Wednesday, July 10, 2019

पिक विमा 24 जुलै पूर्वी भरावा



नांदेड दि. 10 :- खरीप हंगाम 2019 साठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख बुधवार 24 जुलै 2019 असुन शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता त्यापुर्वी विमाहप्ता आपल्या जवळच्या बँकेत / जनसुविधा केंद्रात भरावा. अर्ज सादर करताना चालु 7/12, 8-अ उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड छायांकित प्रत व विमा अर्ज विमा हप्ता रक्कमेसह दयावा. जनसुविधा केंद्राद्वारे (सी.एस.सी सेंटर) विम्याचा प्रस्ताव दाखल करताना विमा हप्ता व्यतिरीक्त कोणतेही शुल्क देऊ नये.  शेतकऱ्यांसाठी ही सेवा नि:शुल्क आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू



नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात 25 जुलै 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 जुलै 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 25 जुलै 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

महिला लोकशाही दिनी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 10 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 15 जुलै 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
0000

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा


नांदेड दि. 10 :-  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 13 जुलै 2019 रोजी परळी येथून नांदेड येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळ येथे दुपारी 1.15 वा. आगमन व राखीव. दुपारी 1.45 वा. ट्रू-जेट विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.  

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...