तुर अळ्याच्या नियंत्रणासाठी संदेश
नांदेड, दि. 2 :- तुरीवरील शेंगा
खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 2 ग्रॅम
प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पीक तनविरहीत ठेवावे. हा संदेश शेतकऱ्यांना
वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून देण्यात आला आहे.
उपविभागीय कृषि अधिकारी
देगलूर अंतर्गत देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यासाठी तुर
व हरभरा पिकासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील सर्वेक्षणाचे काम चालू आहे.
किडसर्वेक्षक, किडनियंत्रक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हा संदेश देण्यात
आल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment