Sunday, August 2, 2020

सुधारित वृत्त क्र. 719


कोरोनातून आज 19 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 170 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  जिल्ह्यात आज 2 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 19 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 170 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 576 अहवालापैकी 407 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 156 एवढी झाली असून यातील 954 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 101 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवार 31 जुलै रोजी नांदेड गोकुळनगर येथील 59 वर्षाचा एक पुरुषाचा तर शनिवार 1 ऑगस्ट रोजी वजिराबाद नांदेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा नांदेड येथील खाजगी रुग्णालयात तर लोहा तालुक्यातील जानापूरी येथील 65 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावला. रविवार 2 ऑगस्ट रोजी तळ्याची वाडी कंधार येथील 67 वर्षाची एक महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, नारायणनगर नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुषाचा व महालिंगी कंधार येथील 51 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर वसंतनगर नांदेड येथील 72 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले.आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 90 एवढी झाली आहे.  

आज बरे झालेल्या 19 कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 7, भोकर कोविड केअर सेंटर येथील 1, लोहा कोविड केअर सेंटर येथील 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 3, खाजगी रुग्णालय नांदेड येथील 1 अशा 19  कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड महानगरपालिका क्षेत्रात 45, हदगाव तालुक्यात 1, हिमायतनगर 3, धर्माबाद 3, देगलूर 9, लोहा 7, किनवट 4, कंधार 2, मुखेड 35, नायगाव 33, बिलोली 1, लातूर जिल्ह्यातील देवणी 1, हिंगोली जिल्ह्यातील वसमत 2, परभणी येथील 1 याप्रमाणे 147 आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  अर्धापूर 2, बिलोली 9, हिमायतनगर 4, नायगाव 6, मुदखेड 1, किनवट 1 याप्रमाणे 23 अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 101 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 149, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 381, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 36, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 65, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 37, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 105, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 7, हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर येथे 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 33, किनवट कोविड केअर सेंटर येथे 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 127 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 430,
घेतलेले स्वॅब- 16 हजार 206,
निगेटिव्ह स्वॅब- 12 हजार 711,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 170,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 156,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 03,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 80,
मृत्यू संख्या- 90,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 954,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 101,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 032. 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


रुग्णांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक भाव अधिक महत्वाचा
-         अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख
डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय रुग्णालयातून
गंभीर आजारी असलेल्या 14 कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी औषधोपचार

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक निवासी डॉक्टर्स व वैद्यकिय शिक्षक, नर्सेस-इतर कर्मचारी येणारी आव्हाने स्विकारण्यासाठी तत्पर असून उपचारासाठी येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांसाठी आम्ही सिद्ध असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी सांगितले. आज इतर आजारांसह कोरोनामुळे अतिगंभीर आजारी असलेल्या 14 रुग्णांवर यशस्वी औषधोपचार करुन त्यांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यात 60 वर्षापेक्षा अधिक अशा रुग्णांचा समावेश आहे. यातील एक 72 वर्षीय वयोवृद्ध 12 दिवस व्हेंटिलेटरवर राहून 33 दिवसानंतर मृत्यूशी जिंकून आता बरे होऊन घरी जात असल्याचे आम्हा सर्व टिमला आनंद असल्याचे ते म्हणाले. आम्ही येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक कोविड रुग्णांकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले असून याचबरोबर कोविड व्यतीरिक्त जे काही आजार आहेत त्यासंदर्भात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांकडे तेवढीच दक्षता घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 4 डॉक्टर्स होते त्यांनी न्युमोनियावर मात केली आहे. महाविद्यालयाचे औषोध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. भुरके, डॉ. शितल राठोड व डॉ. अंजली देशमुख यांच्या पथकातील सर्व सदस्यांनी पूर्ण समर्पणभावाने ही जबाबदारी स्विकारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

मागील आठवड्यापासून कोविड केअर सेंटरमधून रुग्णांचे बरे होऊन डिस्चार्जचे प्रमाणही सुधारले असून रुग्णांमध्ये अधिक सकारात्मक मानसिकता निर्माण यावरही आम्ही भर दिल्याचे ते म्हणाले. सद्यस्थितीत कोविडची 250 व इतर आजारांसाठी 400 बेडस् असे एकुण 650 पेक्षा अधिक बेडस् वैद्यकिय सुविधांसह आम्ही तत्पर ठेवण्यावर भर दिला आहे. रुग्णांनी आत्मविश्वासपूर्वक स्वत:ची सकारात्मक मानसिकता ठेवून आपल्या आजाराकडे पाहिल्यास आजारावर आपल्याला लवकर मात करता येते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...