Saturday, October 31, 2020

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात  

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढ 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी सोमवार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 1 व 14 ऑक्टोंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सोमवार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 ऑक्टोंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

0000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...