Tuesday, August 28, 2018


धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूक
प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
लेखी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 28 :- धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणुकीसाठी मा. उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात मौ. माष्‍टी, मौ. पाटोदा थडी व मौ. शेळगाव थडी या तीन गावांचा नव्‍याने समावेश करण्‍यात आला आहे. या तीन गावांकरीता सुधारीत प्रारूप मतदार यादी 29 ऑगस्ट रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद निवडणूकीच्या अनुषंगाने प्रारूप शेतकरी मतदारसंघाची यादी 29 ऑगस्ट 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व संबंधीत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नोटीस बोर्डावर तीन गावाची यादी प्रसिध्‍द करण्‍यात येत असून त्‍याचा सुधारीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
तपशील
दिनांक
वेळ
स्‍थळ
प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
29.08.2018
स. 11.00 वाजता      
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर. 
प्रारुप मतदार यादीवर हरकती स्विकारणे 
29.08.2018 ते 7.09.2018
कार्यालयीन वेळेमध्‍ये (पुराव्‍यांसह)
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय,   सामान्‍य शाखा - 1 .
प्राप्‍त हरकतीवर सुनावणी
11.09.2018
स.11.00  
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय
आलेल्‍या हरकतीवर निर्णय देणे
17.09.2018
दु. 4.00 वा.             
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय
अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणे
22.09.2018
स. 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर. 
            या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास मतदार यादी प्रसिध्‍दी कार्यक्रमात नमुद दिनांकानुसार जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी (कृउबास) यांचे कार्यालय सामान्‍य    शाखा-1 येथे ‘’लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह’’ कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) नोंदविता येतील. तसेच प्रसिध्‍दी कार्यक्रमातील आक्षेप कालावधी संपल्‍यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घेण्‍यात यावी. तरी आक्षेप विहीत कालावधीमध्‍ये ‘’लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह’’ देण्‍याचे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांचे आदेशान्‍वये दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणा-या नांदेड जिल्‍ह्यातील धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन नांदेड येथे जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली व संबंधीत कृउबास च्‍या बाजार क्षेत्रातील विविध राजकीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत दि.19 मे2018 रोजी आरक्षण जाहीर करण्‍यात आले, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


रोजगार मेळाव्यात 71
उमेदवाराची प्राथमिक निवड
नांदेड दि. 28 :- जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडमार्फत आज महात्मा फूले मंगल कार्यालय, फुले मार्केट, शासकीय आयटीआयजवळ नांदेड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 71 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.  
मेळाव्यास अध्यक्षस्थानी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान हे होते. तर प्रमूख पाहूणे म्हणून श्री हुजूर साहेब  आयटीआयचे प्राचार्य श्री गुरुबच्चणसिंह  होते.
सहायक संचालक श्री. सकवान म्हणाले, सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया  प्रमाणात वाव आहे. बेरोजगारांनी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे, बेरोजगार उमेदवारानी स्वत:चा उद्योग सुरु करावा. सध्या खुप बदल झाला आहे. काळाप्रमाणे आपण स्वत: बदल करुन घेतला पाहिजे. काम केल्याशिवाय आपणाला कोणीही पैसा देणार नाही हे लक्षात ठेवावे.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी कंपनीव्दारे भविष्याला ळण देणारा ठरणार आहे. आय.टी.आय पास असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन श्री. गुरुबच्चणसिंह यांनी केले.
त्याचप्रमाणे उपस्थित कंपनीचे अधिकारी यांनी आप-आपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. ट्रेनी ऑपरेटर, एटीएम ऑपरेटर, सीटी बॉयकर, ऑफिसर रिपोटर्स, ऑफिसर कॉल सेंटर, ड्रॉयव्हर, फार्मासिस्ट,फिल्ड ऑफिसर या पदाची भरती करण्यात आली. सुत्रसंचालन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी  भूजंग रिठे यांनी केले.
000000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब
मंडळ निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 28 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे. या मतदार यादीवर आक्षेप/ दुरुस्‍ती / नाव समाविष्‍ट इत्‍यादी बाबत आक्षेप असल्‍यास मतदारांनी 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत विहीत नमुन्‍यातील फॉर्म–2 भरुन संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत. तसेच www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.  
प्राप्‍त दावे व हरकती / आक्षेप सक्षम अधिकारी जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या कार्यालयात 4 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत निकाली काढण्‍यात येणार आहेत. जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20 ते दिनांक 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्‍यानंतर 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल. ज्‍या मतदारांना प्रारुप मतदार यादीवर आक्षेप असल्यास मुदतीत विहित नमुन्‍यातील फॉर्म भरुन त्‍यांचे आक्षेप् लेखी स्‍वरुपात संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.                                    
प्रारुप मतदार यादी मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रारुप मतदार यादी व अधिसूचना प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच  संबंधित जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयांच्‍या सुचना फलकांवर त्‍या-त्‍या तालुक्‍याची प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.  
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी अधिसूचना दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 अन्‍वये मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिख धर्मीय मतदारांची मतदार नोंदणी कार्यक्रम दिनांक 20 जुलै 2018 ते दिनांक 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म-1 (FORM-I) नुसार तयार केलेली
ही प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नायब तहसिलदार डी. एन. पोटे, नायब तहसिलदार श्रीमती संजीवनी मुपडे यांनी ही मतदार यादी वेळेत प्रसिध्‍द करण्‍यासाठी परिश्रम घेतले.
00000


