Wednesday, November 25, 2020

 

वाहन चालक परवान्यासाठी आता

4 डिसेंबर पासून तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका) 25 :-  कोविड-19 च्या उपाययोजनांमुळे वाहन चालविण्यासाठी लागणारे शिकाऊ परवाने, पक्के परवाने, नवीन वाहन नोंदणी आदीचे कामकाज प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नियमित पद्धतीने घेता आली नव्हती. दिनांक 23 मार्च 2020 पासून बंद असलेली ही शिबिरे आता दिनांक 4 डिसेंबर पासून तालुक्यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

 कंधार येथे 4 डिसेंबरला, मुखेड येथे 7 डिसेंबर, देगलूर येथे 9 डिसेंबर, हिमायतनगर 11 डिसेंबर, मुदखेड 14 डिसेंबर, हदगाव 17 डिसेंबर, धर्माबाद 24 डिसेंबर, किनवट 28 डिसेंबर तर माहूर येथे 29 डिसेंबर रोजी सदर शिबिराचे आयोजन करुन यात शिकाऊ परवाने, पक्के परवाने व नवीन वाहन नोंदणीबाबतचे कामकाज केले जाईल. ही शिबिर कार्यालय दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखतीसाठी खुली करण्यात येतील.

00000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...