Wednesday, November 25, 2020

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र 

औरंगाबाद ,दि.25 (विमाका):- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) परभणी - 32681 (78) 4) हिंगोली - 16764 (39) 5) नांदेड - 49285 (123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर - 41190 (88) 8) उस्मानाबाद - 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.

00000

 

58 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू  

36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 25 :- बुधवार 25 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 895 अहवालापैकी  1 हजार 811 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 161 एवढी झाली असून यातील  19  हजार 16 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 407 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 हदगाव तालुक्यातील कामारी येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालयात तर बुधवार 25 नोव्हेंबर 2020 मुखेड फुलेनगर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा मुखेड कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 547 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 24, मुखेड कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 5, हदगाव कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, धर्माबाद कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 4 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, किनवट तालुक्यात 4, मुखेड 2, हदगाव 1, हिमायतनगर 1, भोकर 3, लोहा 1, नायगाव 1, उमरी 1, परभणी असे एकुण 29 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 9, माहूर तालुक्यात 1, कंधार 1, मुखेड 2, देगलूर 2, हदगाव 12, औरंगाबाद 1, उत्तरप्रदेश राज्यातील 1 असे एकुण 29 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 407 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 42, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 19, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 68, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 141, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 52 आहेत.  

बुधवार 25 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 43 हजार 840

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 19 हजार 754

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 161

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 16

एकूण मृत्यू संख्या- 547

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-487

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-407

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल 

नांदेड (जिमाका) 25 :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट या ठिकाणच्या परीक्षा केंद्रात केवळ एक दिवसासाठी पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीच्या विज्ञान तंत्रज्ञान-1 या विषयाच्या मनोविकास विद्यालय कंधार ऐवजी मनोविकास प्राथमिक विद्यालय, एसबीआय एटीएमजवळ कंधार नवीन परीक्षा केंद्र राहिल. श्री शिवाजी विद्यालय पानभोसी रोड कंधार ऐवजी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी रोड कंधार तर श्री शारदा भुवन हायस्कुल, जुनामोंढा नांदेड ऐवजी गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा बालाजी मंदीराजवळ नांदेड हे नवीन परीक्षा केंद्र राहिल. 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत इयत्ता बारावीच्या गणित व संख्याशास्त्र या विषयाची महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा ता. किनवट या परीक्षा केंद्रा ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विदयालय, उत्तर प्रवेशद्वार (मस्जिदच्या बाजूने) गोकुंदा ता. किनवट हे नवीन परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

वाहन चालक परवान्यासाठी आता

4 डिसेंबर पासून तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका) 25 :-  कोविड-19 च्या उपाययोजनांमुळे वाहन चालविण्यासाठी लागणारे शिकाऊ परवाने, पक्के परवाने, नवीन वाहन नोंदणी आदीचे कामकाज प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नियमित पद्धतीने घेता आली नव्हती. दिनांक 23 मार्च 2020 पासून बंद असलेली ही शिबिरे आता दिनांक 4 डिसेंबर पासून तालुक्यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

 कंधार येथे 4 डिसेंबरला, मुखेड येथे 7 डिसेंबर, देगलूर येथे 9 डिसेंबर, हिमायतनगर 11 डिसेंबर, मुदखेड 14 डिसेंबर, हदगाव 17 डिसेंबर, धर्माबाद 24 डिसेंबर, किनवट 28 डिसेंबर तर माहूर येथे 29 डिसेंबर रोजी सदर शिबिराचे आयोजन करुन यात शिकाऊ परवाने, पक्के परवाने व नवीन वाहन नोंदणीबाबतचे कामकाज केले जाईल. ही शिबिर कार्यालय दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखतीसाठी खुली करण्यात येतील.

00000

 

कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी

स्वत:हून उपचारासाठी पुढे यावे

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) 25 :- कोविड-19 मुळे ग्रामीण भागात लोकांच्या मनात एक भिती निर्माण झाल्यामुळे असंख्य लोक ज्यांना इतर गंभीर आजार आहेत ते आजारही लपवित आहेत. रुग्णांनी आपले गंभीर आजार न लपविता विश्वासाने पुढे आले तर अनेक आजारांवर वेळीच उपचार करुन पूर्णत: बरे होता येईल. ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या यंत्रणेतील आशा वर्कर व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून कुष्ठरोग, क्षयरोग सारख्या रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेळीच इलाज करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

संयुक्त कुष्ठरोग शोध मोहिम व क्षयरुग्ण शोध मोहिम 2020 च्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. अमृत चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

कुष्ठरोग हा मायकोबॅक्टोरियम या जिवाणुमुळे होणारा सौम्य सांसर्गिक आजार आहे. यात मुख्यत: त्वचा व मज्जा बाधीत होतात. याची वाढ अत्यंत सावकाश होते. तो कोणत्याही स्त्री व पुरुषास होऊ शकतो. याची लागण झालेल्या रुग्णाने औषधोपचार घेतला नाही तर त्या रुग्णामार्फत याचा प्रसार होतो. याचा प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे खास ही मोहिम राबविली जाते. या मोहिमेत प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनाही शोधले जाणार आहे शिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहेत. दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, ताप असल्यास, वजनात लक्षणीय घट होत असल्यास किंवा थुंकी वाटे रक्त येत असल्यास क्षयरोगासंबंधित तात्काळ चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. वेळीच इलाज केल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो.  

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...