमीद किराणा समोर, मोंढा रोड
4
आशिष कॉम्पलेक्स समोर
नटराज टॉकीज, आंध्रा बस स्टॉप
5
तलाव कट्टा, बाळापूर
पायनर रोड
6
मुख्य बस स्टॅण्ड समोर
मुख्य बस स्टॅण्ड समोर
7
आनंदनगर चौक
रत्नाळी रोड
8
रत्नाळी मुख्य चौक
रत्नाळी मुख्य चौक, धर्माबाद
9
छत्रपती शिवाजी महाराज चौक
पठाण फर्निचर समोर
10
बन्नली चौक
हिंद मोटर्स समोर
11
महादेव मंदिर
एल.बी.एस.कॉलेज रोड
12
पानसरे हायस्कूल चौक
गोरक्षण रोड

तालुका  - बिलोली
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
सिध्दार्थनगर (सावळी रोड)
दिशा केंद्रच्या समोरिल जागा
2
साठेनगर (नांदेड रोड)
ओम समर्थ किराणा समोरिल जागा
3
नविन बस स्टॅन्ड
एस.बी.आय.बॅकेसमोरिल जागा
4
दुय्यम निबंघक कार्यालय
सरदारजी समोरिल जागा
5
जुना बस स्टॅन्ड
बालाजी स्वीट समोरिल जागा
6
जिल्हा परिषद हायस्कूल
जिल्हा परिषद शाळेसमोरिल जागा
7
गांधी चौक
गायत्री सिल्वर मर्चट समोरिल जागा
8
गांधीनगर मैदान
जनक्रांती वाचनालया समोरील जागा

तालुका - मुदखेड
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
श्री छत्रपती शिवाजी चौक
सीआरपीएफ च्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी, तहसिल कार्यालया समोर, उमरी रोड
2
बाळासाहेब ठाकरे चौक
महाराष्ट्र धाब्याच्या शेजारी बायपास रोड
3
मराठा गल्ली
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक (बारड वेस)
4
महात्मा फुले चौक
भोकर फाटा चौरस्ता बस स्टॉप शेजारी
5
नवी आबादी
मस्जीद समोर, भोकर रोड
6
मोंढा परिसर
बुलढाणा अर्बन कॉ-ऑप क्रेडीट सोसायटीच्या समोर
7
शादी खाना समोर
मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळे शेजारी
8
कालीजी मंदिरचौक
रणछोड मंगल कार्यालय शेजारी
9
रेल्वेस्टेशन मेनगेट समोर
मस्जिदच्या शेजारी मदिनानगर चौक
10
न्याहळी मारोती मंदिर परिसर
मुदखेड
11
उमरी रोड
केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय समोर
तालुका - उमरी
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
रेल्वे स्टेशन गेट समोर
केरसी कंपाऊंड
2
बसवेश्वर चौक
व्यंकटराव पाटील कवळे बँकसमोर उमरी मार्केट कमिटी कॉम्पलेक्स
3
प्रेरणा भवन समोर
बस स्टॅण्ड रोड
4
संस्कार हायस्कूल समोर
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूस भोकर रोड
5
भगवान बाबा चौक
हुतात्मा स्मारक जवळ
6
गणेश नगर
हनुमान मंदिरासमोर
7
गोरठा पॉईंट
जिनिंग फॅक्टरी ऐरीया

तालुका - अर्धापूर

अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
टिपु सुलतान चौक
सय्यद कॉम्पलेक्स समोरिल जागा
2
बसवेश्वर चौक
जडे क्लॉथ सेंटर समोरिल जागा
3
आंबेडकर नगर
बौध्द विहाराजवळील जागा
4
हनुमान मंदीर
लाइफ स्टाइल समोरिल जागा
5
मोठी दर्गा
मोठी दर्गा समोरिल जागा
6
तहसिल ऑफीस
श्री.कृष्णा जनरल स्टोअर समोरिल जागा
7
गणपतनगर
डोंगर हार्डवेअर समोरिल जागा
8
नवी आबादी
नासीरखॉप पठाण यांच्या घराजवळ
9
लंगडे कॉम्पलेक्स
लंगडे कॉम्पलेक्स समोरिल जागा

