Tuesday, December 26, 2023

 वृत्त क्र. 894 

27 डिसेंबर रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- ग्राहकांचे हक्‍क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनजागृती होण्‍याच्‍या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे दुपारी 1 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष अनिल ब.जवळेकर हे राहतील.

या कार्यक्रमास प्रमुख वक्‍ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्‍ट्रचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. अरविंद बिडवई, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा.डॉ.दीपक कासराळीकर, जिल्‍हा संघटक नांदेडचे अॅड. आनंद बळवंतराव कृष्‍णापूरकर, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्‍हा सहसंघटक सायन्‍ना मठमवार यांची उपस्थिती राहणार आहे.  राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या या कार्यक्रमास सर्व नागरिक, ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले व तहसिलदार संजय वारकड यांनी केले.

0000

 

 वृत्त क्र. 893 

आयुष्यमान गोल्डन कार्डसाठी संपूर्ण जिल्हाभर 28 डिसेंबर रोजी विशेष मोहिम 

·  मोहिमेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असलेली योजना म्हणून आयुष्यमान भारत योजनेकडे पाहिले जाते. आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडे असणे या योजनाच्या लाभासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या लोकांना अजूनही आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळाले नाही अथवा ज्यांनी अजूनही या कार्डसाठी अर्ज भरले नाहीत अशा व्यक्तींसाठी संपूर्ण जिल्हाभर विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था (शाळा), अंगणवाडी केंद्र, सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मुख्य ठिकाण, चौक, रेशन दुकाने, सेतु सुविधा केंद्र, गर्दीची ठिकाण ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्ह्यात किमान एक लाख आयुष्यमान कार्ड लोकांपर्यंत पोहोचावेत यादृष्टिने आरोग्य विभाग व सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून नियोजन केले गेले आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी मोफत आरोग्य सुविधांची भूमिका महत्वाची आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही उपचार, शस्त्रक्रिया पासून वंचित राहू नये यासाठी राज्यस्तरावरुन महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संलग्न रुग्णालयातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया लाभ दिला जातो. या योजनेचे गावनिहाय लाभार्थी यादीतून डाऊनलोड करणे, गोल्डन कार्ड तयार करणे व नागरिकांमध्ये जागृती करुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती अजून बिकट होणार नाही व योग्य उपचार मिळून त्यांना आरोग्य प्राप्ती होईल असा या योजनेमागचा उद्देश आहे.

 0000

 वृत्त क्र. 892

 

वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी

विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची   

-         पालकमंत्री गिरीश महाजन

 

·         मनपा क्षेत्रातील यात्रेच्या चित्ररथाचे पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. सर्वांचा विकास हे अंतिम ध्येय बाळगुन आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला गॅस अशा कितीतरी लोककल्याणकारी योजनांनी सर्वसामान्यांना बळ दिले. आजही विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचितांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन  राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज यात्री निवास परिसर नांदेड येथे करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकरआमदार राम पाटील रातोळीकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेमनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदमनोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हा प्रशासन व नांदेड शहर महानगरपालिकेच्यावतीने विकसीत भारत संकल्प यात्रा नांदेड महानगराच्या प्रत्येक भागात पोहचून वंचितांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांची नावे या यात्रेत नोंदविली जाऊन त्यांना लाभ दिले जाणार आहेत. दिनांक 30 डिसेंबर पर्यंत ही यात्रा महानगरपालिकेच्या 13 प्रभागातून जाणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

 

या यात्रेत मनपा क्षेत्रात 419 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. 255 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीएम स्वनिधी या योजनेत 10 हजार रुपये कर्जासाठी 266 लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. यावेळी विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.  

