Sunday, April 19, 2020

कोरोना : नांदेड जिल्ह्याला दिलासा  
घरीच क्वारंटाईमध्ये असलेले 649 जण
 नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 649 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 196 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 35 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 73 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 576 अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी 46 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 373 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 320 नमुने निगेटीव्ह आले असून 48 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 76 हजार 211 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000

पत्रकार परिषद निमंत्रण                                                                                         ई-मेल संदेश
दि. 19 एप्रिल 2020
प्रति ,    
मा. संपादक / प्रतिनिधी दैनिक वृत्त्पत्र / दूरचित्रवाणी /
केबल टि.व्ही.  नांदेड जिल्हा 
                           
   विषय :- कोरोनासंसर्ग बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद
                           संदर्भ :-  मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडील दूरध्वनी संदेश दि. 19.4.2020
महोदय ,
            उपरोक्त संदर्भीय विषयाने कोरोना संसर्ग प्रतिबंधाबाबत माहिती देण्यासाठी मा. डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवार दि. 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी 1 वा. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे करण्यात आले आहे.
            यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती राहणार आहे. 
            कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी वार्तांकनासाठी  उपस्थित रहावे, ही विनंती. 
(कृपया पत्रकार परिषदेच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) व मास्कचा वापर करण्यात यावा, ही विनंती.)

वार व दिनांक      -  सोमवार दि. 20 एप्रिल 2020
स्थळ                 -  डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन नांदेड      
वेळ                   -  दुपारी 1 वा. 
                                                                                                        आपली विश्वासू
                                                                                                                 स्वा/-
                                                                                                             (मीरा ढास)
                                                                                                    प्र.जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                                                                नांदेड 
प्रत ,
मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवारकडून सहाय्यता कक्षास ६१ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी  डॉ विपीन यांच्याकडे सुपूर्द

नांदेड ,दि :19 - अंबेकरनगर नांदेड सेवानिवृत सहकार अधिकारी व माजी राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व योगाध्याम नांदेडचे सचिव श्री एम डी नल्लावार यांनी त्यांचे निवृत्तीवेतनातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मा.पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार व मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (कोरोना) आकरा हजार रूपयाचा निधी मा.जिल्हाधिकारी नांदेड डाॅ.विपीन ईटनकर यांच्याकडे धनादेश देण्यात आला आहे.

कोविड 19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे काटेकोर पालन करावे -- जिल्हाधिकारी विपीन इटनकर

नांदेड, दि.19:- कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाची अंमलबजावणी  आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार करणे अनिवार्य असुन दोषीविरुध्द  दंडात्म् क कार्यवाहीचा प्रावधान आहे.

सार्वजनिक स्थळ,
सर्व सार्वजनिक  व कामाच्याा ठिकाणी   चेह-यावर मास्क, रुमाल वापरणे बंधनकारक आहे.भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा(Social Distancing) नियम पाळण्याची खात्री करण्यात यावी. कोणतीही संस्था अगर व्युवस्थापक हे सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा जमाव होऊ देणार नाही. अंत्यसंस्कार या ठिकाणी होणारे जमाव आदेशात नमुद तरतुदीनुसार  नियंत्रित करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आदेशात नमुद  तरतुदीनुसार  दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच दारु,गुटखा, तंबाखू इ. च्या विक्रीवर कडक निर्बंध असतील.  थुंकण्यानस सक्त मनाई असेल. अशा व्यहक्ती  विरुध्दख  आदेशात नमुद तरतुदीनुसार कारवाई  करावी.


कामाचे ठिकाण
सर्व कामाच्या ठिकाणी संबंधीत विभागप्रमुख / आस्थाप्रमुख यांनी  तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था असेल आणि तेथे  सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात  यावी. कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर(Social Distancing)सुनिश्चित करण्यासाठी कर्मचा-यांच्यास भोजन अवकाश कालावधीमध्ये   शिथीलता ठेवावी. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती,सह-रुग्ण,5 वर्षाखालील मुलांच्या पालकांना घरातून काम करण्यास प्रोत्साहित करावे. खासगी आणि सार्वजनिक अशा सर्व कर्मचा-याना आरोग्यसेतुच्या वापरास प्रोत्साहित केले जावे. सर्व संस्थांनी आपले कामाची ठिकाणे शिफ्टबदली दरम्याान निर्जंतुकीकरण करुन घ्यावीत. मोठया बैठका टाळाव्यात.