तालुका - कंधार

अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
शिवाजी चौक
मारोती मंदिरा समोरील जागा
2
प्रियदर्शनी चौक
माऊली कृपा दुकाना समोर
3
रंगार गल्ली
युवराज वॉटर प्लॅन्ट समोर
4
शंभूराजे इंग्लिश स्कूल
शाळे समोरील जागा
5
गांधी चौक
गडपल्लेवार मेडीकल समोर
6
नवा मारोती मंदिर
मंदिर समोर
7
मोठी दर्गाह
दर्गाह समोरील जागा
8
छोटी दर्गाह
दर्गाह समोरील जागा
9
कैलास बुक सेंटर
बुक सेंटर समोरील जागा
10
वकील कॉलनी
कॉलनीतील ऍ़ड देशमुख यांच्या निवासस्थाना जवळ
11
पोलीस कॉलनी
कॉर्नरची जागा
12
महाराणा प्रताप चौक
न.प.सभागृह कॉर्नर
13
गोविंद पाटील उद्यान
उद्यानाच्या गेट समोरील जागा
14
राम रहिम नगर
नगरातील चौकातील जागा
15
गवंडीपार
मारोती मंदिर जवळ
तालुका  - देगलूर
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
हनुमाननगर
धुंडा महाराज देगलूरकर स्मारकासमोर
2
आंबेडकर चौक
तिरुपती झेरॉक्स समोर
3
राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक
बाबा इंजिनिअरिंग ऍ़ड वेल्डींग वर्क्सच्या समोरील जागा
4
शारदानगर
राजमणी मेडीकल समोरील जागा
5
शिवा कोंडेकर चौक (देगांव रोड)
दत्तकृपा साऊंड सर्व्हीस ऍ़न्ड टेन्ट हाऊस समोरिल जागा
6
सराफा लाईन
ऍ़क्सीस बॅक समोरील जागा
7
होटल बेस गल्ली
शनि मारोती मंदीराजवळची जागा
8
जुने बसस्टॅन्ड देगलूर (भक्तापूर रोड)
शिवकृपा इडलीसमोर समोरिल जागा
9
कलामंदीर
कला मंदीर समोरिल जागा
10
जुना (old) पेट्रोलपंप बंगालेवाली मस्जीदजवळ
अमरदिप होटल समोरिल जागा
11
नविन बसस्टॅन्ड देगलूर
कासीम फर्निचर समोरिल जागा


तालुका  - नायगांव
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
लालवंडी रोड कॉर्नर
किसान कृषी सेवा केंद्रासमोर
2
आंबेडकर चोक
पाण्याच्या टाकीजवळ
3
शिवाजीचौक
श्री.दलसाई आईसक्रिम दुकानासमोर
4
सहयोगनगर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कॅम्प समोर
5
हेडगेवार चौक
रुपाली झेरॉक्स सेंटर व पुला इलेक्ट्रीक समोर
6
बसवेश्वर चौक
अंबिका लॉज समोर
7
जुना मोंढा
जुने ऊर्द हायस्कूल समोर

तालुका  - मुखेड
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
लेक्चर कॉलनी
महाजन पेट्रोलपंपा शेजारील जागा
2
लोखंडे चौक
साईराम हॉटेलजवळ
3
शिवाजीनगर
आंबेडकर पुतळयाच्या समोरिल जागा
4
अशोकनगर
महालक्ष्मी ट्रेडर्स जवळ
5
बा-हाळी नाका
कल्पतरु सुपर मार्केट जवळ
6
संभाजी चौक
रामकोतावार व्यापारी संकुलाजवळ
7
झेंडा चौक
बालाजी मंदीराजवळ
8
तगलाई
उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजुस
9
गायकवाड गल्ली
महाकाली सायकल दुकानाजवळ
तालुका  - लोहा

अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
शनि मंदीर
शनि मंदीरा समोरील जागा
2
कृषी उत्पन्न बाजार समिती कमान क्र.2
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीच्या बाजुची जागा
3
कृषी उत्पन्न बाजार समिती कमान क्र.1
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीच्या बाजुची जागा
4
भाजी मंडी चौक
सोनी कापड दुकानासमोरिल जागा
5
बौध्द विहार
बौध्द विहारासमोरल जागा
6
बालाजी मंदीर
बालाजी मंदीरासमोरील जागा
7
न्यु नारायणी इंग्लिश स्कुलु
शाळेसमोरिल जागा
8
गोंविदराज ऑईल मिल
ऑईल मिल समोरिल जागा
9
सिध्दार्थनगर
सिध्दार्थनगर चौकातील जागा

तालुका  - हदगांव
अ.क्र.
थांबा
रस्ता/ठिकाण
1
आझाद चौक
आझाद चौक, हदगांव
2
विवेकानंद माध्यमिक विद्यालय
विवेकानंद माध्यमिक विद्यालया समोर
3
आयटीआय
आयटीआय मेन गेट समोर
4
जुना बस स्टॅन्ड परिसर
जुना बस स्टॅन्ड परिसर शितला माता मंदीराशेजारी
5
द्वोणगिरीनगर
हनमुान मंदीर परिसर द्वोणगिरीनगर जवळ
6
सोनुले चौक
शासकीय गोदामसमोर सोनुले चौक
7
पंचशिल विदयालय
पंचशिल माध्यमिक विदयालया समोर
8
तामसा रोड
आदिवासी मुलांचे वसतिगृहासमोर
9
नवी आबादी समोर
नवी आबादीसमोर तामसा रोड
0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...