Friday, December 2, 2016

नाबार्ड फायनांन्शीयलबाबत गैरसमज पसरवून
फसवणूक करणाऱ्यांपासून सावधानतेचा इशारा
नांदेड, दि. 2 :- नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. ही रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे नॉन बँकींग फायनांस कंपनी-सुक्ष्म वित्तपुरवठा संस्था (मायक्रो फायनांस) म्हणून नोंदणीकृत आहे. तथापी काही घटक या संस्थेबाबत गैरसमज पसरवून ग्राहक, बचत गट आदींची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटकांपासून सावध राहावे, व त्याबाबत नाबार्ड फायनान्सीयल सर्व्हिसेस लि. शी संपर्क साधावा, असे आवाहन सर्व्हिसेसचे महाव्यवस्थापक ओ. पी. धोंडीयाल व सहायक महाव्यवस्थापक मनोज चलाख यांनी केले आहे.
याबाबत नाबार्ड फायनान्सीयल सर्व्हिसेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व्हिसेस लिमीटेडचे चे प्रवर्तक हे नाबार्ड, कर्नाटक सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका आहेत. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. चा प्रमुख उद्देश म्हणजे स्वयंसहाय्यता बचतगटाच्या / जेएलजी ग्रुपच्या / इतर माध्यमातून ग्रामीण भागात घरपोच , वित्तीय सेवा पुरवणे हा असून त्यासाठी ज्या अशासकीय संस्था ज्या की स्वंयसहाय्यता बचतगट तयार करतात त्यांची नियुक्ती ही व्यवसाय सहाय्यक म्हणून केली जाते.
नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. चा प्राथमिक उद्देश नफा कमावणे हा नसून ज्या लोकांना वित्तीय सहाय्यक मिळत नाही अशा ग्रामीण , शहरी भागातील लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरवणे व भांडवल उपलब्ध करुन देणे हा आहे. तथापि काही अशासकीय संस्था एमएफआय व नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. बद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. अशा दोन अशासकीय संस्थाकडून काही स्वयं सहाय्यता बचत गटांना फसवण्यातही आले आहे व ह्या अशासकीय संस्थांनी स्वयं सहाय्यता बचत गटाकडून व त्यांच्या गरीब सभासदांकडून कर्जाचे वसुल केलेले पैसे, रक्कम फायनांन्शीयल सर्व्हिसेसच्या खात्यात जमा केलेले नाहीत. यासाठी ग्राहकांनी कर्ज हप्त्याची परतफेड केल्यानंतर संबंधित एनजीओच्या प्रतिनिधीकडून पावती घेणे बंधनकारक आहे. ज्या एनजीओनीं ग्राहकांचा गैरफायदा घेऊन, त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी जी चुकीची गैर माहिती पसरविण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यामागे स्वंय सहाय्यता बचतगटांना / ग्रामीण गरीब सभासदांना फसवणाऱ्या एनजीओ अशासकीय संस्था आहेत.
नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. रिजर्व बँक ऑफ इंडियाने एमएफआयसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदारापेक्षा कमी व्याजदराने काम करते. हा व्याजदर वार्षीक 15.5 टक्के ते 16.9 टक्के असून हा उर्वरीत / बाकी राशीवर असतो व हा व्याजदर भारतात काम करणाऱ्या या क्षेत्रातील अन्य संस्था-कंपन्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. ही नियंत्रीत संस्था असून तिचे लेखा-परीक्षण नियमितपणे नाबार्ड, आरबीय आणि कॅग (RBI , Comptroller & Auditor General of India) यांच्याकडून केले जाते. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमावलींचे काटेकोर पालन करते.
ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. च्या व्याजदर किंवा परतफेडीविषयी इत्यादी माहिती हवी असेल तर 1800 1024 205 या कॅाल सेंटरशी किंवा तक्रार निवारण अधिकारी 08026970500 यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, तसेच थेट नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. यांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता,असेही नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि.चे सहायक महाव्यवस्थापक चलाख यांनी कळविले आहे.

