Saturday, June 11, 2022

अर्धापूर येथील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला प्राधान्य

-  पालकमंत्री अशोक चव्हाण 

·   विविध विकास कामांचा आढावा 

 नांदेड (जिमाका) दि. 11 :- अर्धापूर शहरातील गजबजलेल्या वस्तीमुळे अनेक भागात विद्युत खांबावरील तारा या धोक्याच्या ठरू पाहत आहेत. लोकांच्या जीविताला प्राधान्य देऊन अर्धापूर येथे भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. 

अर्धापूर येथील विविध विकास कामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष पुंडलिक कानोडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तहसिलदार उज्ज्वला पांगरकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे व मान्यवर उपस्थित होते. 

वाढत्या नगारिकरणामुळे अनेक शहराची लोकसंख्या वाढत आहे. अर्धापूर शहराची संख्या वाढल्यामुळे या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने हे आरोग्य केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली अग्निशमन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरपंचायतीला सूचना दिल्या. 

प्रत्येक घराला नळाचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टिने पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सद्यस्थितीत नवीन 1 हजार 400 घरांना नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. ही एकुण संख्या 4 हजारापर्यंत अपेक्षित आहे. नव्याने कार्यान्वित झालेली ही पाणी पुरवठा अधिक सक्षम चालावी यादृष्टिकोणातून वार्ड निहाय पाणी किती दाबाने पोहचते हे तपासून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याचबरोबर सदर कामामुळे ज्या-ज्या भागात रस्ते तोडली गेली आहेत त्याची तात्पुरती डागडुजी करून ड्रेनजच्या कामानंतर कायमस्वरुपी ही दुरूस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उर्दू शाळेच्या जागेबाबतही चाचपणी करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

00000   






आझादी का अमृत महोत्सवातर्गंत

प्रतिष्ठित आठवडा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 10 :- आझादी का अमृत महोत्सवातर्गंत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या निर्देशानुसार प्रतिष्ठित आठवडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक नांदेड तसेच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृतखाजगीक्षेत्रीय ग्रामीण बँक यांनी केले.

या कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी एसबीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक नविनकुमार उप्पलवार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, शिवकुमार झाए जी एम, नाबार्डचे डीडीएम दिलीप दमाय्यावरडीडीएम नाबार्डचे जीएम डीआयसी प्रवीण खडके, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व योजनांचे पात्र लाभार्थी यांची उपस्थिती होती. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कवडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून बँकाच्या योजना तसेच परतफेडीबद्दल माहिती देऊन होणारे फायदे दर्शवले. यावेळी लाभार्थ्यांसोबत बँक सेवा पुरवण्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारीग्राहक सेवा केंद्रचालक व इतर कर्मचाऱ्यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कर्जाच्या परतफेडीचे महत्त्व उपस्थित लाभार्थ्यांना पटवून दिले.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात

         मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 14 जून 2022 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील महसूल विभागातू सेवानिवृत्त झालेले अधिकारीकर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 14 जून 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 10 :- इयत्ता 12 वीची परीक्षा मार्च-एप्रिल-2022 परीक्षेचा निकाल माहे जून -2022 मध्ये जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क शुक्रवार 10 जून 2022 ते शुक्रवार 17 जून 2022 अशा आहेत.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, शनिवार 18 जून 2022 ते 21 जून 2022, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख बुधवार 22 जून 2022 आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइ्रन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात .

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्च-एप्रिल 2022 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2022 व फेब्रुवारी –मार्च 2023 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलीत शल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

 पॉलिटेक्निक पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

नांदेड (जिमाका) दि. 10 :- शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील  पॉलिटेक्निक पदविका प्रवेश  प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इयत्ता दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल लागण्यापूर्वीच या प्रवेशासाठी नोंदणी करू शकतील. नोंदणीही ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकते. मागील तीन वर्षापासून पदविका प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत सुलभ अशी प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. सुविधा केंद्रांवर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतीही फी  आकारली जात नाही. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आगामी वर्षातील पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्राची तसेच सर्व समुपदेशन केंद्राची सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य         डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर  प्रत्यक्ष तपासणीसाठी सदरील अर्ज सुविधा केंद्रावर उपलब्ध सर्व मूळ कागदपत्रांसह तपासून निश्चित करून घ्यावा. ई- तपासणी स्वीकारली असल्यास वेळोवेळी ऑनलाईन येणाऱ्या त्रुटीची पूर्तता करावी.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी जन्म प्रमाणपत्र इयत्ता दहावीचा निर्गम उतारा असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. इतर मागास वर्ग विशेष मागासवर्ग तसेच भटक्या जाती व जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र  (मार्च २०२३ पर्यंत चालणारे )असणे आवश्यक आहे. याशिवाय आदिवास प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार अपंगाचा दाखलासंरक्षण दलात पालक असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल  प्रवर्गासाठी चे प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक  यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र. वेगवेगळ्या वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती प्रवेश पुस्तिकेत दिलेली आहे. सदरील पुस्तिका ऑनलाइन http://www.dtemaharashtrea.gov.in  येथे उपलब्ध आहे असेही शासकीय पॉलिटेक्निक  संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

सोमवारी बँक व्यवस्थापकांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानांतर्गत स्वयं सहायता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पत पुरवठा करुन देण्यात येतो. राज्य व जिल्हास्तरावर प्रत्येक बँक शाखेला उद्दिष्ट देण्यात येते. हे उद्दिष्ट साध्य व्हावे व बँक व्यवस्थापकांचे सहकार्य प्राप्त होण्यासाठी सोमवार 13 जून 2022 रोजी सकाळी 11 ते सायं. या वेळेत बँक व्यवस्थापकांचे एक दिवशीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांनी केले आहे.

 

जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार‍, जिल्हा अभियान व्यवस्थापक माधव भिसे, प्रशिक्षक दीक्षित सर यांचे या कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...