Friday, October 5, 2018


हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूकीच्‍या
अनुषंगाने प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
आक्षेप 15 ऑक्टोंबर पर्यंत स्विकारले जाणार   
            नांदेड दि. 4 :- हदगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी 5 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास 15 ऑक्टोंबर पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य यांचे आदेशान्‍वये दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यानुषंगाने 8 ऑगस्ट 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन नांदेड येथे जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली व संबंधीत कृउबासमितीच्‍या बाजार क्षेत्रातील विविध राजकीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्‍यानुषंगाने हदगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
            या प्रारुप शेतकरी, व्‍यापारी व हमाल / मापाडी मतदारसंघाची यादी 5 ऑक्टोंबर 2018 रोजी यादी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व संबंधीत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नोटीस बोर्डावर गणनिहाय प्रसिध्‍द करण्‍यात येत असून त्‍याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
तपशील
दिनांक
वेळ
स्‍थळ
प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
5 ऑक्टोंबर 2018
सकाळी 11.00 वाजता  
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती हदगाव यांचे सुचना फलकावर. 
प्रारुप मतदार यादीवर हरकती स्विकारणे            (पुराव्‍यासह)
5 ऑक्टोंबर 2018 ते 15 ऑक्टोंबर 2018
कार्यालयीन वेळेमध्‍ये
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय,  सामान्‍य शाखा - 1
प्राप्‍त हरकतीवर सुनावणी
19 ऑक्टोंबर 2018 ते 20 ऑक्टोंबर 2018
स.11.00           
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
आलेल्‍या हरकतीवर निर्णय देणे
25 ऑक्टोंबर 2018
दु. 4.00            
जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात.
अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणे
30 ऑक्टोंबर 2018
स. 11.00 वा.
जिल्‍हाधिकारी नांदेड, जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था नांदेड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती हदगाव यांचे सुचना फलकावर. 

            या मतदार यादीवर आक्षेप असल्‍यास मतदार यादी प्रसिध्‍दी कार्यक्रमात नमुद दिनांकानुसार जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी (कृउबास) यांचे कार्यालय सामान्‍य शाखा- 1 येथे लेखी स्‍वरूपात पुराव्‍यासह कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) नोंदविता येतील. तसेच प्रसिध्‍दी कार्यक्रमातील आक्षेप कालावधी संपल्‍यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घेण्‍यात यावी. आक्षेप विहित कालावधीमध्‍ये देण्‍याचे असे आवाहन जिल्‍हा  निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000    

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...