Friday, January 17, 2025

  वृत्त क्र. 68

नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी 

स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा सूर 

नांदेड दि. १7 जानेवारी : जिल्ह्यातील 67 रेती घाटांच्या पर्यावरणीय जन सुनावणीचा कार्यक्रम शुक्रवारला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या जनसुदावनीत स्थानिक रोजगाराला, रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याबाबत नागरिकांनी आपली मते मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अधिकारी मनीष होळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी आणि समितीचे सदस्य सचिव परमेश्वर कांबळे उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी शंकर लाड यांच्यासह जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, हिमायतनगर, हदगाव, माहूर तालुक्यातील अधिकारी, अनेक गावांचे नागरिक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील रेतीच्या मागणीला पुरविण्याची घाटांची आवश्यक क्षमता आहे. शासनाने वाळू धोरणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.तथापि, सुनावणी दरम्यान मांडलेल्या नागरिकांच्या सूचनांना शासन गांभीर्याने विचारात घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर 

या सुनावणीत उपस्थित नागरिकांनी स्थानिक ट्रॅक्टर-ट्रकचा वापर तसेच मजुरांचा स्थानिक पातळीवरच वापर व्हावा, अशी मागणी केली. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा सूर व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील पैनगंगा, कयाधू, मांजरा, लेंडी आदी नद्यांवरील रेती घाटांसाठी पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल निर्णय घेताना स्थानिकांचे हित जपले जावे, अशी नागरिकांची भूमिका होती.

पर्यावरणीय संतुलनासोबत विकासाचा विचार

सुनावणीदरम्यान पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. स्थानिकांच्या मागण्या व सूचनांचा अहवाल शासनाकडे पाठवून निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

0000






 वृत्त क्र. 67 

समाज कल्याण विभागाच्या नांदेड येथील

विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 

नांदेड दि. 17 जानेवारी :- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले.

 

समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरीविद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्याच्या मातीत खेळाचे गुण उपजत असल्याचे शशिकांत ढवळे यांनी सांगितले. बी. एस. दासरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. या स्पर्धचे सुत्रसंचलन गजानन पंपटवार व डॉ. दिलीप माने यांनी केले. या विभागीय क्रीडा स्पर्धेत धावणे, थालीफेक, खोखो, रिले अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेड जिल्ह्यात घेण्यात येत असून त्या उत्साहात सुरू झाल्या. या स्पर्धेत नांदेडलातूर, धाराशिव, हिंगोली येथील अनु.जाती मुला-मुलींचे शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेळाडूंचे जिल्हानिहाय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. विविध जिल्ह्यातून जवळपास 500 विद्यार्थ्यांनी या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.  

000







    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...