Thursday, May 13, 2021

 

693 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 292 व्यक्ती कोरोना बाधित

15 जणांचा मागील तीन दिवसात मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 60 अहवालापैकी 292 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 231 तर अँटिजेन तपासणीद्वारे 61 अहवाल बाधित आहेत.जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 86 हजार 235 एवढी झाली असून यातील 79 हजार 950 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 163 रुग्ण उपचार घेत असून 170 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 11, 12 व 13 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 772 एवढी झाली आहे. दिनांक 11 मे 2021 देगलूर कोविड रुग्णालय येथे पिंपळगाव ता. देगलूर येथील 45 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णाय येथे देगाव रोड देगलूर येथील 25 वर्षाचा पुरुष, गोपाळकृष्ण नगर नांदेड येथील 40 वर्षाचा पुरुष, दिनांक 12 मे, 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे हदगाव येथील 58 वर्षाचा पुरुष, पीरनगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  येथे भोकर येथील 70 वर्षाची महिला, चैतन्यनगर नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, अशोकनगर नांदेड येथील 59 वर्षाची महिला, अशा काविड रुग्णालय येथे नांदेड येथील 80 वर्षाची महिला, दिनांक 13 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे किनोळा ता. बिलोली येथील 67 वर्षाचा पुरुष, वेदांतनगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, हरडफ ता. हदगाव येथील 32 वर्षाची महिला, चिखाडी ता. कंधार येथील 75 वर्षाची महिला, खुरगाव ता. नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, गणेशा कोविड रुग्णालय येथे गांधीनगर बिलोली येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 89, देगलूर 20, कंधार 8, मुखेड 37, लातूर 2, नांदेड ग्रामीण 11, धर्माबाद 6, लोहा 5, उमरी 4, औरंगाबाद 1, भोकर 10, हदगाव 11, माहूर 3, हिंगोली 4, हैद्राबाद 1, बिलोली 9, हिमायतनगर 3, मुदखेड 4, परभणी 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 3, देगलूर 3, नायगाव 8, नांदेड ग्रामीणर 1, कंधार 1, उमरी 2, बिलोली 26, किनवट 4, हिंगोली 4, हिमायतनगर 3, मुखेड 5, लातूर 1 असे एकूण 292 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 663 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 380, मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 1, बारड कोविड केअर सेंटर 4, माहूर तालुक्यातंर्गत 6, खाजगी रुग्णालय 110, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 24, मुखेड कोविड रुग्णालय 19, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड रुग्णालय 24, कंधार तालुक्यातंर्गत 5, बिलोली तालुक्यातंर्गत 30, उमरी तालुक्यातंर्गत 8, शासकीय आयर्वेदिक महाविद्यालय नांदेड 17, नायगाव तालुक्यातंर्गत 2, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 12, हदगाव कोविड रुग्णालय 12, लोहा तालुक्यातंर्गत 1, मालेगाव टी.सी.यू. कोविड रुग्णालय 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 4 हजार 163 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 28, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 49, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 90, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 27, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 25, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 13, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 419, खाजगी रुग्णालय 753 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 65, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 57, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 92 हजार 710

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 96 हजार 311

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 235

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 79 हजार 950

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 772

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.71 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-57

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-248

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 4 हजार 163

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-170

00000

 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी कालावधीत 1 जूनपर्यंत वाढ

नांदेड (जिमाका) दि. 13 :- कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून दिनांक 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवेच्या दुकानांबाबत सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ निश्चित केली होती. 15 मे नंतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नव्याने आदेश काढणे आवश्यक होते. राज्य शासनाच्या दिनांक 12 मे 2021 आदेशानुसार राज्‍यात ब्रेक दि चेन अंतर्गत ताळेबंदीचा कालावधी दिनांक 1 जून पर्यंत वाढवून यापुर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनासह पुढील आ‍णखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू राहतील असे निर्देशीत केले आहे.   

त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये 12 मे 2021 मधील अटी व शर्तीसह पुढील आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू करून संपूर्ण नांदेड जिल्‍हयात दिनांक 1 जून 2021 चे सकाळी 7 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविला आहे. 

