Friday, October 5, 2018


नांदेड-जम्मू तवी-नांदेड साप्ताहिक हमसफर एक्सप्रेसला
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दाखविली हिरवी झेंडी
नांदेड, दि. 5 :- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी आज गाडी संख्या 02751 या हमसफर विशेष गाडीला हु.सा.नांदेड रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार डी. पी. सावंत, महापौर श्रीमती शीला किशोर भवरे, आमदार मनजिंदरसिंघजी सिरसा, शिरोमणी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष जी. एस. लोंगोवाल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ ईर्या, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्रीमती नेहा रत्नाकर, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ, क्षेत्रीय विभागीय सल्लागार समिती सदस्य, विभागीय सल्लागार समिती सदस्य  व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, ही रेल्वे सुप्रसिध्द श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा आणि जम्मू तवी वैष्णदेवी या दोन प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणारी आहे. या रेल्वेमुळे वैष्णदेवी आणि गुरुगोविंदसिंघजींच्या भक्तांना सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्लीकडे जाण्यासाठी ही रेल्वे सोईची आहे. या रेल्वेमुळे नांदेड येथील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.  
हमसफर रेल्वेची वैशिष्ट्ये या रेल्वे गाडीला सर्व डब्बे तृतीय वातानुकुलीत आहेत. ही रेल्वे एलएचबी कोचेस युक्त आहे.  या गाडीत अत्याधुनिक प्रसाधन व्यवस्था आहे, ज्यात सेन्सर युक्त. गाडीतील पडदे आग प्रतिरोधक आहेत. मोबाईलसाठी युएसबी चार्जिंग पॉईंट. प्रसाधन गृहात बेबी सीट्स आहेत. थ्री डी बोर्ड असल्यामुळे रात्री येणारे स्टेशन नाव डब्यामध्ये लगेच दिसते.
शुक्रवार 12 ऑक्टोबर 2018 पासून गाडी संख्या 12751 नियमितपणे दर शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हु.सा. नांदेड या स्थानकावरुन निघेल आणि अकोला, दिल्ली , जालंधर मार्गे जम्मू तवी येथे शनिवारी रात्री 11.30 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात रविवार 14 ऑक्टोबर गाडी संख्या 12752 नियमितपणे  दर रविवारी सकाळी 7.25 वाजता जुम्मू तवी येथून दिल्ली, अकोलामार्गे नांदेड येथे सोमवारी रात्री 10.45 वाजता पोहोचेल.या गाडीस 18 डब्बे असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...