Monday, December 23, 2019



वृत्तपत्रे ही समाजाचा आरसा  
--- पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर

नांदेड दि. 23 :- वृत्तपत्रे ही सामाजाचा आरसा आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी प्रतिपादन केले. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी महिला सुरक्षा आणि वार्तांकन या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गायकवाड, प्रा. डॉ. पुरणशेट्टीवार, तसेच पोलीस उपनिरीक्षक संगीता खर्जुले, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे प्रमुख राजेश आलीवार आदि जिल्ह्यातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनीची यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वृत्तपत्रातील बातम्यांचे स्वरुप, तपास, शिक्षेचे प्रमाण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. कायदे, पास्को कायदा तसेच अन्य कायद्यांच्या अंमलबजावणी करणेही सुरु आहेत. तसेच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, याच दृष्टीने पोलीस विभाग कार्य करित असतो.
कौटूबिंक हिंसाचार, आत्महत्या, समाज माध्यमातील गुन्हे, सायबर गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची आणखीण आवश्यकता आहे. तसेच समाजासमोर कोणत्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. पत्रकारितेतील सकारात्मकता वाढवावी.
महिला अत्याचारासंदर्भात पुढे बोलतांना श्री. मगर म्हणाले की, जनजागृती, कायद्याचे ज्ञान, अपराध कमी करण्यासाठी व अपराध थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक असतात.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी महिला सुरक्षा आणि वृत्तांकन करतांना पत्रकारांनी घ्यावयाची काळजी आणि भुमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना  म्हणाले की, वृत्तपत्रांनी चुकीचे वृत्त प्रसिध्द करु नयेत. वृत्तपत्रांनी सामाजिक बांधिलकी समजून वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करावे. माध्यम म्हणजेच समाजाचं प्रतिबिंब असल्याने ते जपायला हवं. पत्रकारिता ही सत्यावर आधारित असावी. खोटी नसावी, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा व आपले उत्तरदायित्व लक्षात घेवून कार्य करावे. तसेच सोशल मिडियामध्ये प्रथम मी या स्पर्धेत बातम्या घाईत देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वृत्तपत्रात बातमी देण्याअगोदर त्याचा उद्देश विसरुन जात आहोत का ? आपण कांहीतरी समाजाचं देणं लागतो यादृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि इतर मान्यवरांनी दिली. तसेच या कार्यशाळेत श्रीमती सुप्रिया गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी केले. तर आभार प्र. जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास यांनी मानले.

00000 

    नांदेड जिल्‍ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक
               दिनांक 06 जानेवारी, 2020  रोजी दू..02.00 वाजता

ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील दि.10 डिसेंबर, 2019 तसेच सन 2019 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्रं.22 दिनांक 23 ऑगस्‍ट, 2019 अन्‍वये जिल्‍हा परिषद, नांदेड अंतर्गत सभापती व उपसभापती पंचायत समिती पदाची मुदत, दिनांक 20 डिसेंबर, 2019 रोजी संपत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे  कलम 67 व 68 खाली पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवडणुक दिनांक 20 डिसेंबर, 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेणे आहे.

त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी नांदेड जिल्‍ह्यातील सर्व पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाच्‍या निवडणूका दिनांक 06 जानेवारी, 2020  रोजी दू..02.00 वाजता त्‍या त्‍या पंचायत समितीच्‍या सभागृहात उक्‍त बैठक बोलावून, त्‍या दिनांकास अधिसूचने प्रमाणे सभापती पदाच्‍या आरक्षणाप्रमाणे पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवडणुक घेणेसाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी अध्‍यासी अधिकारी म्‍हणुन नियुक्‍ती केली आहे.



                                              जिल्‍हाधिकारी, नांदेड करीता




माळेगाव यात्रेच्या अनुषंगाने
अवजड वाहनाच्या वाहतूक मार्गात बदल
नांदेड दि. 23 :- लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबाराया यात्रा कालावधी भाविकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने अवजड वाहनाच्या वाहतूक मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसुचना जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रसिद्धी केली आहे.   
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33 नुसार जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी यात्रा कालावधीत 23 ते 31 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्री पर्यंत अस्तीत्वात असलेला मार्ग नांदेडकडून लातूरकडे येणारी अवजड वाहनाची वाहतूक लोहा-पालम-गंगाखेड-राणीसावरगाव-सांगवी तर लातूरकडून नांदेडकडे येणाऱ्या अवजड वाहनास सांगणी-राणीसावरगाव-गंगाखेड-पालम-लोहा या आवश्यक असलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे अधिसुचनेत नमूद केले आहे.  
0000


अभियांत्रिकी शाखेच्या
अध्यापकांसाठी प्रशिक्षण संपन्न
नांदेड दि. 23 :- शासकीय तंत्रनिकेत नांदेड या संस्थेत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या अध्यापकांसाठी 16 ते 20 डिसेंबर 2019 दरम्या एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सॉलिड मॉडेलिंग व ॲडीटीव्ह मॅन्युफॅक्टचरिंग या विषयावर आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी दिली आहे.
0000


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 23 :- मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा. मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक 3 डिसेंबर 2019 मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश संबंधीत विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000


सुशासन दिन 25 डिसेंबरला
नांदेड दि. 23 :- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...