नागरिकांनी
अफवावर विश्वास ठेवू नये
कोरोना : 605 जणांचा
निगेटिव्ह अहवाल
नांदेड, दि. 25 (जिमाका):- कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी
5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वँब एकुण
649 आहेत, त्यापैकी 605 निगेटिव्ह असून 38 स्वँब अहवाल
प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वँब तपासणीचा
आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 649 असून त्यापैकी 1 रुग्णाचा
स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी
नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहे. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे
गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण
80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या व्यक्तींचे
अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता
कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ
भोसीकर यांनी केले आहे.
000000