Thursday, June 17, 2021

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दुर व्हावा. यासाठी जिल्ह्यात सन 2021 साठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील जास्तीतजास्त युवक-युवतींनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा. आधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 वर संपर्क साधवा. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://forms.gle/ubnTcxhi43Ee4PLC6 लिंक वर जाऊन आपली माहिती भरुन नाव नोंदणी करता येणार आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच वीस पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सुचिबध्द होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत. हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवारांना, लाभार्थ्यांना पुर्णपणे नि:शुल्क असुन सुचिबध्द प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी स्पष्ट केले आहे.

0000


 

नांदेड जिल्ह्यात 38 व्यक्ती कोरोना बाधित,

तर 54 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 815 अहवालापैकी  38 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 31 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 31  एवढी झाली असून यातील 88 हजार 227 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 342 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुखेड तालुक्यांतर्गत 1, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1, हदगाव 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, लोहा 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 1, कंधार 13, परभणी 1, किनवट 2, यवतमाळ 1 असे एकूण 38 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 54 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3,  मुखेड कोविड रुग्णालय 2,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 37, हदगाव कोविड रुग्णालय 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 342 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 241, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 10  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 130 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 84 हजार 695

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 82 हजार 179

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 31

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 227

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 900

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-160

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 342

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

नांदेड (जिमाका) दि. 17 :-मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जून 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जून 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जुलै 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस ; जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 18 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 16 जून पर्यंत एकुण 4 लाख 71 हजार 889 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 17 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

ऑटोरिक्षा परवानाधारकांना पोस्टात खाते काढण्याची सुविधा

सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य शासनाच्यावतीने ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपयाचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असून हे अनुदान ऑटोरिक्षा परवानाधारकांच्या बॅंक खात्यात ऑनलाईन जमा केले जाणार आहे. ज्या परवानाधारकांनी बॅंकखाते आधारशी जोडले नाही किंवा आधारमधील काही दुरुस्ती असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील आधार केंद्रात जाऊन आधारमधील दुरुस्ती करुन घ्यावी. आधार दुरुस्तीसाठी गजानन मोरे यांचा संपर्क क्र. 8208224554 व निलकंठ कोकाटे संपर्क क्र. 9420846833 यांच्याशी संपर्क साधून पोष्टात खाते उघडावे. ऑटोरिक्षा परवाना धारकांनी सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

भारतीय टपाल विभागाकडून इंडीया पोस्ट पेंमेट बॅकेच्या माध्यमातून पोष्टात झीरो बॅलन्स (शुन्य रक्कमेचे) खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी संबंधिताचे आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रत्यक्ष व्यक्ती पोष्टात गेल्यानंतर हे खाते उघडण्याचे शुल्क 100 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येणार आहे. सदर शंरभर रुपये हे अनुदान जमा झाल्यानंतर काढता येतील.

 

सामुग्रह अनुदानासाठी 7 हजार 56 परवानाधारकांपैकी 4 हजार 979 ऑटोरिक्षा परवाना धारकांनी अर्ज केले आहेत. यापैकी 3 हजार 361 अर्जाला मान्यता देण्यात आली आहे तर 1 हजार 618 परवानाधारकांचे अर्ज पुर्ननोंदणीसाठी पाठविण्यात आली आहेत. या योजनेच्या लाभासाठी सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी आपल्या नजीकच्या पोष्ट कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन खाते उघडावे असे आवाहन टपाल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने केले आहे.   

0000

जिल्ह्यात गत 24 तासात

सरासरी 7.2 मि. मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात गुरुवार 17 जुन 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 152.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात गुरुवार 17 जून रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 8.20 (100.50), बिलोली- 6 (167.70), मुखेड- 6.20 (176.70), कंधार- 2.50 (167.70), लोहा- 2.30 (132.10), हदगाव-3.30 (136.40), भोकर- 8.90 (121.40), देगलूर- 1.80 (185.60), किनवट- 1.30 (175.80), मुदखेड- 30.30 (128), हिमायतनगर-2.30 (147.60), माहूर- निरंक (189.40), धर्माबाद- 12 (208.40), उमरी- 12.60 (142.50), अर्धापूर- 8.50 (106.60), नायगाव- 26.10 (155.50) मिलीमीटर आहे.

0000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...