Friday, June 14, 2024

 वृत्त क्र. 487 

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं. 18 आणि 20 नांदेड,  आयन डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 रोजी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 486 

बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात

30 जून पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 14 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीने तयार केलेला मूळ मसुदा इंग्रजी भाषेत असून, मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे. मसुदा शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.inhttps://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांकडून मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना 30 जून 2024 रोजी सायंकाळी 6.15 वा. पर्यंत मागविण्यात आल्या असल्याची माहिती, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.


नागरिकांनी हरकती व सूचना महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे- 1 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात. प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 मूळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आला असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे.

००० 

 वृत्त क्र. 485 

कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ,

मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 14 : कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया पिकातील मूल्यसाखळी चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत .

 

नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीननॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस साठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 30 जून पर्यंत असेल तर  मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 23 जून 2024  पर्यंत असेल. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने  करण्यात येणार आहे.

 

त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 12 जून 2024 पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000 

 वृत्त क्र. 484 

जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांनी

सेतू केंद्रात अर्ज करून मिळवावी विनामूल्य रेती

 

प्रशासनाकडून वाळू डेपोवर रेतीसाठा आरक्षित

 

नांदेड दि. 14 : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ज्यांना घरकुल मिळाले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने मोफत रेतीसाठा उपलब्ध केला आहे. शासन निर्णयानुसार सेतू केंद्रात अर्ज करून घरकुल लाभार्थी मोफत रेतीसाठा घरासाठी मिळवू शकणार आहे.

 

 शासन निर्णयानुसार जिल्ह्यात घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात  3 हजार ६६२ लाभार्थ्यांसाठी एकूण १७ हजार ३७२ ब्रास रेतीसाठा वितरित करण्यात आला आहे. अशा विनामुल्य् वाळु उपलब्धथ करुन दिलेल्याय घरकुलाच्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने www.nanded.nic.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट नांदेड डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाईटवर जाहीर केली आहे.

 

घरकुलाच्या विविध योजनातून ज्यांना शासकीय घर मंजूर करण्यात आले आहे. अशा मंजुर घरकुल लाभार्थीची  माहिती महाखनिज प्रणाली या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे. या यादीमध्ये नोंद असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या 19 एप्रिल 2023 व 16 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये बांधकाम करण्यास मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

तसेच जिल्हा प्रशासनाने वाळु डेपोमध्ये वाळू डेपोनिहाय रेतीसाठा आरक्षित केला आहे याची माहिती सुध्दा www.nanded.nic.in  या वेबसाईटवर जाहीर केली आहे. जिल्ह्यामध्ये आता घरकुल लाभार्थ्यांसाठी एकूण 18,633 ब्रास रेती आरक्षित करण्यात आली आहे. यामध्ये  देगलूर उपविभागात देगलूर तालुक्यात शेवाळा येथे ४४४,तमलूर येथे ३३० तर शेखापूर येथे ३९३ ब्रास रेसीसाठा उपलब्ध आहे. बिलोली उपविभागात येसगी १९९९, नागणी ४८९, सगरोळी - १ येथे १८३९,सगरोळी -२ येथे ४८९१ तर हुनगुंदा १२६०, गंजगाव ६३०, बोळेगाव २४ ब्रास साठा राखीव आहे. उपविभाग हदगाव बेलमंडल या डेपोमध्ये ४९२, उपविभाग किनवट माहूर तालुक्यामध्ये केरोळी ८३९, कोळी बे. ६४५ तर धर्माबाद उपविभागात बळेगाव ६९३ रेतीसाठा उपलब्ध आहे.कंधार उपविभागात येळी १२६, बेटसावंगी १२९२ साठा उपलब्ध आहे. नांदेड उपविभागात खुपसरवाडी १४८२, भायेगाव १७२, वाघी ५८५ ब्रास रेतीसाठा आरक्षित आहे.

 

अत्यंत सोप्या पद्धतीने ही रेती लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी फक्त वाळूची आवश्यकता असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन संपर्क करावा. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून विनामूल्य वाळू उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...