Friday, December 2, 2016

जागतिक एचआयव्ही / एड्स दिनानिमित्त
विधीसेवा प्राधिकरणाचे कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 2 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयातर्फे नुकतेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील बाहयरूग्ण विभागामध्ये ‘‘जागतिक एचआयव्ही / एड्स दिनानिमित्त’ जनजागरण व कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
अध्यक्षस्थानावरुन न्या. ए. आर. कुरेशी यांनी महिला व लहान मुलांचे लैंगिक शोषण याबाबत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व एचआयव्ही बाधितांनी खचून न जाता जागरूक राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
            तत्पुर्वी अॅड. राणा सारडा यांनी व्यावसायिक तस्करी व लैंगिक शोषण झालेल्या महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची  माहिती दिली. डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी एआरटीची समाजात जागरुकता होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अॅड. प्रविण अयाचित यांचेही भाषण झाले. अॅड. जगजीवन भेदे, अॅड. नय्युमखान पठाण, डॉ. जमदाडे, डॉ. उबेद, डॉ. गाडेकर, डॉ. ईनामदार, डॉ. डोम्पल्ले, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. रूपल गिरासे, डॉ. भिसे, डॉ. नाजीया यांची यावेळी उपस्थिती होती. वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने जनजागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले. डॉ. गट्टाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

00000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्रमांक दुष्काळामुळे खचून जावू नका ; संकट काळात शासन बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   नांदेड ज...