ऑटोरिक्षा नोंदणीनंतर
परवाना प्राप्त करुन घ्यावा
नांदेड दि. 28 :- जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षा नोंदणी केल्यानंतर ऑटोरिक्षा परवाना घेतला नसल्यामुळे वायुवेग पथकाद्वारे वाहन जप्त करणे सुरु आहे. ऑटोरिक्षा नोंदणी नंतर परवाना प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा जप्त करुन वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000


दहावी, बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीस मुदतवाढ
नांदेड दि. 28 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा- फेब्रुवारी / मार्च 2019 साठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यास सोमवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे विहित शुल्क, मूळ कागदपत्रे, संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज 11 सप्टेंबर पर्यंत जमा करावे. कनिष्ठ महाविद्यालयाने सर्व कादगपत्रासहीत यादी विभागीय मंडळाकडे 15 सप्टेंबर 2018 रोजी जमा करावी. ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in इयत्ता 12 वी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाही, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.
00000


पत्रकार परिषद निमंत्रण                                                     
दि. 28 ऑगस्ट 2018

प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्‍ही.
नांदेड जिल्‍हा

          विषय - पत्रकार परिषदेचे निमंत्रण...
संदर्भ - जिल्हाधिकारी तथा जिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांचे पत्र क्र.
   2018/साशा-3/निवडणूक/मयापु/ CR-23 दि. 28.8.2018
 महोदय ,
            उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मतदार यादीबाबत दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीतजास्त मतदारांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मा. श्री. अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी नांदेड हे शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात सायं. 4.30 वा. पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.    
            कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी वार्तांकनासाठी  उपस्थित रहावे, ही विनंती.  
वार व दिनांक     -  शनिवार, दि. 1 सप्टेंबर, 2018    
स्थळ                 -  जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्ष  
वेळ                  -  सायं. 4.30 वा.      

                                                                                                                    आपला विश्वासू
                  स्वा /-
      जिल्‍हा माहिती अधिकारी,
                नांदेड


कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  

नांदेड दि. 28 :- कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी  कृषि विभागामार्फत राबविण्यात आलेली मोहिम अशीच पुढे सुरु ठेवून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे, कृषि विकास अधिकारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र येथील शास्त्रज्ञ, जिल्हा समन्वयक क्रॉपसॅप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एमएआयडीसी प्रतिनिधी, जिनिंगमिल्सचे प्रमुख, बियाणे व किटक नाशके उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, कापुस उत्पादक प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
बैठकी ध्याच्या पिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लवकर लागवड केलेल्या कापुस क्षेत्रावर जुलै 2018 मध्ये जास्त प्रमाणात दिसुन आलेला प्रादुर्भाव कृषि विभाग, कृषि विद्यापीठ कृषि विज्ञानकेंद्र यांचे मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना मार्गदर्शनामुळे सद्यस्थितीत कमी झालेला असुन सदरील प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी Mass Trapping एकात्मिक किड व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते नमुद करण्यात आले.
सोयाबीन मुग पिकावर सद्या किडींचा प्रादुर्भाव आढळुन येत असुन कृषि विद्यापी कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी सोयाबीन वरील खोड माशीसाठी ट्रायझोफॉस डायक्लोरोव्हासची करपारोगासाठी कार्बेन्डाझाईम + मंकॉझेब किंवा टेबेकॉनझोले + सल्फर ची  फवारणी करणे तसेच मुगावरील भुरी रोगासाठी गंधकाचा वापर करण्याच्या शिफारशी सांगितल्या.  
000000


शेडनेट हरीतगृह उभारणी सेवा पुरवठादारांनी नोंदणी करावी
नांदेड दि. 28 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्ह्यात हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे नोंदणी करावी.
प्रस्ताव सेवा पुरवठादार नोंदणीसाठी पुढील प्रमाणे अटी शर्ती राहतील. हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण, दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी सेवा पुरवठादार हा एसटी नोंदणीकृत असावा. शॉपक्ट प्रमाणपत्रधारक असणे बंधनकारक आहे. सेवा पुरवठादारास हरितगृह / शेडनेट हाऊस उभारणीचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. तसेच मागील 3 वर्षाची उलाढाल प्रतिवर्षी कमीतकमी  एक कोटी रुपये असावी. त्या पुष्टयर्थ सेवा पुरवठादारास मागील लगत तीन वर्षाचा सनदी लेखापालाने प्रमाणित केलेला आर्थिक ताळेबंद सादर करावा लागेल वर्षवार यापूर्वी उभारणी केलेल्या हरितगृह / शेडनेट हाऊस लाभार्थ्यांच्या याद्या सादर करणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सुचनेत नमुद असलेल्या मॉडेलनिहाय डिझाईनप्रमाणे तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरुन हरितगृह / शेडनेटगृह उभारणी करण्याबाबतचे विहीत नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-13) सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. तसेच हरितगृह / शेडनेट हाऊसच्या सांगाड्याची पाच वर्षाची वॉरन्टी द्यावी लागेल (सेवा पुरवठादाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). जी आय पाईपच्याबाबत IS 1161:2014 या मानांकनाच्या जी आय पाईपचे अधिकृत वितरक किंवा अधिकृत विक्रेता असल्याबाबतचे पुरावा प्रमाणपत्र सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. शेडनेट (टेपनेट / मोनोनेट), इन्सेक्ट नेट, पॉली फिल्म इत्यादी साहित्य बिआयएस मानांकाप्रमाणे पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र (प्रपत्र - 13) द्यावे लागेल. त्यासाठी उत्पादकाचे अधिकृत वितरक / विक्रेता असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नेट/फिल्म याबाबत 1 वर्षाची गॅरंटी (बदलून देणे) 2 वर्षाची वॉरंटी द्यावी लागेल. (सेवा पुरवठाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). 7) पॉली फिल्मच्याबाबत आयातीत पॉली फिल्म वापरणार असल्यास अधिकृत आयातदार किंवा अधिकृत आयातदाराचे वितरक किंवा विक्रेता असल्याबाबत संबंधीत आयातदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पॉली फिल्मच्याबाबत उत्पादकाने प्रमाणित केलेले तांत्रिक माहितीचे विविरण पत्र (Technical data sheet), पॉली फिल्मचा दर्जा गुणधर्माबाबतचे प्रमाणपत्र तसेच सिपेट या संस्थेचा 6 महिन्यांपेक्षा जुना नसलेला तांत्रिक तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक राहील. सेवा पुरवठादाराची नोंदणी ही साहित्य पुरवठ्यासह संपूर्ण हरीतगृह/शेडनेटगृह उभारण्यासाठी करावयाची असून केवळ साहित्य पुरवठ्यासाठी नाही.
आदी अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...