Friday, October 5, 2018


रस्त्यावरील खड्डयांच्या
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
नांदेड, दि. 5 :- सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 1383  सुरु करण्यात आला आहे.
मा. उच्च न्यायालयाचा आदेश व शासनाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरु केला आहे. निर्देशान्वये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद या कार्यालयात तक्रारींची दखल घेण्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेस यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
भोकर विभागातील रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी मुख्य अभियंता कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. तसेच www.mahapwd.com या वेबसाईटवर Citizen मेनुमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
प्राप्त होणाऱ्या तक्रारी कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहेत. या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...