Tuesday, September 1, 2020

 

महाराजांच्या विवेकाचा जागर

पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले. सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दिप आता मालवला आहे या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

नांदेड येथील डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्प‍िटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.  

00000

104 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

312 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मंगळवार 1  सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 104 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 312 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 224 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 257 अहवालापैकी  877 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 7 हजार 27 एवढी झाली असून यातील 4 हजार 662 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण 71 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 80 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 244 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 

सोमवार 31 ऑगस्ट रोजी कलालगल्ली नांदेड येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा, पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा, भोकर येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा, देगलूरनाका येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, हदगाव नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर मंगळवार 1  सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील 53 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गाडीपुरा नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे, गोकुंदा वैशालीनगर किनवट येथील 59 वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 5, उमरी कोविड केअर सेंटर 4, मुखेड कोविड केअर सेंटर 19, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 69, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 4 असे एकूण 104 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 24,  देगलूर तालुक्यात 14,  भोकर 2, लोहा 1, नायगाव 4, कंधार 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण  5, अर्धापूर 4, हदगाव 4, किनवट 17, मुखेड 7, यवतमाळ 1, हिंगोल 2 असे एकुण 88 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 114, अर्धापूर तालुक्यात 8,  भोकर 1, मुखेड 4, किनवट 6, नायगाव 12, हिमायतनगर 1, धर्माबाद 17, परभणी 2, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड 4, बिलोली 3, लोहा 23, कंधार 16, हिंगोली 3, देगलूर 2, उमरी 1, पुणे 1 असे एकुण 224 बाधित आढळले. 

 

जिल्ह्यात 2 हजार 80 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 206, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 707, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 72, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 45, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 83, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 124,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 55, लोहा कोविड केअर सेंटर येथे 99, हदगाव कोविड केअर सेंटर 36, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 32,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 86, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेटर 29,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 32, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 66, उमरी कोविड केअर सेंटर 43, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 284 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद 2, मुंबई 1, हैदराबाद येथे 5 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 994,

घेतलेले स्वॅब- 48 हजार 459,

निगेटिव्ह स्वॅब- 39 हजार 537,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 312,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 27,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6,

एकूण मृत्यू संख्या- 237,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 662,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 80,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 258, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 244. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.  

 

00000

 


कर्मचाऱ्यांची व रिक्त पदाची माहिती

ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदवावी

-         जिल्हा सांख्यिकी अधिकारी बासटवार

नांदेड (जिमाका) दि. 1:- कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2020 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयमार्फत सुर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालयानी त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.

नियोजन विभागाचे शासन परिपत्रक 27 ऑगस्ट 2020 सार जिल्ह्यातील सर्व राज्यशासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमित्तेर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2020 यासंदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. ही माहिती नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. 

ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा कार्यालयानी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी अधिकारी, नांदेड जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचा दूरध्वनी 02462-252775, -मेल- dso.nanded@hotmail.com येथे संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेडचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी नि. ग. बासटवार यांनी केले आहे.

00000


 

 दहावी नंतर शासकीय सुविधांचा लाभ घेत पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा

- प्राचार्य डॉ जी. व्हि. गर्जे

 

·         प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी बंधनकारक 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- येत्या पाच वर्षात राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित. त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, डी.एम.एल.टी इत्यादी निवडून उज्वल भविष्याची सुरुवात करावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे. 

टाळेबंदीच्या काळात सुद्धा एच.सी.एल टेक्नॉलॉजी, आय.एस.टी.सी, बजाज प्रा.ली., एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी, टाटा इंजिनीरिंग, जॉन डिअर, लोकेश मशीन, व्हेरॉक इंजिनीअरिंग, अदाणी इलेक्ट्रिकल्स, फोर्ब्स मार्शल, महिंद्रा अँड महिंद्रा, सुरोज बिल्डकॉम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, व्हर्लपूल, अश्या अनेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मागणी होते आहे. ह्या कंपन्या विद्यार्थ्यांना ऑन-रोल देखील घेण्यास तयार आहेत.  

पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो तोही कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय. दहावी नंतर आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रात कनिष्ठ पातळीवर कामासाठी निवडला जाईल. तर पॉलिटेक्निक पदविका प्राप्त विद्यार्थी सुपरवायझरी लेव्हलवर निवडले जातात. त्यामुळे आय.टी.आय. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. 

यातच मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अनेक शासकीय योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश मिळतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा  विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा घेता येतो. खुल्या प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत निवास व भोजनासाठी शिष्यवृत्ती मिळते. तसेच वार्षिक 6 लक्ष उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ बी सी सवलतीचा फायदा मिळतो. व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी, निवास व भोजनासाठी दरवर्षी आर्थिक मदत शासनातर्फे मिळते.  अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम, जैन, बौद्ध, पारशी, शीख आदी विद्यार्थ्यांना अधिकतम 25 हजार रुपये पर्यंतचे शिक्षण शुल्क माफ केले जाते. या शिवाय आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या होतकरु, हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे ट्युशन फीस वेवर स्कीम अंतर्गत प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण शुल्क शासनातर्फे दिले जाते. ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाचे अट असते. 

या सर्व आर्थिक सोई-सुविधांचा लाभ घेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन करणे किंवा घरुनच आपल्या मोबाईलवरुन करणे बंधनकारक आहे. कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तांत्रिक शिक्षणाचा वाटा मोठा आहे त्यामुळे इतर पारंपारिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निकच्या तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल. त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेची निवड करत उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिले पाऊल टाकावे असे आवाहन प्राचार्य, डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे.

000000

 

माझी तब्यत उत्तम आहे तुम्ही सर्व काळजी घ्या

- जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- "कोविड-19 ची लक्षणे मला दिनांक 30 ऑगस्ट रोजी लक्षात आल्याबरोबर मी रितसर विनाविलंब तपासणी करुन घेतली. यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. काल सोमवार 31 ऑगस्ट 2020 माझा आहवाल बाधित आल्याने आपल्या नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरु केले आहेत. माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू" असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटल कक्षातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...