Friday, October 5, 2018


नांदेड-जम्मू तवी-नांदेड साप्ताहिक हमसफर एक्सप्रेसला
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दाखविली हिरवी झेंडी
नांदेड, दि. 5 :- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी आज गाडी संख्या 02751 या हमसफर विशेष गाडीला हु.सा.नांदेड रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार डी. पी. सावंत, महापौर श्रीमती शीला किशोर भवरे, आमदार मनजिंदरसिंघजी सिरसा, शिरोमणी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष जी. एस. लोंगोवाल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ ईर्या, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्रीमती नेहा रत्नाकर, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ, क्षेत्रीय विभागीय सल्लागार समिती सदस्य, विभागीय सल्लागार समिती सदस्य  व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, ही रेल्वे सुप्रसिध्द श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा आणि जम्मू तवी वैष्णदेवी या दोन प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणारी आहे. या रेल्वेमुळे वैष्णदेवी आणि गुरुगोविंदसिंघजींच्या भक्तांना सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्लीकडे जाण्यासाठी ही रेल्वे सोईची आहे. या रेल्वेमुळे नांदेड येथील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.  
हमसफर रेल्वेची वैशिष्ट्ये या रेल्वे गाडीला सर्व डब्बे तृतीय वातानुकुलीत आहेत. ही रेल्वे एलएचबी कोचेस युक्त आहे.  या गाडीत अत्याधुनिक प्रसाधन व्यवस्था आहे, ज्यात सेन्सर युक्त. गाडीतील पडदे आग प्रतिरोधक आहेत. मोबाईलसाठी युएसबी चार्जिंग पॉईंट. प्रसाधन गृहात बेबी सीट्स आहेत. थ्री डी बोर्ड असल्यामुळे रात्री येणारे स्टेशन नाव डब्यामध्ये लगेच दिसते.
शुक्रवार 12 ऑक्टोबर 2018 पासून गाडी संख्या 12751 नियमितपणे दर शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हु.सा. नांदेड या स्थानकावरुन निघेल आणि अकोला, दिल्ली , जालंधर मार्गे जम्मू तवी येथे शनिवारी रात्री 11.30 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात रविवार 14 ऑक्टोबर गाडी संख्या 12752 नियमितपणे  दर रविवारी सकाळी 7.25 वाजता जुम्मू तवी येथून दिल्ली, अकोलामार्गे नांदेड येथे सोमवारी रात्री 10.45 वाजता पोहोचेल.या गाडीस 18 डब्बे असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000000


हिमायतनगर येथे 16 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड दि. 5:- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने हिमायतनगर येथे 4 ऑक्टोबर रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 16 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 14 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, ग्रामीण रुग्णालय,  हिमायतनगर  येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक दीपक इंगोले, चित्रकला गायकवाड व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षटवार तथा शेख जावेद आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.
00000


हरवलेल्या इसमाची माहिती देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 :- लोकमान्यनगर धनेगाव नांदेड येथील गजानन गंगाराम टापरे (वय 35) हा कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग-गोरा, बांधा-सडपातळ, चेहरा-गोल, पोशाख- पिवळा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट, पायात स्लीपर चप्पल असून भाषा मराठी व हिंदी येते. या इसमाची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन ग्रामीण नांदेड येथे (02462-226373) संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पो. स्टे. नांदेड यांनी केले आहे.
0000000


रस्त्यावरील खड्डयांच्या
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
नांदेड, दि. 5 :- सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 1383  सुरु करण्यात आला आहे.
मा. उच्च न्यायालयाचा आदेश व शासनाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरु केला आहे. निर्देशान्वये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद या कार्यालयात तक्रारींची दखल घेण्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेस यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
भोकर विभागातील रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी मुख्य अभियंता कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. तसेच www.mahapwd.com या वेबसाईटवर Citizen मेनुमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
प्राप्त होणाऱ्या तक्रारी कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहेत. या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 5 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे ऑक्टोंबर 2018 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 24 व 25 ऑक्टोंबर 2018 रोजी कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


20 ऑक्टोंबर रोजी "विश्वस्त दिवस"
नांदेड, दि. 5 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड येथे 20 ऑक्टोंबर रोजी व यापुढे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत "विश्वस्त दिवस" साजरा करण्यात येणार आहे. संस्थेच्या विश्वस्तांनी उपस्थित राहून महाराष्ट्र विश्वस्तव्यवस्था कायद्यातील तरतुदीची माहिती घेवून "विश्वस्त दिवस" साजरा करावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.  
या दिवशी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था कायद्यातील तरतुदीची माहिती देण्यात येणार आहे. धर्मादाय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणाविषयी सल्ला दिला जाणार नाही. विश्वस्तांच्या इतर अडीअडचणी जाणून त्याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी घेतले दर्शन
नांदेड, दि. 5 :- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिध्द श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराच्या पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्रीमती कौर यांनी संत बाबा कुलवंतसिंघजी यांची भेट घेतली.  
यावेळी आमदार मनजिंदरसिंघजी सिरसा, शिरोमणी गुरुद्वारा कमिटीचे  अध्यक्ष गोबिदसिंघ लोंगोवाल, दिल्ली गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष मनजितसिंघ जीके तसेच आदिंची यावेळी उपस्थिती होती.

00000


हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूकीच्‍या
अनुषंगाने प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
आक्षेप 15 ऑक्टोंबर पर्यंत स्विकारले जाणार   
            नांदेड दि. 4 :- हदगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी 5 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास 15 ऑक्टोंबर पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य यांचे आदेशान्‍वये दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने 8 ऑगस्ट 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन नांदेड येथे जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली व संबंधीत कृउबासमितीच्‍या बाजार क्षेत्रातील विविध राजकीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्‍यानुषंगाने हदगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
            या प्रारुप शेतकरी, व्‍यापारी व हमाल / मापाडी मतदारसंघाची यादी 5 ऑक्टोंबर 2018 रोजी यादी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व संबंधीत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नोटीस बोर्डावर गणनिहाय प्रसिध्‍द करण्‍यात येत असून त्‍याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
तपशील
दिनांक
वेळ
स्‍थळ
प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
5 ऑक्टोंबर 2018
सकाळी 11.00 वाजता  
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती हदगाव यांचे सुचना फलकावर. 
प्रारुप मतदार यादीवर हरकती स्विकारणे            (पुराव्‍यासह)
5 ऑक्टोंबर 2018 ते 15 ऑक्टोंबर 2018
कार्यालयीन वेळेमध्‍ये
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय,  सामान्‍य शाखा - 1
प्राप्‍त हरकतीवर सुनावणी
19 ऑक्टोंबर 2018 ते 20 ऑक्टोंबर 2018
स.11.00           
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
आलेल्‍या हरकतीवर निर्णय देणे
25 ऑक्टोंबर 2018
दु. 4.00            
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणे
30 ऑक्टोंबर 2018
स. 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती हदगाव यांचे सुचना फलकावर. 

            या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास मतदार यादी प्रसिध्‍दी कार्यक्रमात नमुद दिनांकानुसार जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी (कृउबास) यांचे कार्यालय सामान्‍य शाखा- 1 येथे लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) नोंदविता येतील. तसेच प्रसिध्‍दी कार्यक्रमातील आक्षेप कालावधी संपल्‍यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घेण्‍यात यावी. आक्षेप विहित कालावधीमध्‍ये देण्‍याचे असे आवाहन जिल्‍हा  निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000    

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...