या आदेशात   

कोणत्याही वाहनाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी निगेटिव्ह (नकारात्मक) आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. हा अहवाल राज्यातील प्रवेशाच्या 48 तासांपूर्वीचा असावा.

 

संवेदनशील ठिकाणाहुन येणाऱ्या व्यक्ती मग त्या देशातील कोणत्याही प्रदेशातील असो त्यांना यापूर्वीचे आदेश दिनांक 18 एप्रिल व 1 मे मधील सर्व प्रतिबंध लागु राहतील.

कार्गो वाहतूकीमध्ये 1 चालक व सफाईगार अशा दोनच व्यक्तीनाच परवानगी असेल. जर कार्गो वाहतूक ही राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचारी यांनी निगेटिव्ह (नकारात्मक) आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. सदर अहवाल राज्यातील प्रवेशाच्या 48 तासांपूर्वीचा असावा व तो 7 दिवसांकरिता वैध राहिल. 

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ग्रामीण बाजार व कृषीउत्पन्न बाजार समित्यांवर कोविड-19 संसर्गाचे अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी. आणि जर अशा ठिकाणी कोविड-19  चा संसर्ग रोखण्याचे दृष्टीने अडथळा येत असेल असे निदर्शनास आल्यास सदर ठिकाणे बंद करणे बाबत किंवा बंधने कडक करणे बाबत निर्णय घ्यावा. 

दूध संकलन, वाहतूक, प्रक्रिया निर्बंधाशिवाय चालू राहतील. परंतु अत्यावश्यक वस्तूंचे  व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जी बंधने लागु असतील त्या बंधनासह किरकोळ विक्रीस परवानगी दिली जावी. 

विमानतळ आणि बंदर सेवांमध्ये व्यस्त असलेले आणि कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या औषधाशी संबंधित वस्तू किंवा उपकरणे यांचे वाहतूकीशी संबंधित व आवश्यक असणा-या कर्मचा-यांना स्थानिक, मोनो, मेट्रो सेवांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. 

आवश्यक असल्यास विशिष्ट भागांकरिता इतर काही निर्बंध स्थानिक आपत्ती प्राधिकरण लावु शकेल पण त्यापूर्वी उपविभागीय प्राधिकरणास अशा प्रकारचे निर्बंध लावीत असलेबाबत 48 तासांपुर्वी पूर्वसूचना देण्यात याव्यात. 

या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्‍त नांदेड वाघाळा महानगरपालीका नांदेड, मुख्‍याधिकारी, सर्व नगरपरीषद / नगर पंचायत यांचेवर राहील. 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही, असे नमूद केले आहे. हे आदेश 13 मे 2021 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

000000

 

14 मे रोजी 45 वर्षांवरील लाभार्थ्यांनाच

कोविशिल्डचा दुसरा डोस

लसीकरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना डोसच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील 91 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. आजही या केंद्रासाठी प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड मिळाले आहे. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्डचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. लस ज्या प्रमाणात जिल्ह्यातील केंद्रांसाठी उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणात लसीकरणासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असून टप्याटप्यात सर्वांना लसीकरण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन लसीकरणाबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असेही आवाहन केले आहे. 

जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण व्हावे याची खबरदारी कुटुंबातील सदस्यांनी घेऊन तसे नियोजन करणे उचित राहिल. लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक-नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन अनावश्यक गर्दी करु नये. नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण 7 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविडशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 13 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 23 हजार 730, कोवॅक्सीनचे 96 हजार 440 डोस असे एकुण 4 लाख 20 हजार 170 डोस मिळाले आहेत.

0000

 

कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ झालेल्या बालकांच्या

काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

अनाथ बालकांसाठी 1098 हेल्पलाइन नंबर 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. याअनुषंगाने सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या दि. 7 मे 2021 रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या टास्क फोर्सबाबत बैठक संपन्न होऊन विचाराविमर्ष करण्यात आला. 

या बैठकीस जिल्हा पोलीस अधिकारी प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते.   

नांदेड जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी अनाथ झालेली मुले आहेत का याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. ही वस्तुस्थिती नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार हे अनाथ बालके असल्यास त्यांची सत्यता पडताळून टास्क फोर्सला माहिती सादर करतील. शुन्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...