Monday, September 9, 2019

वृ.वि.2436
दि. 9 सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त
महाराष्ट्राचाएकात्मिक जल आराखडा तयार
- गिरीष महाजन
मुंबई, दि.9: राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी या सहानदी खोऱ्यांचा एकात्मिक जलआराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नदी खोऱ्यांमध्ये,नदी खोरे अभिकरणांचे गठण करण्यात येईल.जलसंपदा विकास व व्यवस्थापन धोरण आखण्यात येईल. सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल.स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे दूषित पाण्याचे शुध्दीकरण केले जाईल.पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले जाईल. भूगर्भीय सपाट खोऱ्यात खोल जमिनीसाठी ड्रोनेज तयार केले जाईल, पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामध्ये लाभधारकांना सहभागी करून प्रशिक्षण दिले जाईल.गाळपेर क्षेत्राचा बृहत आराखडा तयार केला जाईल.
शासनाने व्हिजन २०३०डॉक्यूमेंटनिती आयोगाकडे सादर केले आहे. याच्याशी सुसंगत प्रारूप आराखड्यातील शिफारशी टप्याटप्याने सन २०१९ ते २०३० या कालावधीत विभागाकडून राबविल्या जातील, असेही श्री.महाजन यांनी सांगितले.
००००


जिल्हास्तरीय शालेय (ग्रामिण क्षेत्र)
क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल
नांदेड दि. 9 :- आयुक्त क्रीडा युवक सेवा संचालनालय अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय (ग्रामिण क्षेत्र) क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. सन 2019-20 या वर्षातील या स्पर्धांचे आयोजन-नियोजन करण्यात आले होते, परंतू राज्यस्तर स्पर्धांच्या तारखात बदल झाल्यामुळे या स्पर्धेच्या वेळापत्रकात काही तांत्रीक कारणास्तव बदल करण्यात आला असुन सुधारीत तारखा पुढील प्रमाणे आहेत.    
जिल्हास्तर शालेय जिम्नॅस्टिक्स (14,17,19 वर्षे मुले / मुली) स्पर्धा 11 ते 12 सप्टेंबर 19 स्थळ- इनडोअर हॉल नांदेड, जिल्हास्तर शालेय सेपक टकरॉ (14,17,19 वर्षे मुले/मुली)- स्पर्धा दिनांक 13 ते 14 सप्टें.19 स्थळ- जिल्हा क्रीडा संकुल नांदेड, जिल्हास्तर शालेय डॉजबॉल (14,17,19 वर्षे मुले/मुली)- स्पर्धा 13 ते 14 सप्टें.19 स्थळ- इंदिरा गांधी मैदान नांदेड, जिल्हास्तर शालेय कबड्डी (14,17,19 वर्षे मुली) स्पर्धा 14 सप्टें.19 स्थळ- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड, जिल्हास्तर शालेय कबड्डी (14,17,19 वर्षे मुले) स्पर्धा 15 सप्टें.19 स्थळ- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड, जिल्हास्तर शालेय स्पीडबॉल (14,17,19 वर्षे मुले / मुली) स्पर्धा 16 ते 17 सप्टें.19 स्थळ- इनडोअर हॉल नांदेड, जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल (14,17,19 वर्षे मुले) स्पर्धा 19 ते 20 सप्टें.19 स्थळ यशवंत कॉलेज नांदेड, जिल्हास्तर शालेय खो-खो (14,17,19 वर्षे मुली) स्पर्धा 19 सप्टेंबर,2019 स्थळ- इंदिरा गांधी मैदान गोकुळनगर नांदेड, जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल (14,17,19 वर्षे मुली) स्पर्धा दिनांक 20 ते 21 सप्टें.19 स्थळ- यशवंत कॉलेज नांदेड, जिल्हास्तर शालेय खो-खो (14,17,19 वर्षे मुले) स्पर्धा दिनांक 20 सप्टेंबर,2019 स्थळ- इंदिरा गांधी मैदान गोकुळनगर नांदेड, जिल्हास्तर शालेय रोलबॉल (14,17,19 वर्षे मुले/मुली) स्पर्धा 21 ते 22 सप्टें.19 स्थळ जिल्हा क्रीडा संकुल नांदेड, जिल्हास्तर शालेय फुटबॉल (14,17,19 वर्षे मुले/मुली) स्पर्धा 21 ते 22 सप्टें.19 स्थळ- ऑक्सफर्ड ग्लोबल स्कुल निळा रोड पुयणी नांदेड, जिल्हास्तर शालेय टेनिक्वॉईट (14,17,19 वर्षे मुले/मुली) स्पर्धा 27 ते 28 सप्टें 2019 स्थळ जि.क्री.सं.इनडोअर हॉल नांदेड, जिल्हास्तर शालेय क्रिकेट (14 वर्षे मुले 17 मुली) स्पर्धा 27 सप्टें,2019 स्थळ गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम नांदेड, जिल्हास्तर शालेय क्रिकेट (17 वर्षे मुले 19 मुली) स्पर्धा 28 सप्टें 2019 स्थळ-गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम नांदेड, जिल्हास्तर शालेय क्रिकेट (19 वर्षे मुले) स्पर्धा 29 ते 30 सप्टें,2019 स्थळ गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम नांदेड, जिल्हास्तर शालेय रग्बी (14,17,19 वर्षे मुले/मुली)- स्पर्धा 30 सप्टेंबर 2019 स्थळ पिपल्स कॉलेज नांदेड,जिल्हास्तर आट्यापट्या (14,17,19 वर्षे मुले/ मुली)- स्पर्धा 7 ते 8 ऑक्टोंबर 2019 स्थळ इंदिरा गांधी मैदान नांदेड, जिल्हास्तर जलतरण (14,17,19 वर्षे मुले/ मुली)-स्पर्धा 14 ते 15 ऑक्ट2019 स्थळ सैनिकी विद्यालय सगरोळी बिलोली.
नांदेड जिल्हयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षकांनी या स्पर्धा तारखेच्या बदलाची नोंद घेवुन आपल्या शाळा, महाविद्यालयातील खेळाडुंची प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
00000


