Tuesday, May 25, 2021

 

  जिल्ह्यातील 91 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 26 मे रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रावर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली, भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 24 मे पर्यंत एकुण 4 लाख 17 हजार 366 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 25 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 49 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 500 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 55 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 पालक गमावलेल्या मुलांच्या सहाय्यासाठी हे आहेत संपर्क क्रमांक

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोना प्रादुर्भावामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत त्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्स अंतर्गत अशा मुलांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टिने चाईल्ड हेल्प लाईन नंबर व इतर संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात जर कुणाला असे बालके आढळली तर त्यांनी चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व बालकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
000000

नांदेड जिल्ह्यात 205 व्यक्ती कोरोना बाधित

3 जणाचा मृत्यू तर 212 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 688 अहवालापैकी  205 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 136 तर अँटिजेन तपासणीद्वारे 69 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 414 एवढी झाली असून यातील 84 हजार 499 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 609 रुग्ण उपचार घेत असून 66 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  24 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व्यंकटेशनगर उमरी येथील 75 वर्षाचा पुरुष, विजयनगर नांदेड येथील 44 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील हलदव येथील 55 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 863 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 77, देगलूर 2, लोहा 2, उमरी 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 2, मुदखेड 2, अदिलाबाद 2, अर्धापूर 4, किनवट 19, मुखेड 1, यवतमाळ 3, धर्माबाद 2, माहूर 1, नायगाव 8, हिंगोली 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 5, हदगाव 9, मुखेड 8, परभणी 1, अर्धापूर 4, कंधार 1, नायगाव 4, भोकर 3, किनवट 1, उमरी 1, धर्माबाद 3, मुदखेड 28, हिंगोली 1  असे एकूण 205 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 212 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 9, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुगणाय 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत 14, लोहा तालुक्यांतर्गत 40, बारड कोविड केअर सेटर 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, भोकर तालुक्यांतर्गत 7, बिलोली तालुक्यांतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 4, माहूर तालुक्यातर्गंत 9, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 22, मांडवी कोविड केअर सेंटर 9, हिमायतननगर तालुक्यातर्गंत 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णाय 48 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 609 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 53, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 46, बारड कोविड केअर सेंटर 12, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 12, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 6, कंधार कोविड केअर सेंटर 3,  नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 7, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 15, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 2, मालेगाव पिसीयू कोविड रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 338, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 716, खाजगी रुग्णालय 231 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 102, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 90, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 35 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 21 हजार 425

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 22 हजार 350

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 414

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 499

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 863

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.57 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-96

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 609

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-66

00000


 

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व

विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 25 मे 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 27 ते 29 मे 2021 याकाळात नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 30 ते 40 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी  केले आहे. 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...