Sunday, April 19, 2020

कोरोना : नांदेड जिल्ह्याला दिलासा  
घरीच क्वारंटाईमध्ये असलेले 649 जण
 नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 649 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 196 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 35 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 73 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 576 अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी 46 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 373 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 320 नमुने निगेटीव्ह आले असून 48 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 76 हजार 211 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...