कुष्ठरोग शोध अभियानाची
जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
                  नांदेड दि. 9 :- जिल्ह्यातील जनतेच्या व जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने केंद्र शासनाने ऑक्टोंबर 2020 पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातून कुष्ठरोगाचे दुरीकरण साध्य करणे हे उद्दीष्ट निश्चित केले आहे.
                  भारत सरकारच्यावतीने सन 2003 पासून राज्यामध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
                  वाढत्या आर्युमानाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य संक्रमनात असंसर्गजन्य रोगामुळे 63 टक्के मृत्यू संभावतात. सर्वसाधारणपणे उच्चरक्त दाब, मुधमेह, कर्करोग, श्वसनदाह यांचा समावेश प्रमुख अससंर्गजन्य रोगाअंतर्गत होतो.  बदल्या जीवन शैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे.
                  यावर्षी राज्यात व जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 13 सप्टेंबर 2019 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्याचे ठरवले आहे. या अभियानात आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवकामार्फत घरोघरी भेट देवून घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन संशयीत रुग्ण शोधणार आहेत. शोधलेल्या संशयितांची त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करुन निदान निश्चित करुन मोफत उपचार करण्यात येणार आहे.
                  त्यासाठी जिल्ह्यात 2 हजार 692 टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टिमच्या पर्यवेक्षणासाठी 362 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी 7 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. व्ही. आर. मेकाने, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, शिक्षणाधिकारी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.  हजारी, श्री. टाकळकर, गाजुलवार, मोटरगे, पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कुष्ठरोग शोध अभियानात प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची कटाक्षाने तपासणी करण्याचे आदेश दिले व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले, अशी माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नांदेड यांनी दिली.
0000


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा
शिकाऊ उमेदवारांची 56 पदांसाठी भरती   
                  नांदेड दि. 9 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेडमध्ये सन 2019-20 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे (यांत्रिक-42, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-5, पेंटर-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 अशी एकुण 56) ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
         त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Nanded या आस्थापने करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनाप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
                  जे उमेदवार या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करता येईल म्हणजेच त्यांनाच शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती करण्यात येईल त्याच उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म रजिस्टर होतील. जे उमेदवार या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देणार नाहीत, त्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीकरीता विचार केला जाणार नाही. त्यामुळे सदरचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीकरीता इच्छुक असणा-या उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरुन 23 सप्टेंबर 2019 दुपारी 3 वाजेपर्यंत या कार्यालयास दाखल करावे लागतील. छापील अर्ज विभागीय कार्यालय,कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे 23 सप्टेंबर रोजी शनिवार सुट्टीचे दिवस वगळुन 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील लगेच स्विकारले जातील.
                  या अर्जाची किंमत (GST 18 टक्के सहीत) खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. मुदतीत 23 सप्टेंबर 2019 रोजी वेळ 15 नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ते रद्द समजले जातील. त्यांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. तसेच शिकाऊ उमेदवारांच्या पदांची / जागेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल तयार करुन निश्चित करण्यात येणार असल्याने त्यानुसार वरील पदामध्ये / जागेच्या संख्यमध्ये बदल करण्यात येणार असल्याने सदर जाहिरात त्याअधी (पद/जागा निश्चित करण्याअधन) प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यामुळे वरील पद / जागा कमीअधिक होऊ शकतात याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन, नांदेड यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...