Monday, October 12, 2020

 

235 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

74 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 12 :- सोमवार 12 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 235 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 74 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 33 बाधित आले. 

आजच्या एकुण 510 अहवालापैकी 427 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 494 एवढी झाली असून यातील  14  हजार 632 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 295 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 11 ऑक्टोंबर रोजी विजयनगर सिडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 457 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 6, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 8, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 157, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 5, खाजगी रुग्णालय 15 असे 235 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.44 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, भोकर तालुक्यात 2, लोहा 1, माहूर 1, बिलोली 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, हिमायतनगर 1, किनवट 1, हदगाव 1, मुखेड 1, यवतमाळ 2 असे एकुण 41 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, लोहा तालुक्यात 1, माहूर 1,  भोकर 2, किनवट 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 1, देगलूर 1, कंधार 2, नायगाव 4 असे एकूण 33 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 295  बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 134, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 419, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 51, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 45, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 28, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 48,  मांडवी कोविड केअर सेंटर 13, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 29, भोकर कोविड केअर सेंटर 16,  बारड कोविड केअर सेंटर 4, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड केअर सेंटर येथे 41, धर्माबाद कोविड केअर सेंटर 23, उमरी कोविड केअर सेंटर 49, कंधार कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, खाजगी रुग्णालयात दाखल 218, लातूर येथे संदर्भित 4, निजामाबाद 4, आदिलाबाद 2, परभणी येथे संदर्भित 1 झाले आहेत. 

सोमवार 12 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 73, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 85 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 93 हजार 538,

निगेटिव्ह स्वॅब- 72 हजार 959,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 494,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 632,

एकूण मृत्यू संख्या- 457,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.44

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 732, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 295,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

 नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडून

अधिकृत 705 माथाडी कामगारांना मदत    

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मंडळाच्या राखीव निधीमधून यथाशक्य मदत व्हावी असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्षांनी नांदेड जिल्हा मंडळाला दिले होते. याप्रमाणे नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने एक ठराव घेऊन मंडळाच्या राखीव निधीमधून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे मंडळातील 705 माथाडी कामगारांना एकुण 21 लाख 15 हजार रुपयाची आर्थिक मदत माथाडी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. 

ही मदत माथाडी कामगारांना पोहचावी यासाठी राज्याचे कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय झाला होता. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते या मदतीचा प्रातिनिधीक धनादेश नांदेड हमाल माथाडी हातगाडा संघटनेचे सचिव भुजंग कसबे, विनायक सुर्यवंशी, शिवाजी दराडे, ट्रान्सपोर्ट ॲड डॉक वकर्स युनियनचे सहसचिव शिलन सोनकांबळे, मैनोद्दीन पठाण, प्रतापसिंह ठाकूर, प्रभाकर वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त मोसीन सय्यद, मंडळाचे सचिव अविनाश देशमुख, निरिक्षक डी. पी. फुले, व्हि. एच. पाटील, एम. एम. नाईक आदी उपस्थित होते.

00000




 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...