Monday, August 27, 2018


कापुस, सोयाबीन पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात कापुस, सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
कापूस रस शोषण किडीसाठी फलोनीकॅमीड 50 डब्ल्यू जी 2 ग्रॅम आणि गुलाबी बोंडअळीसाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे.
सोयाबीनवरील तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.41 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात सोमवार 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 278.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 727.14 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 76.10 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 26.88 (818.39), मुदखेड- 15.67 (923.03), अर्धापूर- 16.00 (788.33), भोकर- 16.50 (944.75), उमरी- 12.67 (785.99), कंधार- 24.00 (719.66), लोहा- 20.17 (677.17), किनवट- 7.71 (771.55), माहूर- 9.50 (964.96), हदगाव- 23.57 (868.15), हिमायतनगर- 18.67 (911.38), देगलूर- 18.00 (342.00), बिलोली- 14.80 (524.20), धर्माबाद- 14.67 (579.00), नायगाव- 15.40 (540.80), मुखेड- 24.29 (474.82). आज अखेर पावसाची सरासरी 727.14 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11634.18) मिलीमीटर आहे.  
00000


विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 30 ऑगस्ट 2018 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 11 वा. लोहा येथे आगमन व श्री संत भगवानबाबा जयंतीस उपस्थिती. नंतर सोयीनुसार लोहा येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
000000


लोहा नगरपरिषद निवडणुकीच्या
आरक्षणाची सोडत शुक्रवारी होणार
नांदेड दि. 27 :- नगरपरिषद लोहा सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी राज्‍य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानसार शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी तहसिल कार्यालय लोहा येथे सकाळी 11 वा. चिठ्या काढून सदस्‍य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. लोहा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण  निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
आरक्षण सोडतीच्‍या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष / प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कंधार यांची नियक्‍त करण्‍यात आल आहे. लोहा नगरपरिषद क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्‍त्री), अनुसूचित जमाती (स्‍त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्‍त्री) आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी आरक्षण निश्चित करण्‍यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
0000000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर
साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द
आक्षेप, दुरुस्‍ती असल्यास अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्यात आली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर आक्षेप / दुरुस्‍ती/ नाव समाविष्‍ट इत्‍यादी बाबत आक्षेप असल्‍यास मतदारांनी 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत विहीत नमुन्‍यातील फॉर्म- 2 भरुन संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
याबाबत आक्षेप किंवा दुरुस्‍तीबाबतचा विहीत नमुन्‍यातील फॉर्म-2 संबंधित तहसिल कार्यालयात तसेच www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी अधिसूचना दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 अन्‍वये मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिख धर्मीय मतदारांची मतदार नोंदणी कार्यक्रम 20 जुलै ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म-1 नुसार तयार केलेली प्रारुप मतदार यादी मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून 27 ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच  संबंधित जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयांच्‍या सुचना फलकांवर त्‍या-त्‍या तालुक्‍याची प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
प्राप्‍त दावे व हरकती / आक्षेप सक्षम अधिकारी जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या कार्यालयात 27 सप्‍टेंबर ते दिनांक 4 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत निकाली काढण्‍यात येणार आहेत. त्‍यानंतर त्‍या जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी, विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ऑक्‍टोबर 2018 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत अपीलार्थींना  व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20  ते 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्‍यानंतर दि. 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल, असे जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...