Tuesday, October 27, 2020

 

108 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

  66 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 27 :- मंगळवार 27 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 108 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 66 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 52 बाधित आले. 

आजच्या एकुण 647 अहवालापैकी  546  अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 862 एवढी झाली असून यातील  17  हजार 498बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 731 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 37 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवार 27 ऑक्टोंबर रोजी नांदेड तालुक्यातील मरळक येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा तर नायगाव तालुक्यातील सुजालेगाव येथील 47 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 7, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 2, मुखेड कोविड केंअर सेंटर 3, उमरी कोविड केंअर सेंटर 4, खाजगी रुग्णालय 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, भोकर कोविड केंअर सेंटर 1, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 60, किनवट कोविड केंअर सेंटर 5, माहूर कोविड केंअर सेंटर 1, नायगाव कोविड केंअर सेंटर 1, लातूर येथे संदर्भी 1 असे  108 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.98 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 13, बिलोली 1  असे एकुण 14 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 14, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर 1, हदगाव 1, मुखेड 9, धर्माबाद 1, मुदखेड 1, नांदेड ग्रामीण 9, बिलोली 1, हिमायतनगर 2, देगलूर 3, कंधार 7, किनवट 2 असे एकूण 52 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 731 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 154, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 223, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 52, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 27, हदगाव कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 21,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड केअर सेंटर येथे 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 8, भोकर कोविड केअर सेंटर 7,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात दाखल 125, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

मंगळवार 27 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 75, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 8 हजार 368

निगेटिव्ह स्वॅब- 86 हजार 214

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 832

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 498

एकूण मृत्यू संख्या- 504

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 359 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 731

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 37. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका). प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक). माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक). विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्तीगट, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) यांनी नवोपक्रम अहवाल 10 नोव्हेंबर 2020 पर्यत innovation.scertmaha.ac.in  या लिंकवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी केले आहे. 

गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी सन 2020-21 वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समग्र शिक्षानुसार एससीआरटीच्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी अधिव्याख्याता श्रीमती धुतमल जे. एस. डायट नांदेड मो. क्र. 7720076358 यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी केले आहे.

0000

 

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी संकेतस्थळात बदल

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सन 2020-21 मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठीच्या संकेतस्थळामध्ये बदल झाला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in कार्यान्वित झाल्यावर या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.                       

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतर्ग लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईनचे www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. कृषि विभागाच्या विविध योजनेसाठी महाडीबीटीचे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in या शासनाचे संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या योजनांचाही समावेश असून अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in कार्यान्वित झाल्यावर या संकेतस्थळावर शेतकऱ्याने अर्ज दाखल करावेतसंकेतस्थळ बदलाबाबत नोंद घ्यावी असेही आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

मोटार वाहन सुधारणा अधिनियम 2019 च्या

कलमांची अंमलबजावणी 1 ऑक्टोंबरपासून 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- केंद्र शासनाने 25 सप्टेंबर 2020 च्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम  2019 च्या नमूद कलमांची अंमलबजावणी  1 ऑक्टोंबर 2020 पासून करण्याचे अधिसुचित केले आहे. याची सर्व संबंधित मोटार वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 मधील कलम व (मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम) तसेच तरतूदी पुढीलप्रमाणे आहेत. कलम 45 (कलम 134-) Protection of Goods Samaritans. कलम 74 (कलम 192) Using vehicle without registration. कलम 88 (कलम 206) Power of police officer to impound document. कलम 90 (कलम 211-) Use of eletronic forms and documents. कलम 91 च्या खंड (i) चा उपखंड (b) नुसार (कलम 212) अन्वये Publication, commencement and laying of rules and notification अशी तरतूद आहे. याबाबत सर्व संबंधित मोटार वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकरी नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...