Tuesday, December 26, 2023

 वृत्त क्र. 894 

27 डिसेंबर रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- ग्राहकांचे हक्‍क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनजागृती होण्‍याच्‍या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे दुपारी 1 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष अनिल ब.जवळेकर हे राहतील.

या कार्यक्रमास प्रमुख वक्‍ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्‍ट्रचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. अरविंद बिडवई, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा.डॉ.दीपक कासराळीकर, जिल्‍हा संघटक नांदेडचे अॅड. आनंद बळवंतराव कृष्‍णापूरकर, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्‍हा सहसंघटक सायन्‍ना मठमवार यांची उपस्थिती राहणार आहे.  राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या या कार्यक्रमास सर्व नागरिक, ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले व तहसिलदार संजय वारकड यांनी केले.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...