पत्रकार
परिषद निमंत्रण ई-मेल
संदेश
दि. 19 एप्रिल 2020
प्रति
,
मा. संपादक / प्रतिनिधी दैनिक वृत्त्पत्र / दूरचित्रवाणी /
केबल टि.व्ही. नांदेड जिल्हा
विषय :- “कोरोना”संसर्ग बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद
संदर्भ :-
मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडील दूरध्वनी
संदेश दि. 19.4.2020
महोदय
,
उपरोक्त संदर्भीय
विषयाने “कोरोना” संसर्ग प्रतिबंधाबाबत
माहिती देण्यासाठी मा. डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी नांदेड
यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवार दि. 20
एप्रिल 2020 रोजी दुपारी 1 वा. डॉ. शंकरराव
चव्हाण जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड
येथे करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार
मगर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
कृपया पत्रकार परिषदेस आपण
किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन
यांनी वार्तांकनासाठी उपस्थित रहावे,
ही विनंती.
(कृपया पत्रकार परिषदेच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर)
व मास्कचा वापर करण्यात यावा, ही विनंती.)
वार
व दिनांक - सोमवार दि. 20 एप्रिल 2020
स्थळ
- डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन नांदेड
वेळ - दुपारी 1 वा.
आपली विश्वासू
स्वा/-
(मीरा ढास)
प्र.जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
प्रत
,
मा.
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
No comments:
Post a Comment