उत्पाादन आस्थांपना
सामान्यतः वारंवार साफसफाई  व  हात धुणे अनिवार्य करावे. शिफ्ट बदलामध्ये अंतर असावा. कॅन्टीनमधील भोजनावेळी सामाजिक अंतराचे पालन  करावे. सुसंवाद व संभाषणाच्या् माध्यमातुन  स्वाच्छते बाबत  प्रशिक्षण घेतले जावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 
कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनांमध्ये
सामाजिक अंतर राखण्यासाठी मानक कार्यप्रणाली
नांदेड, दि. 19:- सर्व कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्ये खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. यात परिसरातील जंतुनाशकांचा  वापर करून संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमुद केले आहे.

इमारत, कार्यालयाचे प्रवेशद्वार इ. , कॅफेटेरिया व कॅन्टीन, बैठक कक्ष,कॉन्फरन्स हॉल, उपलब्ध  मोकळी जागा, व्हरांडा, प्रवेशद्वाराचे गेट/फाटक, बंकर्स, कॅबिन, इ. इतर साहित्य तसेच लिफ्ट , बाथरुम, प्रसाधनगृहे, पाण्यााचे ठिकाणे, भिंती व इतर सर्व पृष्ठंभाग, सार्वजीनक इमारतीतील सर्व वॉश बेसिन्सच्या नळांना तोटया बसविण्या‍त यावे. बाहेरुन येणा-या कामगारांसाठी विशेष वाहतूक व्य्वस्था संबंधीत कार्यालयप्रमुख / आस्था्पना प्रमुख यांनी करावी. त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्य्वस्थेनवर अवलंबून राहावे लागू नये.वाहन क्षमतेच्या  30 ते 40 % प्रवासी वाहतुक करण्यानस परवानगी असेल. कार्यालयाचे आवारात येणारी सर्व वाहने निर्जंतुक करुन घ्या्वीत. शासकिय आवारात /कार्यालयाचे आवारात प्रवेश करणा-याची अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करुन घ्या्वी. स्पर्श न करता वापरता येण्याजोगे हात धुण्यारकरिताची साधने, पुरेशा प्रमाणातील सॅनिटायजर्स प्रवेशद्वाराजवळ तसेच निर्गमन द्वाराजवळ ठेवण्यात यावे. कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन अवकाश कालावधीमध्ये   शिथीलता ठेवावी. 10 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असेल अशा बैठका टाळाव्या्त. कामाच्या ठिकाणी, बैठकीनिमित्त जमावाचे ठिकाणी  एकमेकापासून 6 फूट अंतरावर बैठक व्यावस्था असावी. लिफ्टमध्ये एकावेळी 2/4 व्यीक्तीस (त्या ंचे आकारमानानुसार) प्रवेश द्यावा. चढण्यासाठी जिन्या च्यार वापरास प्रोत्साहन द्यावे

गुटखा, तंबाखू यावर कडक निर्बंध असुन सार्वजनीक  ठिकाणी  थुंकण्याास सक्त मनाई आहे. दोषी व्यक्तीं विरुध्द  आदेशातील  नमुद तरतुदीनुसार  कारवाई करावी. अनावश्यक अभ्यागतांना शक्यतो टाळावे.
कोविड रूग्णांवर उपचार करण्यास अधिकृत असलेल्या जवळपासच्या भागातील रूग्णालयांची नोंद करुन घ्यावी आणि सदर दवाखान्यांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध असावी. सर्व तालुक्याचे  तहसिलदार तथा  ईन्सीडेंट कमांडन्ट् हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होणा-या अत्यावश्याक हालचाली करीता पासेस वितरण करतील. जसे सूट दिलेली कार्यालये, कामाच्या  ठिकाणे, कारखाने व आस्थापनांमधील कर्मचारी इत्यादी. अशा दिलेल्या. सर्व पासच्या प्रती स्थानिक पोलिसांना  अग्रेषित करावे.
00000


कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवारकडून
सहाय्यता कक्षास 61  हजार रुपयांचा निधी
जिल्हाधिकारी  डॉ.विपीन यांच्याकडे सुपूर्द
नांदेड दि. 19 :- अंबेकरनगर नांदेड सेवानिवृत सहकार अधिकारी व माजी राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व योगाध्याम नांदेडचे सचिव श्री एम डी नल्लावार यांनी त्यांचे निवृत्तीवेतनातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मा.पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार व मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (कोरोना) आकरा हजार रूपयाचा निधी मा.जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन ईटनकर यांच्याकडे धनादेश देण्यात आला आहे.  
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...