Friday, June 14, 2024

 वृत्त क्र. 485 

कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ,

मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 14 : कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया पिकातील मूल्यसाखळी चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत .

 

नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीननॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस साठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 30 जून पर्यंत असेल तर  मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 23 जून 2024  पर्यंत असेल. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने  करण्यात येणार आहे.

 

त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 12 जून 2024 पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...