Tuesday, May 25, 2021

 पालक गमावलेल्या मुलांच्या सहाय्यासाठी हे आहेत संपर्क क्रमांक

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोना प्रादुर्भावामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत त्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्स अंतर्गत अशा मुलांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टिने चाईल्ड हेल्प लाईन नंबर व इतर संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात जर कुणाला असे बालके आढळली तर त्यांनी चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व बालकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...