0000000
जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना
 नुतनीकरणाबाबत आवाहन
नांदेड, दि. 2 :-  जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकरी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत शस्त्र परवाने ज्याची मुदत शनिवार 31 डिसेंबर 2016 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा. परवानाधारकाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नुतनिकरण शुल्क जमा करावे आणि विहित नमुन्यातील अर्ज व मुळ शस्त्र परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा , असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाचे निर्देशानुसार NATIONAL DATA BASE (NDAL) च्या संकेतस्थळावर ज्या शस्त्र परवानाधारकांची माहिती अपलोड करण्यात आली आहे, अशा शस्त्र परवानाधारकांना युआयएन नंबर देण्यात आला आहे. ज्या शस्त्र परवान्यांना युआयएन नंबर नाही असे शस्त्र परवाने रद्द समजण्यात येतील असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
नांदेड दक्षिण, उत्तर मतदारसंघातील
मतदारांना छायाचित्रांबाबत आवाहन
नांदेड, दि. 2 :- तालुक्यातील 86- नांदेड उत्तर व 87- नांदेड दक्षिण या मतदारसंघातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागात याद्यांचे वाचन करुन प्रसिद्धी देण्यात येणार आहे. रविवार 4 डिसेंबर 2016 पर्यंत मतदारांनी आपली छायाचित्रे तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मनपा नोडल अधिकारी यांचेकडे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
आजपर्यंत अनेक माध्यमातून याबाबत मतदारांना आवाहन करण्यात आले असल्याचे निवडणूक विभाग तहसिल नांदेड यांनी सांगितले. जिल्हा संकेतस्थळ, मनपा कार्यालयात, पंचायत समिती व प्रत्येक मतदान केंद्रावर याद्यांची प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रसार माध्यमांद्वारे टिव्ही, आकाशवाणी, वृत्तपत्र इत्यादीद्वारे आवाहन केले आहे. पुन:श्च अंतिम सूचना मतदारांना याद्वारे देवून आवाहन करण्यात येते की  यादीची पाहणी करुन विहित मुदतीत छायाचित्रे जमा करावेत अन्यथा यादीतून नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेवून राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार पी. के. ठाकूर नांदेड यांनी केले आहे.

00000000
अनुसूचित जातीतील दारिद्रयरेषेखालील
लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयामार्फत विशेष घटक योजनेखाली अनुसुचित जातीतील (एससी) दारिद्रयेरेषेखालीलाभार्थ्यांना कर्ज प्रकरणबँकेस शिफारस करण्यात येते मंडळाकड प्रोत्साहन म्हण अनुदान दिल्या जाते. यासाठी आवयश्क कागदपत्रे पुढीलप्रमाणे  फोटो दोन, ग्रामसेवक यांचे हिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड / मतदान कार्ड, राशनकार्ड, तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्रामीण भागाकरीता 40 हजार 500 रुपये शहरी भागाकरीता 51 हजार 500 रुपये, दारिद्ररेषेचे प्रमाणपत्र, जागेचा उतारा, करपावती, जातीचे प्रमाणपत्र  कोटेशन , संबंधित महामंडळाचे बेबाकी प्रमाणपत्र ही  कागदपत्रआवश्यक आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय नांदेड दूरध्वनी -02462-240674, तालुका बलुतेदार संस्था कर्मचारी संपर्क- सचिव, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. (विष्णुनगर कोंडावार यांच्याजागेत ) नांदेड  मो- 9960418482, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. लोखंडे चौक मुखेड जि. नांदेड मो- 9403135949, 8600842601, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. (अण्णाभाऊसाठे शॉपींग सेंटरच्या पाठीमागे) कंधार जि. नांदेड मो- 9403135949, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ रेल्वे स्टेशन रोड भोकर जि. नांदेड-9421761095, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. अयोध्यानगर पंचायत समिती पाठीमागे  अयोध्यानगर हदगाव जि. नांदेड मो- 8624994506, सचिव  विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. गोकुंदा रोड अशोक स्तंभाजवळ किनवट  जि. नांदेड मो- 8624994506, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. व्यंकटेश टॉकीज जवळ देगल  जि. नांदेड मो- 9373565547, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. कोंडलवाडी रोड बिलोली जि. नांदेड मो- 9373565547.

0000000
तुर अळ्याच्या नियंत्रणासाठी संदेश
नांदेड, दि. 2 :- तुरीवरील शेंगा खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 2 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पीक तनविरहीत ठेवावे. हा संदेश शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून देण्यात आला आहे.
उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर अंतर्गत देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यासाठी तुर व हरभरा पिकासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील सर्वेक्षणाचे काम चालू आहे. किडसर्वेक्षक, किडनियंत्रक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हा संदेश देण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी दिली आहे.

000000
गतिक एचआयव्ही / एड्स दिनानिमित्त
विधीसेवा प्राधिकरणाचे कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 2 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयातर्फे नुकतेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यक महाविद्यालय तथा रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील बाहयरूग्ण विभागामध्ये ‘‘जागतिक एचआयव्ही / एड्स दिनानिमित्त जनजागरण कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
अध्यक्षस्थानावरुन न्या. . आर. कुरेशी यांनी महिला लहान मुलांचे लैगिक शोषण याबाबत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली एचआयव्ही बाधितांनी खचून जाता जागरूक राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
            तत्पुर्वी अॅड. राणा सारडा यांनी व्यावसायि तस्करी लैंगिक शोषण झालेल्या महिला बालकांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची  माहिती दिली. डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी एआरटीची समाजात जागरुकता होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अॅड. प्रविण अयाचित यांचेही भाषण झाले. अॅड. जगजीवन भेदे, अॅड. नय्युमखान पठाण, डॉ. जमदाडे, डॉ. उबेद, डॉ. गाडेकर, डॉ. ईनामदार, डॉ. डोम्पल्ले, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. रूपल गिरासे, डॉ. भिसे, डॉ. नाजीया यांची यावेळी उपस्थिती होती. वैद्यक महाविद्यालयाच्यावतीने जनजागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले. डॉ. गट्टाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...