0000

छायाचित्र : पुरुषोत्तम जोशी, नांदेड












वृत्त क्र. 891

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

28 डिसेंबर रोजी लोहा व कंधार येथे मेळावा 


नांदेड (जिमाका) दि. 26 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी  पंचायत समिती सभागृह लोहा   पंचायत समिती सभागृह कंधार येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावेअसे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 


मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र. 890

 दि. 26 डिसेंबर, 2023

 

बाबा जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या

शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल

-  पालकमंत्री गिरीश महाजन  

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- संपुर्ण भारताला शौर्याचा समृद्ध वारसा देणाऱ्या साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या स्मृतीचा आजचा दिवस आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय या कोवळ्या बालकांवर मुघल शासक वजीर खान याने लादला होता. या बालकांनी मरण यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलणार नसल्याचे सांगितले. आपल्या शीख धर्माला त्यांनी प्राधान्य दिले. भारतातील सर्वांसाठी ही घटना एक मिसाल बनली आहे. सर्वांसाठी ही प्रेरणा असून हा शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने येथील गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे अयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवस व सर्व धर्म संमेलनात ते बोलत होते. यावेळी पंचप्यारे साहेब, बाबा बलविंदरसिंग जी, पंजाब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हरभजन सिंघखासदार प्रतापराव चिखलीकरआमदार राम पाटील रातोळीकरआमदार बालाजी कल्याणकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवालमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेगुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

भारता सारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व धर्माप्रती आदर व श्रद्धा असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. परस्पर धर्मा विषयी संहिष्णुता गरजेची आहे. परस्पर आदराच्या शिकवणुकीला आपल्या संस्कृतीने प्राधान्य दिले आहे. भारताला जी त्यागाची परंपरा लाभलेली आहे त्यातील शौर्य व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता युवकांनी बाळगली पाहिजे. एका समृद्ध पायावर उभा असलेला देश भविष्यात तुम्हा युवकांच्या हाती येणार असून त्यासाठी आजपासूनच अधिक सुसंस्कृतजबाबदारकर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हाअसे भावनिक आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

 

आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साहिबजादे, बाबा जोरावर सिंगबाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाला अधोरेखीत करून 9 जानेवारी 2022 रोजी आजचा दिवस वीर बाल दिवस दिन म्हणून भारतभर साजरा होईल असे सर्व प्रथम जाहीर केले. या पाठिमागे सर्व मुलांना त्यागाची प्रेरणा मिळावी या उद्देश त्या पाठिमागे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उद्याच्या सशक्त भारतासाठी आयुष्यभर आपण कोणतेही व्यवसने करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ घेण्याचे भावनिक आवाहनही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुलांना केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा वीर बाल दिवस साजरा करतांना संपूर्ण देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा संपूर्ण देशाचा सन्मान आहेअसे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगून वीर बालकांना नमन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांनी केले.

 

यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. निबंध स्पर्धेत पुष्पिंदर कौर परमीत सिंघ संधूराजेश गोविंद राठोडअनिता कौर प्रीतम सिंघ कामठेकर यांना अनुक्रमे प्रथमद्वितीयतृतीय पुरस्कार मिळाले. प्रोत्साहनपर बक्षिसे श्वेता गायकवाडशिवकांत मोकमपल्ले यांना देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या वरिष्ठ गटात संतोष उत्तरवार, वैभव काळे, गोविंद निमगाडे यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली. मुलींच्या गटात वर्षा खानसोळे, वैष्णवी दहिमल, सामका राठोड तर ज्युनिअर मुलांच्या गटात शिवम इंगळे, श्रीकांत ठाकूर, सोहम चक्रधर, मुलींच्या गटात विणया माचुपुरे, आकांक्षा कदम, वैष्णवी गंगासागर हे अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे असे विजयी ठरले.  

00000   

छायाचित्र : पुरुषोत्तम जोशी, नांदेड













वृत्त क्र. 889

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

28 डिसेंबर रोजी लोहा व कंधार येथे मेळावा 


नांदेड (जिमाका) दि. 26 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी  पंचायत समिती सभागृह लोहा   पंचायत समिती सभागृह कंधार येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावेअसे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 


मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...