Monday, September 9, 2019


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा
शिकाऊ उमेदवारांची 56 पदांसाठी भरती   
                  नांदेड दि. 9 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेडमध्ये सन 2019-20 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे (यांत्रिक-42, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-5, पेंटर-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 अशी एकुण 56) ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
         त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Nanded या आस्थापने करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनाप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
                  जे उमेदवार या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करता येईल म्हणजेच त्यांनाच शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती करण्यात येईल त्याच उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म रजिस्टर होतील. जे उमेदवार या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देणार नाहीत, त्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीकरीता विचार केला जाणार नाही. त्यामुळे सदरचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीकरीता इच्छुक असणा-या उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरुन 23 सप्टेंबर 2019 दुपारी 3 वाजेपर्यंत या कार्यालयास दाखल करावे लागतील. छापील अर्ज विभागीय कार्यालय,कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे 23 सप्टेंबर रोजी शनिवार सुट्टीचे दिवस वगळुन 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील लगेच स्विकारले जातील.
                  या अर्जाची किंमत (GST 18 टक्के सहीत) खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. मुदतीत 23 सप्टेंबर 2019 रोजी वेळ 15 नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ते रद्द समजले जातील. त्यांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. तसेच शिकाऊ उमेदवारांच्या पदांची / जागेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल तयार करुन निश्चित करण्यात येणार असल्याने त्यानुसार वरील पदामध्ये / जागेच्या संख्यमध्ये बदल करण्यात येणार असल्याने सदर जाहिरात त्याअधी (पद/जागा निश्चित करण्याअधन) प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यामुळे वरील पद / जागा कमीअधिक होऊ शकतात याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन, नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...