बिरसा मुंडा
कृषि क्रांती योजना
व डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत
अर्ज
करण्यासाठी संकेतस्थळात बदल
नांदेड (जिमाका) दि. 27 :- सन 2020-21 मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठीच्या संकेतस्थळामध्ये बदल झाला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in कार्यान्वित झाल्यावर या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
बिरसा मुंडा
कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि
स्वावलंबन योजनेतर्गंत लाभार्थ्यांचे
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सन 2018-19 पासून
महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम
असलेल्या महाऑनलाईनचे www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर
सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आली होती. कृषि विभागाच्या
विविध योजनेसाठी महाडीबीटीचे संकेतस्थळ
mahadbtmahait.gov.in या शासनाचे संकेतस्थळावर शेतकऱ्यांना
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची
सुविधा सन 2020-21 या आर्थिक
वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. बिरसा मुंडा
कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि
स्वावलंबन योजना या योजनांचाही
समावेश असून अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे
संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in कार्यान्वित झाल्यावर
या संकेतस्थळावर
शेतकऱ्यांने अर्ज दाखल
करावेत व संकेतस्थळ बदलाबाबत नोंद घ्यावी असेही
आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment