Thursday, April 25, 2024

 वृत्त क्र. 389

 लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल्ह्यात मतदान

 प्रशासन सज् ; मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 :  अठराव्या लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. आज दुपारी वाजेपर्यंत सर्व पोलींग पार्ट्या मतदान केंद्रावर सुखरुप पोहोचल्या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक् बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हावाशियांना आवाहन करतांना आपल्या संदेशात जनतेने मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्यात आली असून पिण्याच्या पाण्यासह आवश्यकतेनुसार आरोग् विषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या ७५ दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून उद्या शुक्रवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलेले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून  जिल्ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्याचे सांगितले आहे.

18 लक्ष 51 हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (294409), नांदेड उत्तर (346886), नांदेड दक्षिण (308790), नायगाव (301299), देगलूर (303943), मुखेड (296516) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617  महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

10 हजार 637 कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी 10 हजार 637 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष 2766, इतर मतदान अधिकारी 7921, क्षेत्रीय अधिकारी 242, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर 39, होम वोटींग करीता 50, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे.

7 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी

नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी एक जिल्हा पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक् पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 245 अधिकारी, 4272 अंमलदार, 2500 होमगार्ड याशिवाय 6 सीआरपीएफ कंपन्या असा तगडा पोलीस बंदोबस् लावण्यात आलेला आहे.

मोबाईल वापरावर बंदी

आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय मतदान करावे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान, व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

महिला सखी केंद्र तयार

जिल्ह्यात 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. ते आजच सायंकाळी मतदारांच्या स्वागतासाठी सज् झाले आहे. यामध्ये भोकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुतन इमारत, बारड येथील जिल्हा परिषद कन्या शाळा, उत्तर नांदेड मधील वसंत नगर येथील राजर्षी शाहु बालक मंदिर, नांदेड दक्षिण मधील धनेगाव येथील मधुबन महाराज हायस्कूल, नायगाव येथील कृषीउत्पन् बाजार समिती, देगलूर येथील सावित्रीबाई हायस्कूल नवी इमारत, मुखेड येथील गुरुदेव विद्यामंदिर, गुजराती हायस्कूल वजिराबाद, नांदेड आदिंचा सहभाग आहे. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 100 टक्के युवक अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या 6 आहे तर  5 शाडो मतदान केंद्र आहेत.

32 संवेदनशील केंद्र

जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांची यादी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण हजार 62 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 मतदान केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत केली आहेत. 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात 5 केंद्र हे संवेदनशील आहेत. यामध्ये केंद्र क्रमांक 139 राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर, केंद्र क्रमांक 202 विवेक वर्धिनी हायस्कूल यशवंतनगर, केंद्र क्रमांक 205 नांदेड क्लब स्नेहनगर, केंद्र क्रमांक 241 शासकीय औद्योगिक पी.एस. हॉल नंबर 4, केंद्र क्रमांक 333 इस्लाहुल आलमी माध्यमिक बॉईज स्कूल, रुम नंबर 4, नांदेड दक्षिण मतदान संघात एकूण 10 केंद्र संवेदनशील आहेत. मध्ये 192- गांधी राष्ट्रीय हायस्कूल गाडीपुरा, 115- जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा वर्ग आठवी , 161- जिल्हा परिषद वाजेगाव उत्तरेकडील रुम, 234- जिल्हा परिषद हायस्कूल बळीरामपूर मतदान केंद्र रुम नंबर , मतदान केंद्र २८९- जिल्हा परिषद सोनखेड, 295- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवडी बाजार, मतदान केंद्र 212- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफाळा, मतदान केंद्र १३५- महानगरपालिका हॉस्पिटल करबला, 132- जिल्हा परिषद मतदान केंद्र गर्ल स्कूल गाडीपुरा, 310- जिल्हा परिषद मतदान केंद्र कारेगाव. लोहा विधान मतदार संघात मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 2, नंदगाव, 37- कांजाळा तांडा मतदान केंद्र 321- कदमाची वाडी. नायगाव विधानसभा मतदारसंघात 6 केंद्र आहेत. यामध्ये मतदान केंद्र 3 काळगाव, 109- गोळेगाव, 110- गोळेगाव, 292- पिंपळगाव, 293- पिंपळगाव, 301- मांजराम वाडी, देगलूर मध्ये मतदान केंद्र 408- अंगणवाडी ईमारत पुंजारवाडी हे केंद्र संवेदनशील आहे. मुखेड मध्ये मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र 144 चांडोळा, 298- हसनाळ (पीएम), गोजेगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 339, 340 341, मतदान केंद्र क्रमांक 34 35 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (नि) हे 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

 00000










८६- नांदेड उत्तरचे सहायक निवडणूक अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना

 

 


जिल्हाधिकारी कार्यालयातील CVIGIL व 1950 तक्रार निवारण कक्षात 
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करताना कर्मचारी

सकाळी शासकीय तंत्रनिकेतन वरून निघालेल्या सर्व पोलिंग पार्ट्या आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. पोलिंग पार्ट्या ज्या बस मध्ये जातात त्याला जीपीएस लावले असल्यामुळे प्रत्येक बसचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षातून घेतला.


शासकीय तंत्रनिकेतन मैदानावरून पोलिंग पाटर्या रवाना होत असतानाच्या चित्रफिती. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी










 

नांदेड लोकसभा मतदार संघातील पोलिंग पार्टी रवाना होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रक्रियेची पाहणी केली... यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडा, असे आवाहन केले.



शासकीय तंत्रनिकेतन मैदानावरून पोलिंग पाटर्या रवाना होत असतानाच्या चित्रफिती. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी

 













शासकीय तंत्रनिकेतन मैदानावरून पोलिंग पाटर्या रवाना होत असतानाच्या चित्रफिती. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी



 

नांदेड शासकीय तंत्रनिकेतन परिसरात ८६- नांदेड उत्तर ,८७ नांदेड -दाक्षिण क्षेत्राच्या पोलिंग पार्ट्या रवाना होण्याची प्रक्रिया सकाळी सात पासून सुरू झाली. दुपारी अकरा पर्यंत सर्व साहित्य घेऊन जिल्ह्याच्या विविध भागात मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमासाठी चित्रफित....




 

 

 नांदेड शासकीय तंत्रनिकेतन परिसरात ८६- नांदेड उत्तर ,८७ नांदेड -दाक्षिण क्षेत्राच्या पोलिंग पार्ट्या रवाना होण्याची प्रक्रिया सकाळी सात पासून सुरू झाली. दुपारी अकरा पर्यंत सर्व साहित्य घेऊन जिल्ह्याच्या विविध भागात मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमासाठी चित्रफित....



वृत्त क्र. 388

नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रावर कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडते याबद्दल तयार केलेली चित्रफित.

चला जाणून घेऊया मतदान प्रक्रिया



 वृत्त क्र. 387

लोकसभेच्या 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा ;

केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष

 

6 नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात

 

नांदेड, 25 एप्रिल- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 3 हजार 41 मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. 50 टक्के मतदान केंद्रांवरील मतदानादिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहेत.

 

नांदेड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्र आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील  1 हजार 359 मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची सुविधा केली आहे. याव्दारे या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार  आहेत.  हिंगोली मतदार संघातील किनवट तालुक्यातील 164 तर हदगाव तालुक्यातील 169 मतदान केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे.

 

वेबकॉस्टिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल्ल करर्णेवार यांच्या मार्गदर्शनात हा कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे कक्षाचे प्रमुख असून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार यांच्यासह शिवानंद स्वामी, मिरज धामणगावे, शाहेद हुसेन, विठ्ठल लाड आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा मतदारसंघनीय वेबकॉस्टिंग चालू असलेल्या मतदान केंद्रांवर काही अनुसूचित प्रकार निदर्शनात आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

 

6 नियंत्रण कक्षातून निगराणी

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी 6 नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, माध्यम कक्ष, ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्ष, वेब कास्टिंग, एनकोर कक्ष, कम्युनिकेशन कक्ष. यामधील निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष व माध्यम कक्ष मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी वृत्तवाहिन्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती देणे व वृत्तपत्रांना आकडेवारी देण्याचे काम करणार.

 

ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्षाद्वारे ईव्हीएम वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्या जाते. ईव्हीएम घेऊन जाणारी वाहने कुठे आहेत. त्यांचे लोकेशन काय आहे ,यावर या कक्षामार्फत नियंत्रण ठेवल्या जाते. वेब कास्टिंग कक्षाद्वारे प्रत्येक विधानसभा निहाय 50 टक्के केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येते. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व संबंधित केंद्रांवर सुरू असलेल्या हालचालीवर नियंत्रण ठेवल्या जाते.


एन्कोर कक्षामार्फत निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी दिली जाते. विहित नमुन्यातील ही टक्केवारी आयोगाला वेळेत सादर करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. कम्युनिकेशन कक्षामार्फत इतर सर्व कक्षाशी समन्वय ठेवण्यात येईल व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी सर्व ठिकाणीची माहिती दिल्या जाईल.

00000






 वृत्त क्र. 386

मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य ;

12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान ;

मतदार यादीत नाव असणे आवश्यक

 

नांदेड, दि. 25 : लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व तुमच्याकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर तुम्हाला उद्या मतदान करता येणार आहे.

 

येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदानकेंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

 

हे आहेत 12 पुरावे

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

 

मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.

 

ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...